आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: शैक्षणिक कर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीचा अवधी वाढवण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थ्यांना आतापर्यंत कर्ज घेतल्यावर नोकरी लागताच कर्जाचा हप्ता सुरू होत होता. मात्र, चांगली नोकरी नसल्यामुळे या अटीची पूर्तता होऊ शकत नाही.


1.2 लाख विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक कर्जाची परतफेड नाही, त्यामुळे चिदंबरम यांनी मुदत वाढविली
कमकुवत अर्थव्यवस्था व चांगली नोकरी मिळू शकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज फेडण्यास वेळ लागत आहे. रुपयाच्या घसरणीमुळे परेदशातील शिक्षणही महाग झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी परेदशात जाऊन शिक्षण घेण्यास धजावत नाहीत. मात्र, शिक्षणात अडथळा येऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीनंतर त्वरित कर्जाचे हप्ते भरावे लागू नयेत, यासाठी बॅँका कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढविण्याची योजना आखत आहेत. सरकारी बॅँका कर्ज फेडण्यासाठी सात-आठ वर्षांची सवलत देऊ शकतात, खासगी बॅँका 15 वर्षांपर्यंत मुदत देण्याच्या विचारात आहेत.
8 वर्षांत 110 % शैक्षणिक कर्जाचे थकबाकीदार वाढले, 50 हजार कोटी रुपये थकबाकी
सरकारी बॅँकांकडे साधारण 24 लाख शैक्षणिक कर्ज खाते आहेत. 2004 मध्ये 4600 कोटी रुपये कर्जाची रक्कम बॅँकांना परत मिळाली नाही. यामध्ये परदेशी शिक्षणासाठीच्या कर्जाचा समावेश आहे. 2012 मध्ये यात वाढ होऊन 50 हजार 200 कोटी रुपयांपर्यंत आकडा पोहोचला. म्हणजे आठ वर्षांत शैक्षणिक कर्जाच्या थकीत रकमेत 110 टक्के वाढ झाली. रिझर्व्ह बॅँकेच्या अहवालानुसार, 1.2 लाख विद्यार्थ्यांकडून कर्जाची परतफेड केली जात नाही.


4 राज्यांतील विद्यार्थ्यांवर सर्वाधिक कर्ज
56 टक्के शैक्षणिक कर्ज थकीत आहे चार राज्यांमध्ये- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक.
60 टक्के कर्ज 4 लाख रुपयांहून कमी रकमेचे.
80 टक्के थकबाकीदारही 4 लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे.


95 % कर्ज सरकारी बॅँकांच्या वाट्यातून
दरवर्षी देशात साधारण 80 हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च केले जात आहेत. शैक्षणिक कर्जात 90-95 टक्के वाटा सरकारी बॅँकांचा आहे. खासगी व अन्य वित्त संस्थांचा वाटा त्यापेक्षा कमी आहे. सर्व बॅँका 11.5 ते 13 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देत आहेत. देशात किंवा परदेशातील शिक्षण व कोर्सच्या निवडीवर कर्ज अवलंबून असते.


परदेशात नोकरी करणा-या विद्यार्थ्यांना फायदा होणार
देशातील मंदीच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन नोकरी मिळवली, ते शैक्षणिक कर्जाची परतफेड सहज करू शकतील. ते डॉलरमध्ये कमावतील. इकडे रुपया घसरत आहे. त्यामुळे कर्ज लवकर फेडण्यासाठी मदत मिळेल. मात्र, शिक्षण संपल्यानंतरही नोकरी मिळू न शकणा-या विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक स्थिती राहील.


वृत्त
विप्रो सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देणार
सॉफ्टवेअर कंपनी विप्रोने अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना संवाद व सॉफ्ट स्किल्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. विप्रो इंटिग्रेटेड स्किल एनहान्समेंट प्रोग्रामचा उद्देश विद्यार्थ्यांना आयटी, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रात नोकरीयोग्य बनविणे हा आहे. हा कार्यक्रम नॉन इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. याची सुरुवात कोलकात्यातून झाली आहे.
डीयू स्टुडंट्स टॉप ग्लोबल सीईओमध्ये
प्रसिद्ध मासिक फॉर्च्यूनची ग्लोबल सीईओ गुणांकन यादी जाहीर झाली आहे.यामध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ट सीईओंची नावे प्रसिद्ध झाली आहेत. देशात दिल्ली विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे, ज्याच्या विद्यार्थ्यांना यादीत स्थान मिळाले आहेत. इंडियन ऑइलचे सीईओ रणबीर सिंह बुटोला आणि डॉएच्च बॅँकेचे सीईओ अंशू जैन यांचा समावेश आहे. दोन्ही कंपन्यांचा महसूल 153 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 10 हजार 124 अब्ज रुपये आहे.


September means “seven” why is it the 9th month?
We take the predictability of the calendar for granted. But we may have felt differently if we were living under the rule of Julius Caesar. September was the seventh month of the old Roman calendar. In this calendar, the year began in March. But the Julian calendar reform shifted the start of new year back two months to where it is now: January 1. This change made September in the new calendar the ninth month and one of only four Gregorian months with 30 days.
Why is seven "Lucky"?
The name of the month is derived from septem, which is Latin for seven. It has long been regarded as a number of perfection, luck, and wonder. (Think: seven days of creation.) We commonly refer to being in a state of everyday bliss as being in seventh heaven. The expression has been used figuratively since the early 1800s. It refers to “the dwelling place of God in the highest of the seven concentric spheres that surround the earth.


शब्द - लफ्ज - word
> आनंद - श‍िगुफ्तगी - delight
> कर्जबाजारी - उधार - indebtedness
> Exaltation - प्रसिध्‍दी- सरबुलंदी


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com