आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Answer Regarding Education Field

दिव्य एज्युकेशन: शिक्षणासंबंधित प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध करिअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे
० पीसीएममध्ये 10+2 केल्यानंतर अ‍ॅनिमेशनमध्ये कसे करिअर करता येईल?
पेंटिंग, ड्राइंग, संगणकाची आवड व सर्जनशीलता गुण असलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशनमधील करिअर चांगला पर्याय आहे. विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशनमध्ये पदवी घेता येते. मात्र, भारतात खूप कमी ठिकाणी हा कोर्स उपलब्ध आहे. याऐवजी आपण फाइन आर्टस्चा पदवी अभ्यासक्रम करू शकता. हा कोर्स तीन वर्षाचा आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅनिमेशनचा डिप्लोमा कोर्स अनेक अ‍ॅनिमेशनमध्ये संस्थांत आहे. त्यासाठी बारावीत किमान 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक.
० चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट कोर्स कुठे आहे आणि त्यानंतर नोकरीच्या संधी किती?
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायानान्शियल अ‍ॅनालिस्ट ऑफ इंडियामध्ये हा कोर्स करता येईल. या संस्थेच्या शाखा अनेक ठिकाणी आहेत. कोर्सनंतर आयटी व रिसर्च कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. नव पदवीधारकांना पाच लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. सिटी बॅँकसारख्या कंपन्या अनुभवी उमेदवारांना 20-25 लाखांपर्यंत पॅकेज देतात.
० बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना एअरलाइन्स कंपन्यांमध्ये कोणत्या संधी आहेत?
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विमान वाहतूक कंपन्यांमध्ये एव्हिएशन इंजिनिअर, मेंटेनन्स इंजिनिअर, कार्गो एजंट, सिक्योरिटी एजंट, केबिन कू्र, ह्यूमन सिक्योरिटी एक्झीक्युटिव्ह, मार्केटिंग पर्सनल, ऑपरेशन मॅनेजर, प्लाइट टेक्निशियन आदी विभागात करिअर करता येईल. यातील काही पदांसाठी पदवी आवश्यक आहे. शिवाय शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असणे आवश्यक.
० मी बारावीचा विद्यार्थी आहे. मला स्टॅटिस्टिक्सची आवड आहे, यात करिअर करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी आतापासून काय करावे लागेल?
स्टॅटिस्टिक्समध्ये करिअर करण्यासाठी गणित व गणितीय क्षमता, विश्लेषण कौशल्य आणि आकडेवारीची आवड असली पाहिजे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टॅटिटिक्समध्ये पदवी घेऊ शकता. इंडियन स्टॅटिटिकल इंस्टिट्यूट, कोलकाता स्टॅटिटिक्समधील अभ्यासासाठी सर्वोत्कृष्ट संस्था आहेत. या संस्थाची प्रवेश परीक्षा असते. शिक्षणानंतर एक्युचरीचा व्यवसायही करता येऊ शकेल.
० मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. एमएस्सी करण्याची माझी इच्छा आहे, मात्र विषय निवड होऊ शकत नाही. माझ्याकडे बॉटनी, झुलॉजी, बायोकेमेस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, फूड व न्यूट्रिशन यासारखे पर्याय आहेत. नेमके काय करावे, सल्ला हवा आहे.
तुम्ही पुढे काय करणार यावर एमएस्सीचा विषय निवडा. टिचिंग किंवा संशोधन कार्यात रस असेल तर आपण आवडीचा कोणताही विषय घेऊ शकता. बायोकेमेस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, फूड व न्यूट्रिशन नवे पर्याय आहेत. मात्र, उद्योग क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी आहेत.


दिव्य मराठी तज्ज्ञ समिती
मनोज शर्मा, शिक्षण
तज्ज्ञ, नवी दिल्ली


मुकेश बंसल
करिअर कौन्सिलर, जोधपूर


ज्ञान
मनुष्याला पाषाण युगाआधीही
अ‍ॅनिमेशनची माहिती
केवळ कार्टूनच्या रूपात ओळखले जाणारे अ‍ॅनिमेशन हे वास्तवात कोणत्याही वस्तूची एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी जातानाची रेकॉर्डिंग असते. मनुष्याला पाषाण युगाच्या आधीही अ‍ॅनिमेशनची माहिती होती. प्राचीन गुहांमध्ये चालणा-या प्राण्यांची अनेक चित्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे या प्राण्याला चारपेक्षा जास्त पाय होते. ज्या चित्रकारांनी हे चित्र तयार केले, त्यांना चालणारा प्राणी दाखवायचा होता हे संशोधनाअंती आढळून आले. इराणच्या शहर-ए- शुक्तेह शहरात मिळालेल्या टोपल्यामध्ये अशीच चित्रकृती सापडली.त्यात बोकड चारा खात असताना दाखवण्यात आले होते. चित्रपट सुरू झाल्यानंतर स्टॉप मोशन अ‍ॅनिमेशन व पपेट अ‍ॅनिमेशन सुरू झाले. 1923 मध्ये वॉल्ट डिस्ने यांनी आपला स्टुडिओ सुरू केला व एलिस कॉमेडिज नावाची मालिका सुरू केली. यात वास्तवातील एक मुलगी अनेक व्यंगचित्रात्मक पात्रांशी बोलत असताना दाखवली होती. स्नो व्हाइट अ‍ॅँड द सेव्हन ड्वार्फ हा चित्रपट सर्वांत यशस्वी व लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड चित्रपट मानला जातो. 1995 मध्ये तयार झालेला टॉय स्टोरी पहिला संगणकावर आधारित अ‍ॅनिमेटेड चित्रपट होता.


इंटरेस्टिंग कोट
“It is too late to be studying Hebrew; it is more important to understand even the slang of today.” - Henry David Thoreau
हिब्रूसारख्या अज्ञात व प्राचीन भाषेचा अभ्यास करण्याची ही वेळ नाही. आपल्या भाषेचे पैलू समजून त्यांना स्वीकारण्याचा हा काळ आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com