आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्‍ये करिअर करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताकडे शस्त्रास्त्रांचा साठा आहे. त्याचे प्रबंधन प्रोफेशनल स्तरावर करण्याची गरज आहे. या प्रोफेशनल्सना तयार करण्यासाठी डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचा कोर्स करणे महत्त्वाचे आहे. डिफेन्स स्ट्रॅटेजिक स्टडीजला मिलिटरी/ डिफेन्स स्टडीज, मिलिटरी सायन्स, वॉर अँड नॅशनल सिक्युरिटी स्टडीज, वॉर अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या नावानेही ओळखले जाते. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना डिफेन्स इंडस्ट्री आणि सहायक वर्गात आव्हानात्मक लीडरशिप धोरणानुसार काम करण्याची संधी मिळते.
पात्रता- कोणत्याहीविषयात बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यास डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये बॅचलर डिग्रीसाठी प्रवेश घेता येतो. बॅचलरनंतर मास्टर्स प्रोग्राममध्येही अॅडमिशन घेता येते.
संधी- डिफेन्सअँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये बॅचलर्स वा मास्टर्स डिग्री असणाऱ्या उमेदवाराला लेक्चररचा जॉब करता येतो. या इंटरनॅशनल रिलेशन, युद्धाचे जिओस्ट्रॅटेजिक, जिओपॉलिटिकल, आर्थिक सामाजिक क्षेत्रात रिसर्च करता येते. याव्यतिरिक्त रोजगाराच्या संधीत प्रामुख्याने भारतीय सेना, वायू सेना, नौसेना, एज्युकेशन कॉर्पोरेशन्स, डिफेन्स जर्नालिझमचा समावेश आहे.
कामाची प्रमुख क्षेत्रे आहेत - डिफेन्स अॅनालिसिस, डिफेन्स रिसर्च, टॅक्टिकल सर्व्हिसेस, राष्ट्रीय सुरक्षा योजना तसेच क्रियान्वयन आणि सिव्हिल डिफेन्स, सशस्त्र सेना, राष्ट्रीय सुरक्षा संघटन, रक्षा पत्रकारिता, अकॅडमिक रिसर्च, कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण, सरकार आणि यूजीसीसाठी पुस्तक लिखाण प्रकाशन.