आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 पर्यंत मिळणार 12 लाख नोकर्‍या, चांगले पॅकेज केवळ 10 टक्के लोकांनाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटेरिअर डिझायनिंगचा संबंध लिव्हिंग स्पेस ठीकठाक करण्याशी आहे. याचा अर्थ, कार्यालय, शॉपिंग स्टोअर, विमानतळ, हॉटेल आदी भागांतील अंतर्गत सजावटीशी आहे. हा डिझायनिंगच्या एका मोठ्या भागाशी संबंधित आहे. 2015 मध्ये जगभरात इंटेरिअर डिझायनिंग इंडस्ट्रीची एकूण बाजारपेठ 2500 अब्ज रुपये असण्याचा अंदाज आहे. हे रिअल इस्टेट विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारतात इंटेरिअर डिझायनिंग उद्योगाचा विस्तार धिम्या गतीने झाला. मात्र, 2013 पासून याच्या स्थितीत सुधारणा होत आहे आणि 2020 पर्यंत या क्षेत्रात जवळपास 12 नव्या नोकर्‍या निर्माण होण्याचा अंदाज आहे.

1980च्या दशकात सुरुवात, आता सस्टेनेबल डिझायनिंगवर भर
भारतात 1980 मध्ये इंटेरिअर डिझायनिंगची सुरुवात एका स्वतंत्र उद्योगाच्या रूपात झाली. त्याआधी तो आर्किटेक्चर शाखेचा भाग होता. नव्या शतकातील सुरुवातीच्या वर्षात यामध्ये एस्थेटिक ट्रेंड्सची सुरुवात झाली आणि डिझायनर्स अ‍ॅसेसरीज आणि एम्बोलिशमेंट्सवर भर दिला जाऊ लागला. यानंतर इंटरअ‍ॅक्टिव्ह डिझाइन्सचा प्रसार वाढला. यामध्ये माणसाच्या वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून डिझाइन केले जाते. सध्याच्या स्थितीत डिझायनर्स सस्टेनेबल डिझायनिंगवर भर देत आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी
इंटेरिअर डिझायनिंग उद्योगाच्या विस्ताराबरोबर यामध्ये नव्या क्षेत्रातील नोकर्‍यांच्या संधी वाढत आहेत. रेसिडेन्शियल डिझायनिंगबरोबर हॉस्पिटल, हॉटेल आणि एन्व्हायर्नमेंटल डिझायनिंगचा कल वाढत आहेत. बांधकाम कंपन्यांमध्येही इंटेरिअर डिझायनर्सची नियुक्ती केली जाते. कोर्स पूर्ण करणारे विद्यार्थी फ्रीलान्स डिझायनर म्हणून काम करू शकतात.
भविष्यात संधी वाढतील, कारण...

नव्या शहरांचा विकास
देशात दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीच्या शहरांची संख्या सतत वाढत आहे. मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारत आहे.

वापर वाढत आहे
हॉस्पिटॅलिटी, पायाभूत सुविधा आणि आरोग्य विभागात इंटेरिअर डिझायनिंगचा वापर वाढला आहे.

व्यावसायिकांचा तुटवडा
2010 मध्ये भारतात दरवर्षी जवळपास एक हजार डिझायनर बाहेर पडतात. चीनमध्ये हे प्रमाण 5 लाख आणि इंग्लंडमध्ये 50 हजार आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com