आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्स Review : वाढत्या विदेशी गुंतवणुकीने दुग्ध तंत्रात वाढताहेत संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेत दुग्ध उद्योग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. संपूर्ण जगात दुग्ध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे. डेअरी उत्पादन देशातील निर्यातीत देखील महत्त्वाची भूमिका निभावत आहे आणि या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक देखील सातत्याने वाढत आहे.

सातत्याने नवनवे तंत्रज्ञानाच्या येण्याने डेअरी उद्योग एक विशेष क्षेत्र झाले आहे. ज्यात दुग्धापासूनची उत्पादन, पुरवठा, साठवणूक, प्रक्रिया आणि वितरण समाविष्ट आहे. या उद्योगात प्रमुख नोकऱ्या उत्पादन आणि प्रक्रियेत आहेत. डेअरी सायंटिस्ट च्या प्रमुख रुपात उत्पादन प्रक्रियेसाठी नियुक्त केले जाते. ते विभिन्न प्रकारच्या प्रयोगांद्वारे गायी-म्हशी या जनावरांना दिले जाणारे खाद्य व त्याची गुणवत्ता आणि त्याचा प्रभाव, अनुकूल वातावरण आणि दुधाची गुणवत्ता याचा शोध लागतो. आणि यास उत्तम बनविण्यासाठी संशोधन केले जाते. प्रक्रियेत दुधाची साठवणूक करणे, वितरण आणि अन्य याच्याशी संबंधित उत्पादने बनविणे समाविष्ट आहे. डेअरी तंत्रज्ञान प्रमुख रुपाने टेक्निकल आणि क्वालिटी कंट्रोलवर लक्ष देतात याशिवाय प्रक्रियेच्या नवनव्या पद्धती विकसित करणे, उत्पादनांना संरक्षित करण्याच्या प्रक्रियेवरही काम करतो आहे. डेअरी इंजिनियर हे डेअरी मेंटेनन्सशी संबंधित उपक्रमावर लक्ष ठेवतात. डेअरी तंत्रज्ञानाचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी आणि खासगी संस्थांसारख्या रुरल बँक, उत्पादन फर्म, मिल्क प्रॉडक्ट प्रोसेसिंग आणि डेअरी फर्ममध्ये करिअरच्या उत्तम शक्यता आहेत. याशिवाय आइस्क्रीम युनिट, क्रिमरी प्रॉडक्ट प्रोसेसिंग यात देखील जॉब करू शकतात.
04 विद्यार्थी कला, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे यात प्रवेश घेतात.
9-10 हजार कोटींची गुंतवणूक होणार येणाऱ्या ५ वर्षांत
15% वार्षिक दराने वाढत आहे देशातील दुग्ध उद्योग क्षेत्र
पात्रता
डेअरी उद्योगात करिअर बनविण्यासाठी व्हेटर्नरी सायन्सची पदवी आणि अॅनिमल हसबंड्रीचा कोर्स केला जाऊ शकतो. अनेक संस्थांमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीत पदविका, पदवी, पदव्युत्तर पीजी कोर्स देखील आहेत. ज्यात बारावीनंतर प्रवेश घेऊ शकता. सायन्स शाखेत बारावी करणारे विद्यार्थी पदविका वा अंडरग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. अधिकाधिक संस्थांमध्ये प्रवेश हे परीक्षाद्वारेच मिळतात.

नोकरीच्या संधी, उत्पन्न
डेअरी टेक्नॉलॉजीचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात फ्रेशरला १५ हजार ते २० हजार रुपये प्रतिमाह वेतन पॅकेज मिळू शकते. काही वर्षांच्या अनुभवानंतर ३५ हजार ते ४० हजार रुपये प्रतिमाह वेतन मिळू शकते.

प्रमुख शिक्षण संस्था
>नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, हरियाणा
www.ndri.res.in/
>डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई
http://dairy.maharashtra.
gov.in/en/
>आचार्य एनजी रंगा अॅग्रीकल्चर
युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश
www.angrau.ac.in
AcademicPrograms.php
बातम्या आणखी आहेत...