आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: विमा उद्योगात करिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षांमध्ये 12 लाख नोक-या मिळणार, मात्र स्पेशलाइज्ड स्किल आवश्यक
1990 दशकाच्या अखेरीस विमा उद्योग खासगी कंपन्यांसाठी खुला केल्यानंतर भारतात याचा वेगाने विकास होत आहे. 2012 मध्ये देशाच्या विमा उद्योगाचा एकूण वार्षिक व्यवसाय 4500 अब्ज रुपये होता. गेल्या काही वर्षांमध्ये याचा वार्षिक विकासाचा सरासरी दर 20 टक्क्यांहून जास्त राहिला आहे. देशाच्या लोकसंख्येचा 3.9 नागरिकांनी विमा काढला असल्यामुळे करिअरच्या दृष्टीने हा सर्वात चांगला पर्याय आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये हा आकडा 75 टक्क्यांच्या जवळ आहे. येत्या पाच वर्षांमध्ये या क्षेत्रात जवळपास 12 लाख नव्या नोक-या निर्माण होतील, मात्र त्यासाठी विशेष कौशल्य असणे आवश्यक आहे.
50 लाख लोकांना रोजगार देत भारतातील विमा क्षेत्र
51 विमा कंपन्या देशात आहेत. यामध्ये 27 जनरल, 24 लाइफ इन्शुरन्स कंपन्या आहेत.
4.1 टक्के विम्याचे योगदान देशाच्या जीडीपीत आहे.
280 अब्ज डॉलर वार्षिक विमा व्यवसाय 2020 पर्यंत होईल.
सन 2000 नंतर उद्योग विस्तार झाला, विक्रीपेक्षा सेवेवर भर
विमा क्षेत्रात उदारीकरण सुरू होण्याआधी सर्व भर विमा विक्रीवर दिला जात होता. यामध्ये एजंट्स आणि विकास अधिका-यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र, 2000 नंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या (आयआरडीए) स्थापनेनंतर कॉर्पोरेट एजंट, इन्शुरन्स ब्रोकर, डायरेक्ट सेलसारखे नवे पर्याय समोर आले. विम्यात स्पर्धा वाढल्यानंतर कंपन्या विमा विकण्याऐवजी विमेदारांना सेवा देण्यावर जास्त भर देऊ लागल्या. याचा परिणाम म्हणून नोक-यांच्या संधी अनेक पटींनी वाढल्या.
प्रत्येक स्तरावर नोकरीची संधी
विमा क्षेत्रात 2030 पर्यंत 30 लाख नव्या नोक-या निर्माण होतील, असे असोचेमच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले. विम्याच्या दोन शाखा आहेत. जनरल आणि लाइफ इन्शुरन्स. दोन्ही प्रकारांत वेगवेगळ्या विमा व्यावसायिकांची आवश्यकता आहे. विद्यार्थी सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी, सर्व्हेअर, रिस्क मॅनेजर, अंडररायटर, क्लेम अ‍ॅडजेस्टर, अ‍ॅक्चुअरी, कन्सल्टंट यासारख्या पदांची नोकरी प्राप्त करू शकतो. मात्र, हे सर्व स्पेशलाइझ्ड जॉब आहेत. आवश्यक विशेष कौशल्य आणि पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना या नोक-या मिळू शकतील. या नोक-या केवळ विमा कंपन्यांमध्ये नव्हे तर हेल्थ केअर, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ विभागात विमा व्यावसायिकांची आवश्यकता भासते.
अंडररायटर
अंडररायटर पॉलिसीच्या अटी आणि त्याच्या वास्तविक मूल्याबाबतची माहिती असते.
सुरुवातीचे पॅकेज
2-3 लाख रुपये वार्षिक
जोखीम व्यवस्थापन
जोखीम निश्चित करून विम्याचा सल्ला देणे.
सुरुवातीचे पॅकेज
3-4 लाख रुपये वार्षिक
अ‍ॅक्चुअरी
इन्शुरन्स आणि पेन्शन प्लॅन डिझाइन करण्यासोबत जोखमीचा अंदाज घेणे.
कन्सल्टंट
इन्शुरन्सची आवश्यकता आणि विम्याच्या नफ्या-तोट्याबाबत सल्ला देणे
कोर्समध्ये प्रवेश मिळवणे कठीण, नोकरीत कायम राहणे त्याहून कठीण
इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटच्या एमबीए कोर्सच्या 60 जागा आहेत. मात्र, त्यासाठी 25 हजारांहून जास्त विद्यार्थी अर्ज करतात.येथील पीजी डिप्लोमा कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 3 लाख रुपये आहे. अन्य स्पेशलाइझ्ड कोर्सेसमध्येही अशीच स्पर्धा आहे. नोकरी मिळाल्यानंतर ख-या समस्येला सुरुवात होते. एका अहवालानुसार विमा कंपन्या ज्या फ्रेशर्सना नियुक्त करतात त्यातील 40 टक्के सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडतात किंवा त्यांना काढून टाकले जाते. नोकरी मिळणे अवघड आहेच, मात्र ती टिकवणे त्यापेक्षा अवघड आहे. मात्र, वरिष्ठ पदावर अशी समस्या राहत नाही.
जगातील पाच मोठ्या विमा कंपन्या
बर्कशायर हॅथवे
मार्केट कॅपिटल ५ 15600 अब्ज
अमेरिकेची बहुराष्‍ट्रीय कंपनी आहे. याचे सीईओ वॉरेन बफेट आहेत. गेल्या 48 वर्षांपासून कंपनी आपल्या भागधारकांना सरासरी 19 टक्के वार्षिक नफा देत आहे.
चायना लाइफ इन्शुरन्स ग्रुप
मार्केट कॅपिटल रू. 4250 अब्ज
चीनची सर्वात मोठी विमा कंपनी. देशाच्या विमा बाजारपेठेत 45 टक्के भागीदारी. याची सुरुवात 1931 मध्ये झाली होती.
अलियांझ : मार्केट कॅपिटल 4084 अब्ज रुपये
विम्याव्यतिरिक्त बँकिंग व्यवसायात सक्रिय असलेली अलियांझ कंपनी जगातील 15 सर्वात मोठ्या फायनान्शियल ग्रुपमध्ये सहभागी आहे. याचे मुख्यालय म्युनिक, जर्मनीमध्ये आहे.
एलआयजी
मार्केट कॅपिटल 3600 अब्ज रु.
अमेरिकेच्या या विमा कंपनीचा व्यवसाय 130 पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारला आहे. कंपनीत 60 हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
पिंग आन
मार्केट कॅपिटल 3500 अब्ज रु.
चीनच्या पिंग आन इन्शुरन्सव्यतिरिक्त अन्य फायनान्शियल बिझनेसमध्ये कार्यरत आहे. कंपनीची सुरुवात 1988 मध्ये झाली.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com