आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Career In Hospitality Industry

दिव्य एज्युकेशन: करिअर इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
723 अब्ज रुपयांची हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, मात्र दरवर्षी 30 लाख कुशल कामगारांची कमतरता
हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा एकूण व्यवसाय 723 अब्ज रुपये आहे. 2022 पर्यंत हा आकडा 2588 अब्ज रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशात हॉस्पिटॅलिटी उद्योगात परदेशी गुंतवणूकही सतत वाढत आहे. विदेशी पर्यटकांची संख्या 2012 मध्ये 4.46 लाख होती. या वर्षी अ गस्टपर्यंत त्यात वाढ होऊन 4.76 लाख झाली आहे. या उद्योगात जवळपास 4 कोटी 90 लाख लोक कार्यरत आहेत. मोठी गुंतवणूक आणि पैशाचा ओघ असताना या उद्योगात दरवर्षी साधारण 30 लाख कुशल कामगारांचा तुटवडा भासतो. याचे कारण म्हणजे या उद्योगात अनेक आव्हाने आहेत. या उद्योगातील करिअरबाबत माहिती जाणून घेऊयात...
रोजगार अनेक, मात्र कामाचे तास जास्त आणि पॅकेज कमी
वेतन कमी, दुस-या शहरांत राहणे महागडे
शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना अनेक नोकया मिळतात, मात्र कमी पॅकेजमुळे अल्पावधीत नोकरी बदलली जाते. दुसया शहरात राहणे महागडे ठरते. टॉप हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजपैकी एक आयएचएम-चेन्नईमध्ये गेल्या वर्षी सुरुवातीचे पॅकेज केवळ 20 हजार रुपये प्रतिमहा होते. यामध्ये पदवीला महत्त्व दिले जाते. पदवी असणाया विद्यार्थ्यांना 20-25 हजार रुपये दरमहा वेतन मिळू शकते. मात्र, केवळ डिप्लोमा करणायांना 8-10 हजार रुपये प्रतिमहा मिळू शकतात.
27 बाय 7 जॉब
मोठ्या कंपनीमध्ये जवळपास 18 तासही काम करावे लागू शकते. कारण तेथे दरवेळेस काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. उदा. तुम्ही केटरिंग विभागात असाल तर सकाळी नाष्ट्याच्या तयारीपासून रात्री डिनरपर्यंत तुम्हाला कार्यरत राहावे लागते.
कामाचा अनुभव आवश्यक
कामाचा अनुभव असणायांना मोठे पॅकेज मिळू शकते. टॉप रिक्रुटिंग कंपन्यांमध्ये आयबीएम, ताज ग्रुप, वेस्टिन, ओबेरॉय ग्रुप आणि फॉर्च्यून हॉटेल्सचा समावेश आहे. यांचे सुरुवातीचे पॅकेज 40 ते 60 हजार रुपये प्रतिमहा असते.
3-4 लाख रुपये प्रतिमहाचे इंटरनॅशनल पॅकेज, मात्र परदेशात त्याचे स्वरूप तुटपुंजे
मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये इंटरनॅशनल प्लेसमेंट्ससाठी मस्कतच्या अल गुबरा हॉटेल आणि दुबईच्या जुमेरा बीच रिसोर्ट आणि मॅरियट इंटरनॅशनल, हिल्टन, रॅडिसन, डे-इन हॉटेल चेन्सचा समावेश आहे. यांचे पॅकेज 3.6 लाख रुपये प्रतिमहा म्हणजे 6 ते 7 हजार डॉलरपर्यंत असू शकते. रुपया सतत घसरत असल्यामुळे अमेरिकी डॉलरमध्ये हे पॅकेज सामान्य समजले जाते. अनेक वेळा तेथे राहण्याचा खर्चही कर्मचायांनाच उचलावा लागतो.
भारतात वाढतोय आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळी उद्योग
भारतात पर्यटक संख्येच्या तुलनेत केवळ हॉटेलांची संख्या नव्हे, तर असलेल्या हॉटेलचे व्यवस्थापन करणाया लोकांची संख्यादेखील तोकडी आहे. एवढे असूनही व्यवसायासंबंधी पर्यटनाच्या ठिकाणांमध्ये भारताचा क्रमांक 18 वा लागतो. आगामी दहा वर्षांत आपला पहिल्या पाचमध्ये सहभाग असेल, असा दावा जागतिक पर्यटन विभागाकडून करण्यात आला आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळी उद्योग भारताकडे आकर्षित झाले आहेत. भारतातील महानगरेच नव्हे, तर छोट्या शहरांमध्येदेखील हॉटेल सुरू करण्यात आले आहेत.
रँकिंगनुसार महाविद्यालयीन शुल्क
हॉटेल मॅनेजमेंटच्या श्रेणीनुसार महाविद्यालयांचे वेगवेगळे शुल्क असते. उदाहरणार्थ बंगळुरूच्या गार्डन सिटी महाविद्यालयात तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी सुमारे 3 लाख 50 हजार रुपये शुल्क आकारले जाते. ख्राइस्ट महाविद्यालयात चार वर्षांसाठी याच अभ्यासक्रमाचे शुल्क प्रति सेमिस्टर 48 हजार रुपये आहे. चेन्नईतील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि संस्थेच्या इतर शाखांतही सेमिस्टरचे सुमारे 37 हजार रुपये एवढे शुल्क आहे.
आघाडीच्या संस्था
देशातील आघाडीची हॉटेल
मॅनेजमेंट कॉलेजेस
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर, नवी दिल्ली
* केरळ इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल स्टडीज, तिरुवनंतपुरम
* एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कांचीपुरम
* इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद.
सूचना - सर्व संस्थांमध्ये अभ्यासक्रमाचे शुल्क सुमारे 44 हजार रुपये-60 हजार रुपये प्रति सेमिस्टर.
पहिले हॉटेल व्यवस्थापन विद्यालय 1893 मध्ये
जगातील पहिले हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणून लॉसन हॉटेल स्कूलची ओळख आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1893 मध्ये त्याची सुरुवात. पदविका, पदवी, विज्ञान, एमबीए अभ्यासक्रमांची उपलब्धता.
भारताचा हॉस्पिटॅलिटी उद्योग असा
12 मधील प्रत्येक एक नोकरीशी संबंधित हॉस्पिटॅलिटी उद्योगाशी जोडलेले.
2020 पर्यंत 9 पैकी एक नोकरी याच उद्योगातील असेल
8.78 टक्के नोकºया याच क्षेत्रातील.
2 क्रमांक रोजगाराच्या पातळीवर
पर्यटन उद्योगाचा.
6.23 टक्के भारताच्या जीडीपीमधील या उद्योगाचा वाटा.
स्रोत- उद्योग धोरणविषयक विभाग, नियोजन आयोग.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com