आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा : Challenging Career, विमान उद्योगातील संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी अंतराच्या विमान प्रवासाचा विस्तार
दर वर्षी मिळणार ४० हजार नोकऱ्या

अंदाजे १६ अब्ज डॉलर क्षमतेच्या देशाच्या विमान उद्योग क्षेत्रात गेल्या पाच वर्षापासून मंदी आहे. नोकऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. पण सेंटर फॉर अॅव्हिएशनच्या अहवालानुसार २०१५-१६ या वर्षात उद्योगाचा विस्तार वेग आणखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली इंधनाची कमी किंमत,लो कॉस्ट कॅरिअर्सचा विस्तार, आणि देशातील बदलते आर्थिक वातावरण यामुळे या उद्योगाबद्दल आशा वाढल्या आहेत. नवीन एअरलाईन कंपन्यांचा प्रवेश,फलीटचा विस्तार यामुळे पुढील दोनच वर्षात विमान उद्योग १०० ते १५० टक्कयाने वाढणार आहे. जगात भारतीय उद्योग नवव्या क्रमांकावर आहे. २०२० सालापर्यंत आपण तिसऱ्या स्थानावर पोहोचू. यात पॅकेज चांगले मिळते. हा एक चांगला पर्याय आहे. पण केवळ १५ ते २० टक्के मुलांनाच मनासारखी नोकरी मिळते.

17 लाख लोकांना आहे रोजगाराचे साधन
>गेल्या दहा वर्षात विमान उद्याेग दरवर्षी 13.8% या दराने वाढत आहे. पण देशातील ९९ टक्के जनता अद्यापही विमानप्रवास करत नाही. यात ४० टक्के मध्यमवर्गाचा समावेश आहे. हवाई सेवेच्या विस्तारात या समूहोची भूमिका महत्वाची आहे.
> सप्टेबर 2014 ते जानेवारी 2015 दरम्यान देशात इंधनाच्या किंमतीत २४ टक्के कपात झाली आणि विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये १२ टक्के कपात झाली. दरातील स्थिरतेमुळे आगामी महिन्यात विकासाचा वेग वाढणार आहे.
>17 लाख लोकांना रोजगार मिळतो विमान उद्योगातून. 2023पर्यंत देशी कंपन्यांच्या माध्यमातून नवीन ५०० विमाने ताफयात दाखल केली जातील. यासाठी 3 लाख 50 हजार प्रोफेशनल्सची गरज असल्याने दरवर्षी 40 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील.

वाचा, वेगवेगळया क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी