आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education : रिटेल क्षेत्रातील करिअरची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांत मिळतील एक कोटी नोक-या, चांगले पॅकेज केवळ 20 टक्के उमेदवारांना


देशातील रिटेल बिझनेसचे आधुनिक स्वरूप 1980 च्या दशकात पुढे आले; परंतु सुमारे तीन वर्षांतच हे उगवत्या क्षेत्रांमध्ये समाविष्ट झाले. 2012 मध्ये देशातील रिटेल उद्योगाची एकूण क्षमता 31 हजार अब्ज रुपये होती. 2015 मध्ये 55 हजार अब्ज रुपयांच्या आसपास पोहोचेल. 1998 नंतर वार्षिक 7 टक्के दराने त्यात वाढ झाली; परंतु रिटेल उद्योग अजून तरी शहरी भागातच मर्यादित आहे. देशाच्या रिटेल उद्योगाचा आधार पारंपरिक किरकोळ व्यापारी आहेत. त्यांची संख्या 1 कोटी 20 लाखांहून अधिक आहे. परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आल्यानंतर शहराबरोबरच ग्रामीण भागातही त्याचा विस्तार होणार आहे. सध्या रिटेल उद्योगात 5 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगाराचे हे माध्यम ठरले आहे. 2015 पर्यंत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.


पारंपरिक रिटेल बिझनेस उद्योगाचा आधार
देशातील रिटेल उद्योग संघटित आणि असंघटित क्षेत्रात वाटला गेलेला आहे. भारतात अद्याप परंपरागत रिटेल व्यावसायिकच त्याचा महत्त्वाचा आधार मानला जातो. देशात संघटित रिटेल आतापर्यंत महानगरांपुरताच मर्यादित आहे. संघटित रिटेल साखळी उद्योग दुस-या आणि तिस-या दर्जाच्या शहरांमध्ये विस्तार करण्याच्या तयारीत आहे. 2020 पर्यंत देशात संघटित रिटेल वार्षिक 25 टक्क्यांनी वाढेल आणि त्याची एकूण क्षमता सुमारे 12 हजार अब्ज रुपये होईल. पारंपरिक रिटेल उद्योगाचा विस्तार अपेक्षेनुसार कमी (5 टक्के वार्षिक) असेल; परंतु त्याची एकूण क्षमता 40 हजार अब्ज रुपयांहून अधिक असेल.


भविष्यात वाढतील संधी, कारण...
०देशातील रिटेल उद्योगात संघटित क्षेत्राचा वाटा केवळ 8 टक्के आहे, तर अमेरिकेत त्याचे प्रमाण 85 टक्क्यांहून अधिक आहे. 2020 पर्यंत भारतात हा आकडा 20 टक्के होईल.
०2030 पर्यंत देशात सुमारे 9 कोटी कुटुंबे मध्यमवर्गात दाखल होतील. शहरात राहणारी लोकसंख्या 57 कोटींहून अधिक होईल.
०ऑनलाइन रिटेल वार्षिक 25 टक्क्यांहून अधिक वाढणार आहे. 2011 मध्ये त्याची वार्षिक उलाढाल 2 हजार कोटी होती. जी 2015पर्यंत 7 हजार कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे.


रिटेलिंगच्या कोर्सेसमध्ये प्रत्येक जागेसाठी स्पर्धा
रिटेलिंगशी संबंधित यूजी, पीजी, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स देशाच्या अनेक संस्थांमध्ये आहे. आयआयएम, शिलाँगमध्ये रिटेल मॅनेजमेंटचा सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे. याचे एकूण शुल्क 75 हजार रुपये आहे. मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, अहमदाबादमधूनही हा कोर्स केला जाऊ शकतो. या दोन्ही संस्थांमध्ये या कोर्सच्या प्रत्येक जागेसाठी 100 पेक्षा जास्त उमेदवार असतात. रिटेल मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचा बीबीए कोर्स इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com