आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coffee Board Of India Coffee Quality Mangement Course Entrance

पीजीडीसीक्यूएम-2013 : कॉफी बोर्ड ऑफ इंडियाच्या कॉफी क्वॉलिटी मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉफी बोर्ड ऑफ इंडियाच्या कॉफी क्वॉलिटी मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेश
कॉफी बोर्ड ऑफ इंडिया, बंगळुरूच्या कॉफी क्वॉलिटी पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन (पीजीडीसीक्यूएम) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी 15 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाची मुलाखत व निवड 31 जुलै रोजी होईल.


पात्रता
वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, खाद्य विज्ञान, पर्यावरणशास्त्र किंवा कृषिशास्त्र या विषयांतील पदवीधर. वयोमर्यादा : 30 वर्षे.


निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांची निवड त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मुलाखतीमधील कामगिरी, सेन्सरी इव्हॅल्युएशन टेस्ट यांच्या आधारे होईल. जागांची संख्या अनिश्चित असते. निवड प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली असेल, त्यांची निवड होऊ शकते.
शुल्क
कॉफी बोर्ड ऑफ इंडियाच्या कॉफी गुणवत्ता व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 75 हजार रुपये शुल्क आहे.
कॉफीसोबत शिकता येतील सॉफ्ट स्किल्स
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीन सत्रांत अभ्यास करावा लागणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना कॉफीचे वैविध्य, कप प्रोफाइल, कॉफी केमिस्ट्री, प्रक्रिया, गुणवत्ता आणि विपणनाबद्दल शिकवले जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात येतो. तिस-या सत्रात विद्यार्थ्यांना कार्य प्रकल्प (डेझर्टेशन) सादर करावा लागतो.


हॉटेलपासून खाद्य कंपन्यांपर्यंत नोकरीची संधी
कॉफी गुणवत्ता व्यवस्थापनानंतर हॉटेलमध्ये कॉफी सेंटर, कॉफी कन्सल्टंट, कॉफी क्वॉलिटी मॅनेजर इत्यादी पदांवर काम करता येऊ शकते. अन्न प्रक्रिया व मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये कॉफी कन्सल्टंटच्या रूपात काम करता येऊ शकते.


ज्ञान
कॉफीची वेगवेगळी रूपे
जगाच्या वेगवेगळ्या भागांत कॉफीची विविध रूपे दिसून येतात. त्याचा वापरही वेगवेगळा आहे. सर्व्ह करण्याअगोदर कॉफीमध्ये आइस्क्रीम, चॉकलेट, विलायची इत्यादी टाकली जाते.


कॅफे लाते
व्हिएन्नाच्या ऑस्ट्रेलिया कॉफी हाऊस व 1700 मध्ये ट्रिस्टेमध्ये कॉफीसोबत क्रीम, स्पाइस व साखर टाकून कॅफे लातेची सुरुवात झाली.


मोका
ही कॉफी सामान्यपणे हॉट चॉकलेटसोबत घेतली जाते, त्यात विलायची वरील भागात असते.


कॅपेचिनो
990 मध्ये उत्तर अमेरिकेत कॉफी हाऊसची संख्या वाढली. तेव्हापासून स्वीट पेस्ट्रीच्या रूपाने कॅपेचिनोला पसंती मिळू लागली.


अमेरिकानो
दुस-या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील सैनिक स्ट्राँग कॉफीमध्ये गरम पाणी मिसळू लागले.


ब्रेव्ह
ब्रेव्हमध्ये 37 टक्के फॅट असते, परंतु त्याच्या एका कपाने शरीरासाठी आवश्यक असणारे 36 टक्के कॅल्शियम व 27 टक्के अ जीवनसत्त्व मिळते.


एस्प्रेसो
इटलीमध्ये एस्प्रेसो कॉफीला नागरिकरणाशी जोडून पाहण्यात आले. 1884 मध्ये पहिले कॉफी यंत्राची निर्मिती अँजेला मोरिएंडो यांनी केली होती.


रंजक
कॉफी पिऊन शेळ्यांचे नृत्य
@कॉफीची उपयोगिता पहिल्यांदा इथोपियामधील मेंढपाळांच्या लक्षात आली होती. मेंढपाळांनी कॉफी पहिल्यांदा आपल्या शेळ्यांना पाजली. यामुळे त्यांना एवढी ऊर्जा मिळाली की, त्या उड्या मारू लागल्या. त्या वेळी मेंढपाळांना ते शेळ्यांचे एक प्रकारचे नृत्य वाटले.
@कॉफीला एनर्जी बॉल्सच्या रूपाने खाल्लेदेखील जात होते. आफ्रिकेतील काही लोकांमध्ये कॉफी बॅरिजला अधिक फॅट असलेल्या पदार्थांसोबत खाल्ले जात होते.
@प्राचीन काळात अरब देशांत एखादा पुरुष आपल्या पत्नीस पुरेशी कॉफी देऊ शकत नसेल, तर सदर महिला त्याला घटस्फोट देऊ शकत होती.


इंटरेस्टिंग कोट
"Good communication is just as stimulating as black coffee, and just as hard to sleep after." - Anne Morrow Lindbergh.
एखादी चांगली चर्चा ब्लॅक कॉफीइतकीच स्फूर्तिदायी असते. त्यानंतर झोप न येणे स्वाभाविक आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com