आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Paytmकरणार सर्वात मोठी नोकर भरती, सो फ्रेंड्स तयार व्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन कंपन्यांची मागणी वाढत आहे. यामुळे या कंपन्यांना मनुष्‍यबळाची कमतरता जाणवत आहे. अशीच एक कंपनी ऑनलाइन रिचार्ज आणि पेमेंट कंपनी पेटीम नोकर भरती करणार आहे. कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्स व्हर्टिकलमध्‍ये 1 हजार 900 जागा भरणार आहे. कंपनीच्या एका अधिका-याने सांगितले, की पेटीम मार्च 2016 पर्यंत कर्मचा-यांची संख्‍या 3 हजार 100 वरुन 5 हजारावर नेणार आहे. पेटीमचे उपाध्‍यक्ष(बिझनेस अँड पीपल) अमित सिन्हा म्हणाले, या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 5 हजारापर्यंत कर्मचारी संख्‍या नेणार आहे. बहुतेक नव्या लोकांना प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्स व्हर्टिकलमध्‍ये ठेवले जाणार आहे.
नुकतेच सेल्स व्हर्टिकलसाठी भरती करण्‍यात आली, असे सिन्हा यांनी सांगितले. नव्या भरतींपैकी दोन तृतीयांश ऑपरेशन्स आणि एक तृतीयांश प्रोडक्ट इंजिनिअरिंगसाठी होणार आहे. पेटीमची मोठी स्पर्धक स्नॅपडील आणि फ्ल‍िपकार्टही आपल्या इंजिनिअरिंग टीमचा विस्तार करित आहे.
पुढे वाचा....स्नॅपडील आपल्या इंजिनिअरिंग टीमचा आकार वाढवणार ( येथेही करिअरची संधी.. दिव्य लक्ष्‍य: निवडा संरक्षण सेवा समृद्ध करिअरचा पर्याय)