आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 उपायांनी वाढवा स्वत:मधील आत्मविश्‍वास, जगा सक्सेसफुल लाईफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशस्वी जीवनासाठी आत्मविश्‍वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणा-या बहुतेकांमध्‍ये हा गुण आढळतो. मग ते आमिर खान, सचिन तेंडूलकर, कंगणा रणावत, भन्सल बंधू अशा अनेक यशस्वी व्यक्तिंचे उदाहरण देत येईल. आत्मविश्‍वास एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो. मात्र सध्‍याची आत्मविश्‍वासाची पातळी वाढवून ती आणखी वाढवली जाऊ शकते. divyamarathi.com तुम्हाला स्वत: मधील कसा आत्मविश्‍वास वाढवावा याविषयी टीप्स सांगणार आहोत.
1. कपड्यांकडे लक्ष द्या: तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता त्याचा तुमच्या आत्मविश्‍वासावर परिणाम होत असतो. जेव्हा तुम्ही सादरीकरण किंवा मुलाखत देत असता तेव्हा चांगल्या प्रकारे तयारी करुन जा. वास्तविक चांगले दिसण्‍यांने तुम्ही लोकांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाऊ शकता. उलट जर तुम्ही नीटनेटके ड्रेस अप न करता गेलास त्याचा तुमच्या आत्मविश्‍वासावर परिणाम होतो.
2. ते करा जे आत्मविश्‍वास असलेले लोक करतात :
तुमच्या आसपास अशी लोक असतात ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्य‍क्ती आत्मविश्‍वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्‍य द्या आणि ती करत असलेल्या गोष्‍टी आपल्या दैनंदिन आयुष्‍यात त्यांचा समावेश करा. जसे की,
>पुढच्या आसनावर बसा
>वर्गात, सेमिनार्समध्‍ये आणि इतर प्रसंगी प्रश्‍न विचारा किंवा उत्तरे द्या.
>चालणे आणि बसणे यावर लक्ष द्या
>दाबलेल्या आवाजात बोलू नका
>बोलताना आय कॉन्टॅक्टवर लक्ष द्या.
पुढे वाचा, कोणत्यातरी एका क्षेत्रात इतरांपेक्षा नैपुण्‍य मिळवा