आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर कॉर्नर : येत्या पाच वर्षांत टेलिकॉम क्षेत्रात 7 लाख नोकऱ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१०० कोटी मोबाइलधारकांसह दुसरा सर्वात मोठा टेलिकॉम बाजार भारत आहे. सेवा उत्पादनांच्या अंगाने नव्हे तर रोजगार निर्मितीतही हे क्षेत्र पुढे आहे. एका प्रमुख टेलिकॉम कौशल्य विकास समूहाच्या ताज्या अहवालानुसार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे की, टेलिकॉम इंडस्ट्री पुढील पाच वर्षांत लाख नवे रोजगार निर्माण करेल. अशातच या क्षेत्राशी जोडले जाण्यासाठी पदवीधारकांसाठी हा उत्तम काळ आहे.

विशेषज्ञांच्यामतानुसार टेलिकॉम क्षेत्र दोन दशकांपासून ३५ टक्के याप्रमाणे वाढते आहे आणि रोजगार देणाऱ्या प्रमुख निर्माते उत्पादक वा कंपन्या आपली जागा बनवण्यात यशस्वी झाल्या आहेत. या क्षेत्राचा वेगाने होणार विकास हा अनेक जागांची रोजगार निर्मिती होण्यात परिवर्तित होतो आहे. जीएसएम असोसिएशनच्या अहवालानुसार भारतीय मोबाइल इकॉनॉमी वेगाने वाढत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण पद्धतीने आपला वाटाही देत आहे. २०१७ पर्यंत एकूणच मोबाइल सेवा बाजाराचा महसूल ३७ दशलक्ष यूएस डॉलरवर पोहोचेल. एवढेच नव्हे तर ब्रॉडबँड सेवा युजर बेस २०१७ पर्यंत २५० दशलक्ष जोडण्यापर्यंत पोहोचेल. अशातच या कामासाठी म्हणजे रोजगारात अनेक संधी निर्माण होतील.
कुठे आहेत नोकऱ्या म्हणजे रोजगार :
संपूर्ण क्षेत्राची गोष्ट कराल तर येत्या काळात स्किल्ड टेक्निशियनपासून ते इंजिनिअर्स, इन्स्टाॅलेशन मेंटेनन्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सेल्स, मार्केटिंग, एचआर प्रोफेशनल्स यांची मोठी मागणी राहील. यासह कोअर इंजिनिअरिंगसारखे इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोफेशनल्सनाही येथे चांगल्या संधी मिळतील. मोठ्या प्रमाणात संख्येत कंपन्या अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट मार्केटवरच लक्ष केंद्रित करताहेत आणि ते अशा लोकांच्या शोधात आहेत ज्यांच्याकडे अँड्रॉइड डेव्हलपमेंट आणि डिझाइन स्किल्स आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार मार्केटिंग आणि ग्राहक सेवा क्षेत्रात अधिकाधिक संधी आहेत. वाढत्या स्पर्धेच्या युगात कंपन्यांना आता आपल्या ग्राहक सेवा टीमला अधिक मोठे मजबूत बनवण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. हेच एक कारण आहे की, या डोमेनमध्ये रोजगार वाढत आहेत. याशिवाय रोल आऊट ऑपरेशन्स मेंटेनन्समध्येही भरतीच्या हालचालींना वेग येईल. आवश्यककौशल्य
ऑपरेशन्समध्येडोमेन नॉलेज आवश्यक आहे. बीटेक (टेलिकम्युनिकेशन्स), बीटेक (इन्फर्मेशन टेक्नोलॉजी) आणि एमबीए (टेलिकॉम) सारखे प्रोग्राम्स आहेत, जे या क्षेत्रात उत्तमोत्तम रोजगार मिळवण्यात मदत करू शकतील. याशिवाय चांगले कम्युनिकेशन इंटरपर्सनल कौशल्य असणारे पदवीधर विपणन ग्राहक सेवा क्षेत्रात प्रवेश करू शकतात.

फक्त नेटवर्क ऑपरेटर घटकापर्यंतच मर्यादित नाही हे काम :
मोबाइलनेटवर्कऑपरेटर सेगमेंटशिवाय टेलिकॉम व्हर्टिकलमध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या सामील आहेत, ज्या विविध उत्पादने वा सेवा उपलब्ध करून देतात. यात टेलिकॉम उपकरण निर्माता कंपन्यांपासून ते व्हॅल्यू अॅडेड सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यादेखील सहभागी आहेत. याशिवाय अशा कंपन्या ज्या नेटवर्किंग, स्विचिंग ट्रान्समिशन उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहेत. आणि ज्यांनी भारतात आर अँड डी विभाग स्थापन केला आहे, ते मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सना हायर करत आहेत.
पुढे वाचा... कोणते क्षेत्र देईल किती रोजगार, तांत्रिक संधी आणेल मोठी संधी