आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इंडिया आणि शिक्षण: शिक्षणाच्या चांगल्या गुणवत्तेसह वाढणार नोक-या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल इंडियाचा महत्वाचा भाग शिक्षण आहे. पंचायत स्तरापर्यंत इंटरनेट सेवा आणि ग्रामीण भागात डिजिटल एज्युकेशनच्या प्रारंभाने सर्वच युवकांसाठी शिक्षण सुलभ हेाणार आहे. यातून शिक्षकांची कमतरता आणि गुणवत्ता या शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्याची संधी यातून मिळणार आहे. या अंतर्गत पुढील दहा वर्षात १८ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की जर डिजिटल इंडिया उपक्रम यशस्वी ठरला तर युवकांना शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. पण यात काही अडचणीही आहेत. आज दिव्य एज्युकेशनमधून जाणून घेऊया डिजीटल एज्युकेशनची गरज आणि त्याच्याशी संबंधित काही मुद्दे..

का गरज अाहे? : पुढे व्हा, पण जगाच्या मागे...
सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली. परंतु, शिक्षणात गुणवत्तेचा स्तर अजूनही खालावलेला आहे. केवळ १० टक्के मुलेच उच्चशिक्षण घेऊ शकतात.
>साक्षरतेचा अभाव : स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा देशात फक्त १२ टक्के लोक साक्षर होते. २०११ साली साक्षरतेचे प्रमाण ७४ टक्के होते. पण ८४ टक्के या जागतिक सरसरीच्या तुलनेत भारत बराच मागे आहे. एनरोलमेंट आणि ड्रॉपआउट : सर्वशिक्षा अभियान सारखे कार्यक्रम समूहाला डोळयासमेार ठेवून केले गेले. यामुळे प्राथमिक शिक्षणात प्रवेशाचे प्रमाण १०० टक्क्यांवर पोहाचले तरी शिक्षण अर्धवट सोडण्याच्या प्रकारामुळे ५७ टक्केच प्राथमिक शिक्षण तर १० टक्केच सेकंडरी एज्युकेशन पूणर् करतात. उच्च शिक्षण प्रवेश १२ पटीने वाढले पण जगात भारत बराच मागे आहे.
>युवकांची संख्या: देशात ६० टक्के पेक्षा जास्त युवक आहेत.२०२० पर्यंत आपण याबाबत चीनलाही मागे टाकू. २०३० पर्यंत ५९ कोटी लोक शहरातून राहू लागतील. , यामुळे शिक्षण संस्थाची मागणी वाढेल. पण सध्याच्या अपुऱ्या मुलभूत सुविधा पाहता शैक्षणिक लक्ष्य पूर्ण होईल का याची शंका आहे
>जुनी शिक्षण पद्धती : देशात शिक्षणाच्या प्रत्येक पातळीवर जुन्या पॅटर्न आणि पुरातन पद्धतीचाच वापर केला जात अाहे तंत्राच्या वापरात तर आम्ही बरेच मागे आहोत. या मुळेच पारंपारिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण यांची नाळ जोडण्यात अडचणी येत आहेत.
पुढे वाचा, फायदा : स्वस्त आणि सहज होईल शिक्षण