आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Answers Regarding Language Career

दिव्य एज्युकेशन : भाषा विषयातील करिअरशी संबंधित प्रश्नोत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य एज्युकेशनकडे सातत्याने एसएमएस आणि ई-मेलद्वारे वाचकांचे प्रश्न प्राप्त होत आहेत. मागील दोन महिन्यांत मिळालेल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या मदतीने येथे देत आहोत. भाषा विषयातील करिअरशी संबंधित काही निवडक प्रश्नांची ही उत्तरे...
@ मला इंग्रजी वाङ्मयात रस आहे आणि याच विषयात मी करिअर करू इच्छितो. सध्या मी इंग्लिश ऑनर्स करत आहे. कॉर्पोरेट जगतात माझ्यासाठी नोकरीच्या कोणत्या शक्यता आहेत?
इंग्रजी वाङ्मयातील विद्यार्थ्यांसाठी ज्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट लेखन-वाचन कौशल्याची आवश्यकता असते, अशा क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी आहेत. उदा.- जाहिरात, जनसंपर्क, पत्रकारिता, चित्रपट निर्मिती, सर्जनशील लेखन, शिक्षण, विधी, शिष्टाचार, मनुष्यबळ व्यवस्थापन इत्यादी. मात्र प्रत्येक वेळी पॅकेज मोठे असेलच असे नाही. प्रारंभिक वेतन 8-10 हजार रुपयांपासून 40 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
@ मी लेडी श्रीराम कॉलेजची वाङ्मयाची विद्यार्थिनी आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी कोलंबिया, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित अमेरिकी संस्थांमध्ये अर्ज करू इच्छिते. या संस्थांमध्ये प्रवेशासाठी केवळ चांगला स्कोअर असणेच पुरेसे आहे की चांगल्या महाविद्यालयातून पदवी संपादन केल्याचाही फायदा होऊ शकतो?
परदेशांमध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय रँकिंगलाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतल्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रत्येक विद्यापीठाचे स्वत:चे असे नियम असतात, परंतु चांगल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबरोबरच उत्कृष्ट जीआरई आणि टॉफेल स्कोअर अनिवार्य असतो. जर तुमचा निकाल चांगला नसेल तर त्याची भरपाई जीआरई आणि टॉफेल स्कोअरद्वारे करू शकता. परंतु दोन्हीही महत्त्वाचे आहेत.
(परदेशातील शिक्षणाबाबतचा सविस्तर तपशील 14 ते 20 ऑगस्टदरम्यान ‘परदेशात जाऊन शिक्षण’ या मालिकेत प्रकाशित करण्यात आला आहे. तपशिलासाठी लॉग इन करा : www.divyamarathi.com)
@ मी जर्मन भाषेतील प्रगत पदविका अभिक्रम केलेला आहे. या विषयातील एम.ए. दूरस्थ अभिक्रम कोठून करता येईल?
जर्मन भाषा अध्यापनासाठी गोएथ इन्स्टिट्यूट (मॅक्सम्युलर भवन) देशातील अग्रणी संस्था आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मूक्त विद्यापीठ आणि व्हिएन्ना विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट ऑफ जर्मन लँग्वेजमध्ये पदविका अभिक्रम शिकवण्यात येतो. या अभिक्रमाला प्रवेशासाठी पदवीबरोबरच जर्मन भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, मुंबई ,नवी दिल्लीमध्ये संस्थेचे सहा कॅम्पस आहेत.
@ मी इंग्लिश ऑनर्सचा विद्यार्थी आहे. मी लेक्चरर बनू इच्छितो. एम. ए.ला प्रवेशासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
बहुतांश अग्रणी महाविद्यालयांतील एम.ए.च्या (इंग्लिश) प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यासाठी कोणत्याही विषयातील 55 टक्के गुणांसह पदवी अनिवार्य आहे. लेक्चरर होण्यासाठी पदव्युत्तर पदवीला 55 टक्के गुणांसह यूजीसीकडून घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
@ कला शाखेतील पदवीधर आहे. पदवीला मी इंग्रजी विषय घेतलेला नाही, परंतु इंग्लिशवर चांगले प्रभुत्व आहे आणि त्यातच करिअर करू इच्छितो.
तुमच्यासाठी भाषा प्रशिक्षक बनणे हा पर्याय होऊ शकतो. त्याशिवाय तुम्ही कॉल सेंटरमध्येही काम करू शकता. त्याचबरोबर तुमची इंग्रजी सुधारण्यासाठी टीईएसओएल (टीचिंग इंग्लिश टू स्पीकर्स ऑफ लँग्वेज) सारखा एखादा आंतरराष्ट्रीय शिक्षण अभिक्रम केला तर उत्तमच. कॉल सेंटरमध्ये प्रारंभिक वेतन प्रतिमहा 5 ते 10 हजार रुपये असते. मात्र व्यावसायिक इंग्रजी अवगत केल्यानंतर ते वाढू शकते.
दिव्य एज्युकेशन एक्स्पर्ट पॅनल
डॉ. शाहिना तरन्नुम, इंग्रजी विभाग, एएमयू
डॉ. गुलशन कटारिया, भाषा विभाग, पंजाब विद्यापीठ
पंजाबमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल ग्रेस मार्क
पंजाबमधील विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट उपलब्धींचा फायदा शिक्षणात मिळणार आहे. या स्पर्धांमध्ये पहिल्या तीनमध्ये येणा-या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले जातील. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यस्तरीय स्पर्धेतील यशवंताला 15 गुण स्वतंत्र दिले जातील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याला 25 गुण दिले जातील. सरकारी शाळांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य करण्याचीही सरकारची तयारी सुरू आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com