आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: जाहिरात उद्योग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरीसाठी मोठी स्पर्धा
देशातील जाहिरात उद्योग गेल्या 20 वर्षांत तेजीने विकसित होत आहे. जाहिरातीवर होणारा खर्च 1992 मध्ये 1800 कोटींपासून 2007 मध्ये 13 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. 15 टक्के वार्षिक दराने यात वाढ होत आहे. लोकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेतील वाढ आणि पाश्चिमात्य देशाच्या प्रभावामुळे देशातील जाहिरात उद्योगात वृद्धी होत आहे. परिणामी या क्षेत्रात रोजगारही वाढत आहेत. परंतु तरीही या क्षेत्रात नोकरी मिळणे कठीण असते. शिक्षणाबरोबर सर्जनशीलतेला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे चांगले पॅकेज मिळण्यात अडचणी येतात. याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
करिअरचे पर्याय
जाहिरात एजन्सीमध्ये अनेक नोक-या आहेत. मात्र, इथे कोणाला सहजासहजी नोकरी मिळत नाही. या क्षेत्रात कंपनी, पद आणि शिक्षणसोबत आपल्या कामानुसार वेतन ठरते. फ्रेशर्सना सुरुवातीचा पगार फक्त पाच हजार रुपये प्रतिमहिना असतो. एखाद्या मोठ्या एजन्सीमध्ये नोकरी लागल्यास लाखो रुपयांचे पॅकेज मिळू शकते. त्यासाठी मात्र अनेक वर्षांचा अनुभव असावा लागतो. प्रत्येकाची सर्जनशील विचाराची क्षमता वेगवेगळी असते. याची दुस-याशी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे कॉलेज प्लेसमेंट दरम्यान हजारो विद्यार्थ्यांमधून एक-दोन जणांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळू शकते. लहान कंपन्यांमध्ये खूप कमी पॅकेज असते.
सर्जनशीलता
जाहिरात संस्थेमध्ये क्रिएटिव्ह टीममध्ये कॉपी रायटर किंवा आर्ट डायरेक्टर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे कुठलीही विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक ठरत नाही. केवळ सर्जनशील दृृष्टिकोन पाहिला जातो. कम्युनिकेशन डिझाइन किंवा फाइन आटर््समध्ये कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
सुरुवातीचा पगार
8 ते 10 हजार रुपये.
क्लायंट सर्व्हिसिंग
क्लायंट आणि क्रिएटिव्ह टीमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी ही व्यवस्था असते. यासाठी एमबीए किंवा मास्टर्स इन अ‍ॅडव्हर्टायझिंगची पदवी आवश्यक असते. रिसर्च आणि स्टॅटिस्टिक्सची पार्श्वभूमी असणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
सुरुवातीचा पगार
8 ते 12 हजार रुपये
अकाउंट प्लानिंग
जाहिरात प्रचाराच्या खर्चासाठी याची आवश्यकता. जाहिरात किंवा मास कम्युनिकेशनची पदवी पुरेशी आहे.
सुरुवातीचा पगार
8 ते 13 हजार रुपये.
सर्वाधिक 70 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज राहिले, मात्र 300 विद्यार्थ्यांपैकी ते दोघांनाच मिळाले
आंतरराष्‍ट्रीय जाहिरात कंपन्याही भारतात सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये प्लेसमेंटसाठी येतात. यावर्षी आयआयटी कानपूरचे दोन विद्यार्थी- प्रियंका लढ्ढा आणि प्रखर बंग यांना अमेरिकेच्या टेक्नॉलॉजी अ‍ॅँड कंपनी रॉकेट फ्यूलने 1.30 लाख अमेरिकी डॉलर म्हणजे 70 लाख रुपये वार्षिक पॅकेज दिले. मात्र, विदेशातील प्लेसमेंटमुळे दोन विद्यार्थी अमेरिकेत नोकरी करतील. प्लेसमेंटमध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
या इन्स्टिट्यूट्समध्ये कोर्स,
प्रवेश मिळवणे मात्र कठीण
देशातील या आघाडीच्या संस्थांपैकी आहेत. परंतु जाहिरात क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा या महाविद्यालयांतील प्रवेश परीक्षेतूनच स्पर्धेशी तोंड द्यावे लागते. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देतात, परंतु जागा मात्र 10-12 असतात. परीक्षेला पात्र ठरल्यानंतर आर्टिस्टिक अ‍ॅबिलिटी पाहण्यासाठी पोर्टफोलिओ शॉर्टलिस्ट केला जातो. नंतर निवड होते.
आयआयएमसी दिल्ली
मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अहमदाबाद
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हर्टाझिंग दिल्ली
नरसी मोंजी मुंबई
सेंट झेव्हियर्स कॉलेज मुंबई
सरासरी फीस- 70 हजार रुपये
टॉप कंपन्या प्लेसमेंटसाठी
> ओजिल्वी अँड मॅथर- 100 हून अधिक देशांत उपलब्ध.
> मुद्रा कम्युनिकेशन- देशातील टॉप अ‍ॅड एजन्सीपैकी एक.
> जेडब्ल्यूटी- कान अवॉर्डमध्ये अनेक वेळा विजयी.
> मॅक कॅन इरिक्सन इंडिया- ग्लोबल अ‍ॅड एजन्सी.
> लोव्ह लिंटास- मोठी कंपनी. उदा.-आयडिया, आयसीआयसीआय, प्रुडेन्शियल इत्यादी त्याचे क्लायंट स्रोत- ब्रँड इक्विटी