आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Courses In Indian Statistical Institute

Divya Education: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधील वेगवेगळ्या अभ्‍यासक्रमाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश, 6 मार्चपर्यंत अर्ज करू शकता
कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या(आयएसआय) अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि रिसर्च प्रोग्रॅम्समध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी त्यासाठी 6 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश परीक्षा 11 मे रोजी होईल. प्रवेश परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निवडले जाईल. गुणवत्ता यादीसाठी त्यांच्या अकॅडमिक बॅकग्राउंडला महत्त्व दिले जाईल. या माध्यमातून त्यांना स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्सची पदवी आणि मास्टर कोर्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, क्वालिटी मॅनेजमेंट सायन्स आणि लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सच्या मास्टर ऑफ सायन्स कोर्समध्ये प्रवेश मिळेल. याबरोबर कॉम्प्युटर सायन्स तसेच क्वालिटी, रिलॅअ‍ॅबिलिटी अ‍ॅँड ऑपरेशन्स रिसर्चच्या एमटेक आणि डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल मेथड्स अ‍ॅँड अ‍ॅनालिसिस आणि रिसर्च कोर्सेसमध्येही प्रवेश मिळेल.
पात्रता
बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स तसेच मॅथ्स
मॅथ्स आणि इंग्रजीसह 10+2 परीक्षा उत्तीर्ण असावे.
मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स
कोणत्याही शाखेची पदवी, ज्यात स्टॅटिस्टिक्स एक विषय असावा किंवा आयएसआयमधून पदवी किंवा पदविका कोर्स केला असावा.
मास्टर ऑफ मॅथ्स
कोणत्याही शाखेची पदवी/बीई/बीटेकची पदवी, ज्यामध्ये मॅथ्स हा एक विषय असावा किंवा आयएसआयमधून पदवी कोर्स केला असावा.
एमएस(क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स)
इकॉनॉमिक्स, मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स किंवा फिजिक्समध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेत बीई/ बीटेकची पदवी, यादरम्यान गणित व अर्थशास्त्राचाही अभ्यास केलेला असावा.
एमटेक(कॉम्प्युटर सायन्स)
मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेत बीई/ बीटेकची पदवी.
कोर्ससाठी शुल्क नाही, विद्यावेतन मिळते
आयएसआयमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही शैक्षणिक शुल्क घेतले जात नाही. प्रवेशासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्यास विद्यावेतन मिळते. प्रत्येक कोर्ससाठी वेगवेगळे विद्यावेतन आहे. अंडरग्रॅज्युएट कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना दर महिन्यास तीन हजार, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठी 5 हजार, एमटेक कोर्ससाठी 8 हजार आणि पीजी डिप्लोमा कोर्ससाठी 2 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. याव्यतिरिक्त त्यांना वार्षिक आपत्कालीन निधी दिला जातो.
आयएसआय अमेरिकेसाठी मॉडेल बनले
आयएसआयची सुरुवात 1931 मध्ये पी.सी. महालनोबिन यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केली होती. तेव्हा ते फिजिक्स विषयाचे प्रोफेसर होते. 1959 मध्ये संसदेने त्यास इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्सचा दर्जा दिला. संस्था स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्स व्यतिरिक्त कॉम्प्युटर सायन्स, ऑपरेशन्स रिसर्च, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स आणि इन्फॉर्मेशन सायन्सच्या क्षेत्रात सक्रिय आहे. याचे सेंटर्स दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि तेजपूरमध्ये आहेत. सुरुवातीच्या वर्षात आयएसआयची चांगली कामगिरी पाहून अमेरिकेच्या पहिल्या स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना नॉर्थ कॅरोलिनामध्ये याच आधारे करण्यात आली होती.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com