आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीची अधिक
संधी, परंतु प्रवेश कठीण
अन्न आणि प्रक्रिया उद्योगात देशात सुमारे 20 लाख लोकांच्या रोजगाराचे साधन आहे. गेल्या दहा वर्षांत त्यात दरवर्षी अडीच लाख नोक-या तयार झाल्या आहेत. अन्न व प्रक्रिया उद्योगाच्या वाढत्या लोकप्रियतेतून हे घडून आले आहे. वास्तविक, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांचे स्वरूप बदलू लागले आहे. सर्व अभ्यासक्रम तंत्रज्ञानावर आधारित होत चालले आहेत. त्यामुळे नोकरीची संधीदेखील अधिक आहे. परंतु कोर्सच्या प्रवेशाबरोबरच चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवण्यासाठी कडव्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. चला जाणून घेऊया काही कोर्सेसबद्दल..
अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान
@शुल्क सुमारे 2 लाखवव @कालावधी Ñ 4 वर्षे
ग्राहक गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत, हेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे. त्याशिवाय रिटेल उद्योगाच्या विस्ताराबरोबरच अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचे महत्त्वदेखील वाढू लागले आहे. देशातील अन्नपदार्थ उद्योगाची एकूण क्षमता 13.56 अब्ज डॉलर आहे आणि दरवर्षी 17 टक्क्यांनी त्यात वाढ होत आहे. या क्षेत्रात पदवीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना थर्मेडायनॅमिक्स, फूड प्रोसेसिंग, फूड क्वालिटी अॅनालिसिस, मायक्रोबायोलॉजी इत्यादींविषयी शिक्षण दिले जाते. भौतिक, रसायन, गणिताबरोबरच 10+2 पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.
संस्था : जी. बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर
सुरुवातीचे पॅकेज :
3-4 लाख वार्षिक
माहिती सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग
शुल्क : 40 हजार रुपये
कालावधी : सहा महिने
देशात दरवर्षी 77 हजार एथिकल हॅकर्सची गरज भासत असल्याचा दावा नॅसकॉमच्या अहवालातून करण्यात आला आहे. परंतु सध्या केवळ सुमारे 15 हजार व्यावसायिक कार्यरत आहेत. समाजविघातक घटकांपासून संगणकाच्या नेटवर्कला सुरक्षित ठेवण्यासाठी एथिकल हॅकर्स काम करतात. हा सहा महिन्यांचा कालावधी आहे. बीसीए किंवा संगणकशास्त्र किंवा गणितात पदवीधारक विद्यार्थ्याला कोर्समध्ये प्रवेश दिला जातो. कोर्स करण्यात आल्यानंतर नेटवर्क सिक्युरिटी ऑडिटर, सिक्युरिटी ऑफिसर इत्यादी स्वरूपाची नोकरी मिळू शकते.
संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन सिक्युरिटी, मुंबई
पॅकेज : 2-3 लाख वार्षिक.
डिजिटल ग्राफिक तंत्रज्ञान
शुल्क : सुमारे 3 लाख
कालावधी : तीन वर्षे
डिलॉइट आणि असोचेमच्या अहवालानुसार 2010 ते 2013 दरम्यान भारतातील अॅनिमेशन उद्योगाची क्षमता दुपटीने वाढली आहे. मीडिया आणि मनोरंजनाशिवाय मेडिकल, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरसारख्या क्षेत्रातदेखील त्याचा वापर केला जातो. देशात 300 हून अधिक अॅनिमेशन स्टुडिओज आहेत. डिजिटल ग्राफिक टेक्नॉलॉजीचा कोर्स करणारे विद्यार्थी अॅनिमेटर, व्हिज्युअल इफेक्ट डिझायनर, मल्टिमीडिया डिझायनरशिवाय वेब डिझायनिंग, सीडी रोम प्रॉडक्शन, थ्रीडी प्रॉडक्ट मॉडेलिंग क्षेत्रात काम करता येते.
संस्था : झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स, मुंबई
पॅकेज : 2-3 लाख वार्षिक.
क्लिनिकल इंजिनिअरिंग
@शुल्क- सुमारे 70 हजार, कालावधी: अडीच वर्षे.
क्लिनिकल इंजिनिअरिंगचा संबंध मेडिकल उपकरणे आणि साधनांशी आहे. नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्सच्या निकषांवर प्रत्येक रुग्णालयात क्लिनिकल इंजिनिअरची नेमणूक करणे अनिवार्य असते. देशभरात 20 हजारांहून अधिक रुग्णालये आहेत. क्लिनिकल इंजिनिअरिंगच्या एमटेक कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल उपकरणाची देखभाल आणि त्यांना दुरुस्त करण्याचे शिक्षण दिले जाते. आयआयटी, चेन्नईच्या या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञानामध्ये पदवीबरोबरच वैध गेट गुणांची गरज असते.
संस्था : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई
सुरुवातीचे पॅकेज :
6-7 लाख वार्षिक
बुद्धिसंपदा हक्क कायदा
@शुल्क : 1.6 लाख, कालावधी: एक वर्ष
इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स अर्थात बुद्धिसंपदा हक्क कायदा हा संशोधन, साहित्य आणि आर्टिस्टिक वर्क्स, इमेजेस, सिम्बॉल्स आणि नाव यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठ, दिल्लीमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीसंबंधी वैध, तांत्रिक आणि व्यवस्थापनाशी संबंधित पैलूंचा अभ्यास केला जातो. कोर्स करणा-या विद्यार्थ्यांना ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेड सिक्रेट, पेटंट इत्यादीची प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या कायदा शिकवला जातो. सोबतच इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचा व्यावसायिक वापर, परवाना प्रक्रिया, मूल्यांकन आणि पोर्टफोलिओ ऑडिटच्या विस्तारासंबंधीदेखील शिकवले जाते. कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास हा अभ्यासक्रम करता येतो.
संस्था : नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
सुरुवातीचे पॅकेज : 3-4 लाख वार्षिक
22 सीबीएसई विद्यालयांत पुन्हा
सुरू झाला मँडेरिनचा अभ्यास,
चीनहून ट्यूटरला पाचारण
सीबीएसईने देशभरातील 22 शाळांमध्ये मँडेरिनचा अभ्यास नव्याने सुरू केला आहे. सहावी ते आठवीच्या दरम्यान तो शिकवला जाणार आहे. त्यासाठी चीनहून विशेष ट्यूटरला बोलावण्यात आले आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, रायपूर आणि जयपूरमध्ये या शाळा आहेत. अगोदर 2011 मध्ये परदेशी भाषेच्या रूपाने मँडेरिनचा अभ्यास सुरू करण्यात आला होता, परंतु जानेवारी 2012 मध्ये हा निर्णय मंडळाला मागे घ्यावा लागला. कोर्ससाठी प्रशिक्षित शिक्षक मिळत नसल्याची समस्या समोर आली होती. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी म्हणून हा पथदश्री प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी 22 चिनी शिक्षकांची नेमणूक या विद्यालयांमधून करण्यात आली आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.