आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divy Education Article About UGC, NET Of JRF And Professor

Divy Education:जेआरएफ आणि प्राध्यापक पदासाठी सीएसआयआर-यूजीसी नेट 22 जून रोजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित काही विषयांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि प्राध्यापक पदास पात्र ठरण्यासाठी सीएसआयआर-यूजीसी नेट 22 जून रोजी होईल. त्यासाठी विद्यार्थी 2 मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी, विज्ञानाशिवाय अन्य विषयांत जेआरएफ- नेट प्राप्त करणारे विद्यार्थी प्राध्यापक पदासाठी योग्य असतील. मात्र, त्यासाठी अन्य निकष पूर्ण करावे लागतील. सीएसआयआर ही परीक्षा केमिकल, लाइफ, अर्थ, फिजिकल, मेथॅमॅटिकल, इंजिनिअरिंग, वातावरण, ओशन अ‍ॅँड प्लॅनेटरी सायन्सेससाठी घेतली जाते.
पात्रता
55 टक्के गुणांसह बीटेक, बीई, बीफार्मा, इंटिग्रेटेड बीएस-एमएस किंवा एमएस्सीची पदवी. एससी/ एसटी विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुण आवश्यक आहेत. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या आत पीएचडीसाठी नोंदणी केल्यानंतरच फेलोशिप मिळेल.
वयोमर्यादा
ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी 1 जानेवारी 2014 रोजी 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. प्राध्यापक पदासाठी वयाची अट नाही.
परीक्षा पद्धती
परीक्षेत बहुपर्यायाचे 200 प्रश्न विचारले जातील. ते तीन भागात असतील. भाग ए सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखा असेल. भाग ‘बी’मध्ये विषयाशी संबंधित प्रश्न असतील. भाग ‘सी’मध्ये शास्त्रीय संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारले जातील.
दर महिन्याला 16 हजार रुपये मिळतील
जेआरएफसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे दर महिन्याला 16 हजार रुपये मिळतील. याव्यतिरिक्त 20 हजार रुपये वार्षिक आपत्कालीन निधीही मिळेल. विद्यार्थ्याने पीएचडीसाठी नोंदणी केली असेल तर दोन वर्षांनंतर त्याला सीनियर रिसर्च फेलोशिप (एसआरएफ) मिळू शकते. एसआरएफमध्ये दर महिन्यास 18 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
निकाल : सप्टेंबर, 2014
सीएसआयआर-यूजीसी नेटच्या जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी लॉगऑन करा...
www.divyamarathi.com
डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या यूजी आणि पीजी कोर्सेसमध्ये प्रवेश
पुण्याच्या डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीमध्ये मेडिसिन, टेक्नॉलॉजी आणि नर्सिंगच्या अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीबीएस आणि बीडीएससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे आहे. अन्य सर्व कोर्सेससाठी विद्यार्थी 22 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. सर्व कोर्सेसमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारावर होईल. एमबीबीएस आणि बीडीएससाठी प्रवेश परीक्षा 22 मे रोजी अन्य कोर्सेससाठी 22 जून रोजी होईल. काही कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी मुलाखत आणि ग्रुप डिस्कशनही केले जाईल.
पात्रता
एमबीबीएस : फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये 50 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावे.
एमबीए : 45 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी.
एमटेक इंटिग्रेटेड (बायोटेक्नॉलॉजी) : पीसीबीमध्ये 50 टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावे.
शुल्क
डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस कोर्सचे वार्षिक शुल्क 8 लाख 25 हजार रुपये, बीटेक कोर्ससाठी एक लाख रुपये आणि बीडीएसचे 3 लाख 70 हजार रुपये आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस कोर्सचे वार्षिक शुल्क साधारण 16 हजार रुपये आणि बीटेक कोर्सचे साधारण 1 लाख रुपये आहे.
गोल्डफिशची स्मरणशक्ती कमकुवत नसते
गोल्डफिश कोणतीही गोष्ट तीन सेकंदांपर्यंतच लक्षात ठेवू शकतो हे साधारणपणे मानले जाते. मात्र, अन्य माशांच्या तुलनेत गोल्डफिशची स्मरणशक्ती कमकुवत नसते तसेच तो अनेक वर्षापर्यंत वस्तू लक्षात ठेवू शकतो ही वस्तुस्थिती आहे. प्रशिक्षण दिल्यास ते रंग, प्रकाश, संगीत आदी ओळखू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. गोल्डफिशला घरी ठेवण्याची परंपरा चीनमध्ये इ.स.पूर्व 265 ते 420 असल्याचे सांगितले जाते. पिवळ्या आणि सोनेरी रंगाचे गोल्डफिश पाळण्याची सुरुवात तेथेच झाली. मात्र, सन 1162 मध्ये शुंग राजवंशच्या काळात सामान्य लोकांना पिवळ्या रंगाचे गोल्डफिश घरी ठेवण्यास मनाई करण्यात आली. चीनमध्ये तेव्हा पिवळा रंग राजकीय शक्तीचे प्रतीक होते. त्यामुळे केवळ राजघराण्यातील व्यक्तीच पिवळ्या रंगाचे गोल्डफिश पाळू शकत होते.
फ्रेंच टोस्टची सुरुवात फ्रान्समध्ये झाली नाही
फ्रेंच टोस्ट तयार करण्याची सुरुवात इटलीमध्ये झाली होती अशी शक्यता आहे. असे असले तरी त्याचे सबळ पुरावे नाहीत. मात्र, चौथ्या शतकातील एपिसियसने आपल्या पुस्तकात यावर प्रकाश टाकला आहे. तेव्हा देश म्हणून फ्रान्सचा जन्मही झाला नव्हता. रोमन लोक काही वेळेसाठी ब्रेड दूध आणि अंड्याच्या मिश्रणात ठेवत होते. त्यानंतर ते भाजले जात होते. फ्रेंच टोस्ट बनवण्याच्या या कृतीला पॅन डलसिस म्हटले जात होते.