आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीआयआय, पुणेच्या फिल्म व टेलिव्हिजन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथील सर्टिफिकेट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 3 मे पर्यंत अर्ज करता येतील. सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यासाठी प्रवेश परीक्षा 15 जूनला आयोजित केली जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रपटांसाठी पटकथा लिखाण (स्क्रीनप्ले रायटिंग), दिग्दर्शन (डायरेक्शन), छायांकन (सिनेमॅटोग्राफी), संकलन (व्हिडिओ एडिटिंग) आणि ध्वनिमुद्रण (साऊंड रेकॉर्डिंग) या अभ्यासक्रमांच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी प्रवेश दिला जाईल.

पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी. टीव्ही इंजिनिअरिंग कोर्ससाठी 10+2 पातळीवर फिजिक्स विषय असणे अनिवार्य.

निवड प्रक्रिया
प्रवेश प्रक्रियेच्या आधारे विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाते. दोन्हीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होते.

परीक्षा पद्धती
परीक्षेत वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक असे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सामान्य ज्ञान व मानसिक आकलन क्षमतेवर आधारित असतील. प्रत्येक कोर्सच्या पेपरमध्ये माध्यमांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.

शुल्क
एफटीआयआय मध्ये सर्व अभ्यासक्रमांसाठीचे वार्षिक शुल्क 33 हजार ते 2 लाखांच्या दरम्यान आहे. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता येथे या अभ्यासक्रमांचे शुल्क 40 हजार रुपये आहे.

सिम्बायोसिस लॉ स्कूलच्या अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे येथील बीए-एलएलबी आणि बीबीए-एलएलबी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी यासाठी 15 मेपर्यंत अर्ज करू शकतात. सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी सिम्बायोसिस प्रवेश प्रक्रियेच्या आधारावरच प्रवेश मिळतात. ही प्रवेश परीक्षा (एसईटी) 3 मे रोजी होईल. एसईटीच्या स्कोरच्या आधारे अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना पर्सनल इंटरॅक्शन आणि रायटिंग अ‍ॅबिलिटी परीक्षेच्या आधारे निवडले जाईल.

पात्रता
कोणत्याही शाखेतून 10+2 पातळीवर 45 टक्के अंक घेऊन उत्तीर्ण असावे. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण गरजेचे. या वर्षी बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीदेखील अर्ज करण्यास पात्र.

निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादी तयार करताना 50 टक्के महत्त्व एसईटी स्कोर आणि 50 टक्के पर्सनल इंटरॅक्शन व लिखाण क्षमतेला असेल. पर्सनल इंटरॅक्शन आणि रायटिंग अ‍ॅबिलिटी टेस्ट 30 मे ते 6 जून दरम्यान होईल.

शुल्क
सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये बीए-एलएलबी आणि बीबीए-एलएलबी अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क 2 लाख 35 हजार रुपये आहे. राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पतियाळा येथे अंडरग्रॅज्युएट कोर्सचे वार्षिक शुल्क 1 लाख 80 हजार रुपये तर गांधीनगरमध्ये 1 लाख 60 हजार रुपये आहे.