आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्स Brief: जाणून घ्‍या, अॅक्चुरियल सायन्समधील करिअरविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्चुरियल सायन्समध्ये मॅथ्स व स्टॅटिटिक्सच्या समावेशामुळे विमा आणि वित्त् उद्योगात जोखीम तसेच हफ्त्याचा अंदाज बांधला जातो. या कामाला मूर्त स्वरुप देणाऱ्या अॅक्चुरीजना सांख्यिकी, अर्थशास्त्र व फायनान्सची माहिती आवश्यक असते.

पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्चुरीज ऑफ इंडियामध्ये (आयएआय) स्टुडंट मेंबर म्हणून नोंदणी करण्यासाठी अॅक्चुरीज (वित्त व विमा सल्लागार) सामाईक प्रवेश परीक्षा. ही परीक्षा वर्षातून दोनदा जून व डिसेंबरमध्ये होते. यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. बारावीत इंग्रजी असणे बंधनकारक. याशिवाय गणितात पात्र उच्च शैक्षणिक स्तरावरील विद्यार्थी किंवा व्यावसायिकही ही परीक्षा देऊ शकतात.

कोर्ससाठी संस्था :
>>इंस्टीट्यूट ऑफ अॅक्चुरीज ऑफ इंडिया
>>मुंबई विद्यापीठ,मुंबई
>>दिल्ली विद्यापीठ,दिल्ली
>>अमिटी स्कूल ऑफ इंश्योरन्स अँड अॅक्चुरियल सायन्स, नवी दिल्ली
>>आयसीएफएआय विद्यापीठ, हैदराबाद

रोजगाराच्या संधी : जनरल इंश्योरन्स, आरोग्य विमा, फेरविमा कंपन्या, निवृत्ती व कर्मचारी भत्ते, कन्सल्टन्सीज, जोखीम व्यवस्थापन, बँक, शेअर, खासगी व सरकारी संस्था.