आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Answers Regarding Commerce Accounting Career Field

दिव्य एज्युकेशन: कॉमर्स-अकाउंटिंगमधील करिअरशी संबंधित प्रश्नोत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य एज्युकेशनच्या वाचकांचे प्रश्न ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून सातत्याने मिळत आहेत. यातील निवडक प्रश्नांची उत्तरे आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने देत आहोत. आज जाणून घ्या वाणिज्य आणि अकाउंटिंगमधील करिअरशी संबंधित प्रश्नाची उत्तरे...
० चार्टर्ड अकाउंटन्सी आणि कॉस्ट अकाउंटन्सी यात फरक काय? दोन्हींपैकी कोणत्या कोर्समध्ये नोकरीची हमी आहे?
कॉस्ट अकाउंटंट मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी आवश्यक आहेत. या अभ्यासक्रमात उत्पादनावरील खर्चाचे मूल्यमापन केले जाते. अनेक कंपन्यांसाठी कॉस्ट ऑडिटिंग अनिवार्य करण्यात आल्यानंतर कॉस्ट अकाउंटंट क्षेत्रातील संधी वाढल्या आहेत. दुसरीकडे चार्टर्ड अकाउंटंटचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारू लागले आहे. वित्त आणि ऑडिट प्रकरणात आपले खाते ऑडिट करण्यासाठी कंपनीला प्रमाणित सीएची गरज असते. दोन्ही अभ्यासक्रम नोकरीच्या दृष्टीने उत्तम आहेत. दोन्ही कोर्समध्ये सुरुवातीला 30 ते 40 हजार रुपये प्रतिमहिना पॅकेज मिळते.
० चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट कोर्सबद्दल माहिती द्या.
भारतात चार्टर्ड फानान्शियल अ‍ॅनालिस्ट कोर्ससाठी दोन संस्था कार्यरत आहेत- सीएफए इन्स्टिट्यूट, यूएस (इंटरनॅशनल सीएफए) आणि आयसीएफएआय विद्यापीठ (इंडियन सीएफए). इंटरनॅशनल सीएफएची पदवी चांगली मानली जाते. कारण त्याला 138 देशांची मान्यता आहे. अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी पदवी आणि 4 वर्षांच्या कामाचा अनुभव आवश्यक आहे. आयसीएफएआय विद्यापीठ, सीएफए कोर्ससाठी देशातील आघाडीच्या संस्था आहेत.
० मला बारावी परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले आहेत. उद्योग क्षेत्रातील नोकरीच्या दृष्टीने कोणता अभ्यासक्रम करावा- बी.कॉम (ऑनर्स) की अर्थशास्त्र (ऑनर्स)? जर बी.कॉम ऑनर्स केले, तर पुढे सीए किंवा सीएसशिवाय इतर पर्याय आहेत का?
बी.कॉम किंवा इकॉनॉमिक्स ऑनर्स करिअरच्या दृष्टीने दोन्हीही चांगले पर्याय आहेत. कारण उद्योगांव्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांतही अशा विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत. आपला कल लक्षात घेऊन विषयाची निवड करता येईल. अर्थशास्त्रात पदवी केल्यानंतर एमए करता येऊ शकते आणि मायक्रो इंडस्ट्रियल किंवा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन करता येते. एमबीए आणि विधीशिवाय बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरीशिप, चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्टसारखे पर्यायदेखील आहेत. बी.कॉम ऑनर्स केल्यानंतरही सीए / सीएस शिवाय वाणिज्य नसलेलेदेखील पर्याय उपलब्ध आहेत.
० वाणिज्य शाखेत मी बारावी करत आहे आणि इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये मला करिअर करण्याची इच्छा आहे. यासाठी आवश्यक अर्हता काय आहेत?
इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंटची एक विशेष शाखा आहे. बी. कॉम, बीबीए किंवा बीए अर्थशास्त्र केल्यानंतर एमबीए फायनान्स करून त्यात प्रवेश घेता येऊ शकतो. अनेक महाविद्यालयांत फायनान्स स्पेशलायझेशनसह बीबीए कोर्सदेखील उपलब्ध आहेत. पदवी पूर्ण केल्यानंतर फायनान्स अँड कन्ट्रोल, इक्विटी रिसर्च, कॅपिटल मार्केट्स इत्यादी विशेष अभ्यासक्रम करूनही इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये करिअर करता येऊ शकते.
० मी बी.कॉम ऑनर्ससह सीएस कोर्स करतोय. गेल्या वेळी सीए-सीपीटी दिली होती; परंतु त्यात यश आले नव्हते. त्यासाठी मला पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत का? माझ्यासाठी सीए किंवा सीएसपैकी योग्य काय असेल?
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सीए व्यतिरिक्तही अनेक अभ्यासक्रम आहेत. उदाहरणार्थ- बँकिंग अँड फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट, विमा, रिस्क व्यवस्थापनाचा पदविका अभ्यासक्रम किंवा कॉस्ट अकाउंटन्सी, चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट कोर्स इत्यादी. तुम्ही हा कोर्स बी.कॉमसह किंवा त्याच्यानंतरही करू शकता. कंपनी सचिव कंपनीच्या फायनान्शियल आणि कायदेशीर सल्लागारासारखा असतो, तर चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट फायनान्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये प्रशिक्षित असतो. सीए, सीएस किंवा कॉस्ट अकाउंटन्सी अभ्यासक्रमात नोकरीच्या अनेक संधी आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.
‘दिव्य मराठी’ विषयतज्ज्ञ
निरंजन शास्त्री, माजी अध्यक्ष, आयसीएआय, इंदूर-देवास चॅप्टर, ओ.पी. माहेश्वरी, चार्टर्ड अकाउंटंट, जोधपूर
10 हजार कोटी रुपये परदेशी शिक्षणावरील भारतीय विद्यार्थ्यांचा खर्च
असोचेमच्या पाहणीनुसार भारतातून दरवर्षी सुमारे 8 लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात; परंतु परदेशातील शिक्षण महागडे आहे. आयआयटीमध्ये शिकणारे विद्यार्थी दर महिन्याला सुमारे 10 हजार रुपये फीस देतात; परंतु त्याच कोर्ससाठी परदेशात महिन्याला 15 हजार रुपये मोजावे लागतात. भारतीय विद्यार्थी एकूण सुमारे 10 हजार कोटी रुपये परदेशी शिक्षणावर खर्च करतात.
जेईई अर्जासाठी शेवटची तारीख
आता 5 जानेवारी
आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणा-या प्रवेश परीक्षेत ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी अशी करण्यात आली आहे. आतापर्यंत याची शेवटची तारीख 26 डिसेंबर होती. ही परीक्षा 25 मे रोजी होईल. त्यात अव्वल 1.5 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये सहभागी करून घेण्यात येईल.
तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. देशातील प्रमुख समुपदेशक आणि विषयतज्ज्ञ त्याचे उत्तर देतील. ते वेळोवेळी जाहीर केले जाईल.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com