आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: चर्मोद्योगातील करिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फोकस सेक्टर’मध्ये तज्ज्ञांवर भर, एका वर्षात 10 लाख नोक-या मिळतील
चामडी उत्पादने छोट्या-शहरांत होतात. मात्र, या उत्पादनाचा थेट निर्यातीशी संबंध येतो, हे चर्मोद्योगाचे खास वैशिष्ट्य आहे. जवळपास 25 लाख लोकांचे हे रोजगाराचे माध्यम असल्यामुळे हा उद्योग रोजगाराशी संबंधित आहे. संघटित लेदर इंडस्ट्रीमध्ये 30 टक्के महिला काम करत असल्यामुळे यात महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. सरकारने यास फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या फोकस सेक्टरमध्ये सहभागी केले आहे. कामगारांच्या कौशल्य विकासावर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. उत्पादनाव्यतिरिक्त ऑपरेशन्स, इंजिनिअरिंग, सेल्स अ‍ॅँड मार्केटिंगमध्येही या उद्योगात मोठ्या पॅकेजच्या नोक-या आहेत. मात्र, बहुराष्‍ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पदवी, कौशल्य आणि अकॅडमिक बॅकग्राउंड आवश्यक असते.
लेदर इंडस्ट्री चार भागांत विभागली
प्रशिक्षण
देशात दरवर्षी जवळपास 2 अब्ज चौरस फूट चमड्याचे उत्पादन या क्षेत्रात होते. जगभराच्या चमड्याच्या एकूण गरजेपैकी 10 टक्के वाटा येथील उत्पादनाचा आहे.
फुटवेअर
2.06 अब्ज जोडे वार्षिक फुटवेअरसह भारत चीननंतर दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. देशाच्या एकूण लेदर निर्यातीमध्ये 45 टक्के वाटा चिल्ड्रन आणि लेडीज फुटवेअरचा आहे.
लेदर गारमेंट्स
180 लाख युनिट वार्षिक उत्पादनासह भारत लेदर गारमेंट्सचाही दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. एकूण निर्यातीमध्ये याचा वाटा 10.43 टक्के आहे.
लेदर गुड्स अँड असेसरीज
एकूण लेदर निर्यातीमध्ये याची भागीदारी 23.44 टक्के आहे. 630 लाख युनिट लेदर गुड्स आणि असेसरिजचे देशात दरवर्षी उत्पादन होते.
कच्च माल भरपूर, यापुढेही वेगात विकासाची आशा
देशात लेदर इंडस्ट्रीसाठी कच्चा माल खूप आहे. जगभरातील प्राण्यांमध्ये 21 टक्के आणि शेळ्या मेंढ्यांतील 11 टक्के प्राणी भारतात आहेत. देशाची एकूण लेदर निर्यात या वर्षी 370 अब्ज रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत सरकारने 600 कोटी रुपये खर्चातून मेगा लेदर क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम लागू केली आहे. यामुळे वेगात विकास होईल आणि करिअरच्या आणखी संधी वाढतील.
चार वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीच्या संधी
डिझायनिंग
हे मार्केट ट्रेंड्सप्रमाणे बदलते. नवीन डिझाइन्स बनवण्यासाठी कॉम्प्युटर-अ‍ॅडेड टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो.
मॅन्युफॅक्चरिंग
सामान्य लोकांच्या वापरासाठी लेदर फुटवेअर, गारमेंट्स आणि असेसरिजच्या उत्पादनाशी संबंधित.
मार्केटिंग
राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत खरेदीदार आणि लेदर प्रॉडक्शन युनिट्समध्ये समन्वय राखण्याचे काम
टॅनिंग
हा कॅपिटल-इंटेन्सिव्ह आहे. मात्र, टॅनिंग कामांमध्ये टेक्नॉलॉजीच्या वाढत्या वापरामुळे करिअरच्या संधीही वाढत आहेत.
टेक्नॉलॉजी आणि डिझायनिंगच्या अभ्यासक्रमासाठी चुरशीची स्पर्धा
लेदर तंत्रज्ञान आणि डिझायनिंगचा अभ्यासक्रम देशातील अनेक संस्थांमध्ये शिकवला जातो. फुटवेअर डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये फुटवेअर डिझाइन, प्रॉडक्शन, फॅशन मर्केंडायझिंग आणि व्यवस्थापनात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. एमबीए (फुटवेअर डिझाइन अँड प्रॉडक्शन व्यवस्थापन) अभ्यासक्रमात एकूण 210 जागा आहेत, परंतु त्यासाठी 2013 मध्ये सुमारे 80 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लेदर टेक्नॉलॉजीच्या बीटेक आणि एमटेक अभ्यासक्रमासाठी हजारो विद्यार्थी अर्ज करतात.
3-4 लाख सुरुवातीचे पॅकेज
20 टक्के उमेदवारांनाच चांगली संधी
लेदर उद्योगात प्रवेश करण्यासाठी संधी वेगवेगळ्या पातळीवर दिसून येतात. 10+2 किंवा पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थी त्यासाठी प्रवेश घेऊ शकतो. डिझायनिंग किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम केल्यानंतर 3 ते 4 लाख रुपये वार्षिक पॅकेज असणारी नोकरी मिळते. नोक-यांचे प्रमाण खासगी क्षेत्रात अधिक आहे. चांगली संधी असलेल्या नोक-या सुमारे 20 टक्के लोकांना मिळू शकतात. त्यासाठी पदवी आणि आवश्यक कौशल्यासह शैक्षणिक पात्रतादेखील महत्त्वाची ठरते.
फॅक्ट्स अँड फिगर्स
देशातील लेदर उद्योग
25 लाख लोकांचा रोजगाराचे साधन आहे संपूर्ण देशात.
10 लाख नवीन रोजगारांची आगामी वर्षात निर्मिती
8.22 टक्के पद्धतीने उद्योग गेल्या पाच वर्षांत वाढू लागला
3 टक्के भागीदारी लेदरच्या आयातीमध्ये भारताच्या व्यापाराची
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com