आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशात जाऊन शिक्षण -1

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून वाचा परदेशी विद्यापीठातील व आघाडीच्या महाविद्यालयांतील प्रवेशासाठी अनिवार्य परीक्षांची माहिती..

टॉफेल
90 टक्के विद्यार्थ्यांना अव्हरेज स्कोअर, आघाडीच्या महाविद्यालयांत प्रवेश पात्र गुण केवळ 20 टक्के जणांनाच

टेस्ट ऑफ इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज
(टॉफेल) विद्यार्थ्यांची इंग्रजी ऐकणे, समजणे, लिहिणे व बोलण्याची क्षमतेला अंकित करते. यंदा देशभरात 30 शहरांत 16 ऑगस्ट ते 24 नोव्हेंबरपर्यंत ही परीक्षा होईल. त्यात सामील सुमारे 90 टक्के भारतीय विद्यार्थी सामान्य गुण संपादन करतात. परंतु आघाडीच्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक गुण मात्र केवळ 20 टक्के विद्यार्थ्यांकडेच असतात.

गुण : कोणत्याही एखाद्या गुणाला चांगले किंवा अव्वल म्हणून मानले जात नाही. प्रत्येक संस्थेचे आपले निकष व कट ऑफ असतो.

शुल्क : एक विद्यार्थी टॉफेल परीक्षा अनेकवेळा देऊ शकतो. परंतु महिन्यातून केवळ एकदाच ती देता येते. ऑनलाइन परीक्षेचे शुल्क प्रत्येक देशांत सुमारे 160 ते 250 डॉलर (10-15 हजार रूपये) असते.

परीक्षा पद्धती
चार ते साडे चार तासांच्या परीक्षेत रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग व लिसनिंग विभाग असतात.
60-80 मिनिटांच्या विभागामध्ये जवळपास 36 ते 56 प्रश्न असतात. तीन-चार उतारे वाचून त्यावर उत्तरे द्यावी लागतात.
60-90 मिनिटच्या विभागात 34-51 प्रश्न असतात. क्लासरुम डिस्कक्शन आणि लेक्चर्स ऐकून उत्तरे द्यावी लागतात.
20 मिनिटाच्या भागात 6 गोष्टी कराव्या लागतात. यामध्ये कोणत्याही एका विषयावर आपले विचार मांडावे लागतात.
50 मिनिटांच्या या भागात दोन टास्क असतात. यामध्ये दोन विषयावर ध्वनीमुद्रण ऐकून निबंध लिहावा लागतो.

बदल : मार्च 2013 पासून लिसनिंग आणि स्पीकिंग भागामध्ये चांगले सादरीकरण त्याच विषयातील शिक्षकांचे लेक्चर्स अपलोड केले आहेत.

तीन ते सहा तज्ज्ञ स्कोअरिंग करतात
अनेक प्रवेश परीक्षेमध्ये तोंडी मुलाखतही घेतली जाते. मात्र, स्कोरिंग पारदर्शक व्हावी व योग्य गुण मिळावेत यासाठी सर्व उत्तरे ध्वनीमुद्रीत केले जातात व ते तीन ते सहा तज्ज्ञांना ऐकवली जातात. यानंतर अंतिम गुण दिले जातात.

परीक्षेवेळी नोट्स घेऊ शकता
परीक्षेवेळी उत्तर लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. उत्तर देताना उपयोग होईल अशा महत्त्वपूर्ण नोट्स लेक्चर ऐकून लिहून घेऊ शकता.

टॉप यूनिव्हर्सिटीमध्ये किमान टॉफेल गुण
स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटी 100
कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी 84-100
मॅसाचसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 90
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले 79
यूनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय 79

टॉफेल, सॅट आणि एपीमध्ये 100 % स्कोअर
दिल्लीच्या श्रेया वर्धनने 2012 मध्ये टॉफेलमध्ये 100 टक्के गुण मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी अनेक विद्यार्थ्यांनी या चाचणीत 98-99 टक्के गुण घेतले होते. मात्र, कोणीही 100 टक्के गुण मिळवले नाहीत. श्रेयाचे वेगळेपण यासाठी आहे की, तिने टॉफेलसोबत सॅट(एसएटी) रिझनिंग टेस्ट आणि एपी(अ‍ॅडव्हान्स प्लेसमेंट) चाचणीतही 100 गुण मिळवले आहेत. श्रेयाचे वडिल लष्करामध्ये कर्नल आहेत, तर आई शिक्षिका व सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे. सन 2010 मध्ये वडीलांची बदली दिल्लीला झाली आणि श्रेया दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी झाली. या यशामुळे तिला एकाच वेळी हॉर्वड, कोलंबिया, कॉर्नेल, येल आणि प्रिसंटन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी निमंत्रण मिळाले होते. श्रेयाने स्वयं अध्ययनातून यश मिळवले होते. ती पुढे फिजिक्समध्ये संशोधन करणार आहे.