आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: एनएसडीच्या पदविका कोर्सच्या प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनएसडीच्या पदविका कोर्सच्या प्रवेशासाठी रंगभूमीचा अनुभव अनिवार्य
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्लीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. ही संस्था देशातील आघाडीची नाट्य संस्था आहे. नाट्यकलेमध्ये तीन वर्षांच्या या कोर्सला पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष मानले जाते. प्रवेशासाठी नाट्यक्षेत्रातील अनुभव हाच एकमेव निकष मानला जातो. त्याशिवाय विद्यार्थ्यांना वैद्यकीय चाचणीलादेखील सामोरे जावे लागते.
पात्रता
कोणत्याही शाखेत पदवीबरोबरच किमान 6 नाट्यप्रयोगात सहभाग अनिवार्य. त्याशिवाय हिंदी आणि इंग्लिशचे व्यावहारिक ज्ञान गरजेचे.
वयोमर्यादा : 1 जुलै 2014 पर्यंत 20 ते 30 वर्षांदरम्यान.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा म्हणून ऑडिशन द्यावी लागेल. त्यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी होणे बंधनकारक आहे. चार-पाच दिवस ही प्रक्रिया चालेल. प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय तज्ज्ञ समिती घेईल.
शुल्क आणि शिष्यवृत्ती
एनएसडीच्या पदविका अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. वेशभूषा, शिकवण, वसतिगृह इत्यादी खर्चासाठी त्यांना वार्षिक सुमारे 4 हजार रुपये शुल्कापोटी द्यावे लागतात. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकातामध्ये तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी कोर्ससाठी 20 हजार रुपये फीस प्रती सत्र आकारली जाते.
2005 मध्ये बनवले अभिमत विद्यापीठ, 2011 मध्ये दर्जा परत केला
एप्रिल 1959 मध्ये संगीत नाटक अकादमीच्या आधीन असलेल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना करण्यात आली होती. 1975 मध्ये त्याला स्वायत्तता देण्यात आली होती. 17 मार्च 2005 मध्ये सरकारने एनएसडीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला होता, परंतु 2011 मध्ये एनएसडीने स्वत: हा दर्जा परत केला.
नाल्सार लॉ विद्यापीठाच्या पीजी, डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश
हैदराबादमध्ये नाल्सार विधी विद्यापीठ आहे. येथील पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. गटचर्चा आणि मुलाखतीच्या आधारे प्रवेश दिला जाईल. ऑनलाइन आणि ऑनसाइटचे असे त्याचे स्वरूप असेल. पीजी आणि पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी एक वर्षाचा आहे.
या अभ्यासक्रमात मिळेल प्रवेश
@़मास्टर्स डिग्री इन एव्हिएशन लॉ अँड एअर ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट
@ मास्टर्स डिग्री इन स्पेस अँड टेलिकम्युनिकेशन लॉज
@ पीजी डिप्लोमा इन एव्हिएशन लॉ अँड एअर ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट
@ पीजी डिप्लोमा इन जीआयएस अँड रिमोट सेन्सिंग लॉज
पात्रता
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांच्या पदविकेबरोबर तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे.
शुल्क
नाल्सार विद्यापीठात पीजी अभ्यासक्रमासाठी एकूण 1 लाख 50 हजार रुपये फी आणि पदविकेसाठी 50 हजार रुपये. एनयूजेएस, कोलकातामध्ये ऑनलाइन पदविका कार्यक्रमासाठी एकूण 25 हजार रुपये शुल्क आहे.
ज्ञान
शरीराच्या इतर हाडांशी
हायॉइडचा संबंध नाही
गळ्यातील मांसपेशींमध्ये लपून असलेले हायॉइड नावाचे हाड मानवी शरीरात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. कारण हे हाड इतर कोणत्याही हाडाशी संबंधित नसते. आपल्या कानातील हाडेदेखील परस्परांशी जोडलेली नसतात, परंतु परस्परांशी संबंधित जरूर असतात. घोड्याच्या नाळेच्या आकारातील हायॉइड बोलताना आपल्याला मदत करतो. जेव्हा केव्हा आपण काही बोलतो अगर काही गिळतो तेव्हा हायॉइडची जिभेला मदत होते. हायॉइड इतर जनावरांमध्ये आढळून येतो, परंतु केवळ माणसामध्ये बोलण्यासाठी त्याची मदत होते. लँरिक्स आणि जिभेला एकाच वेळी काम करण्याठी हायॉइडचा फायदा होतो. हे हाड
अशा विशिष्ट ठिकाणी असते. हायॉइडमुळेच माणसाला वेगवेगळ्या स्वरूपाचे आवाज काढणे शक्य होऊ शकते. आपल्या शरीरात हायॉइड नसते तर आपला आवाज चिम्पांझीसारखा असता, असे संशोधक सांगतात.
17 राज्यांमध्ये 54 नवीन केंद्रीय विद्यालये
केंद्र सरकारने देशात नवीन 54 केंद्रीय विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी परवानगी देण्यात आली आहे. नवीन विद्यालये 17 राज्यांमध्ये सुरू करण्यात येतील. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहाससंबंधी समितीने गेल्या शुक्रवारी त्याला मंजुरी दिली. त्यासाठी सुमारे 9.2 अब्ज खर्च अपेक्षित आहे. विद्यालये सुरू झाल्यानंतर 54 हजार मुलांना शिक्षण घेता येणार आहे. सध्या देश आणि विदेशात एकूण 1 हजार 94 केंद्रीय विद्यालये आहेत. त्यात 12 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्रीय विद्यालयाच्या परदेशात तीन शाखा आहेत. मॉस्को, काठमांडू, तेहरानमध्ये या शाखा आहेत.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com