आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणा आयआयटीच्या एमटेक कोर्समध्ये प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीच्या कोर्समधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी त्यासाठी 29 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश गेटच्या वैध स्कोअर आणि मुलाखतीच्या आधारे होईल. या माध्यमातून विद्यार्थी मॅकेट्रॉनिक्स, मॅथ्स अ‍ॅँड कॉम्प्युटिंग, नॅनोसायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅँड इंजिनिअरिंग, कम्युनिकेशन सिस्टिम, मॅकॅनिकल, सिव्हिल आणि मटेरिअल्स सायन्स अ‍ॅँड इंजिनिअरिंगमध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकतात.

पात्रता
60 टक्के अंकांसह इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञानाच्या कोणत्याही शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 55 टक्के अंक आवश्यक. याबरोबर गेटचा वैध स्कोअर. आयआयटी संस्थांमधून बीटेक करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गेट स्कोअर बंधनकारक नाही, मात्र त्यांनी अन्य अटींची पूर्तता करावी.

निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना गेट स्कोअरच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल. गुणवत्ता यादी या दोन्हींना मिळून बनवली जाईल. मुलाखत 19 ते 30 मेपर्यंत होण्याची शक्यता आहे. गुणवत्ता यादीत 70 टक्के महत्त्व गेट स्कोअर आणि 30 टक्के महत्त्व मुलाखतीसाठी दिले जाईल.

शुल्क पाटणा आयआयटीमध्ये एमटेक कोर्सची ट्यूशन फीस 5 हजार रुपये प्रतिसेमिस्टर आहे. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना जवळपास 26 हजार रुपये भरावे लागतील. यामध्ये निवास आणि जेवणाच्या खर्चाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एमटेकच्या विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये असिस्टंटशिप मिळते. आयआयटी, जोधपूरमध्ये एमटेक कोर्सची प्रतिसेमिस्टर ट्यूशन फीस 21 हजार रुपये आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रमाणपत्र पाठ्यक्रमात प्रवेश
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, आगरतळामध्ये थिएटर-इन- एज्युकेशनच्या प्रमाणपत्र पाठ्यक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेशासाठी नाटकाचा किंवा शिकवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा कोर्स एक वर्ष मुदतीचा आहे.

पात्रता
कोणत्याही शाखेच्या पदवीसोबत नाटक किंवा शालेय स्तरावर शिकवण्याचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया
अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना एका कार्यशाळेत सहभागी व्हावे लागते. कार्यशाळा 2 ते 4 दिवसांपर्यंत चालेल. याच्या आधारावर एक तज्ज्ञ समिती विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करेल.

शिष्यवृत्ती आणि शुल्क
थिएटर-इन-एज्युकेशन कोर्ससाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्यास 4500 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. एनएसडीमध्ये शुल्क खूप कमी असते. वेशभूषा, वसतिगृह, ट्यूशन आणि खर्चांसाठी विद्यार्थ्यांना वार्षिक साधारण 4 हजार रुपये द्यावे लागतात.