आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य एज्युकेशन: ग्रेट इन्स्टिट्यूट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांच्या अभ्यासक्रमांना महत्त्व दिले जाते, अशा अनेक खासगी व सरकारी संस्था भारतात आहेत. परंतु या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अतिशय कठीण आहे. दिव्य एज्युकेशनमध्ये जाणून घेऊया एका आघाडीच्या टॉप-बी स्कूलविषयी...
30 विद्यार्थ्यांना कोर्स संपण्या
अगोदरच नोकरीची संधी
एक्सएलआरआय-जमशेदपूर
झेवियर्स लेबर रिलेशन्स इन्स्टिट्यूट अर्थात एक्सएलआरआय-जमशेदपूरची सुरुवात 1949 मध्ये फादर क्वीन एन्राइट, एस.जे. व फादर बिल टोम यांनी केली होती. या महाविद्यालयाला व्यवस्थापन अभ्यासासाठी आयआयएमच्या समकक्ष मानले जाते. जगभरातील आघाडीच्या औद्योगिक कंपन्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करतात. या कंपन्यांत संस्थेच्या 30 टक्के विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट दिली जाते. संस्थेला अनेक वर्षांपासून देशातील आघाडीच्या बी-स्कूल्समध्ये स्थान दिले जाते. संस्थेतील प्रवेशासाठी झेवियर्स अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (झॅट) 5 जानेवारी 2014 ला होणार आहे. या चाचणीची सविस्तर माहिती दिव्य एज्युकेशनच्या 6 ऑगस्टच्या प्रकाशित झाली आहे.
रँकिंगदेखील आघाडीच्या पाचमध्ये
वेगवेगळे नियतकालिक आणि पाहणीमध्ये एक्सएलआरआयला देशातील आघाडीच्या पाच बिझनेस स्कूल्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 2013 मध्ये बिझनेस वर्ल्ड मॅगझीनने त्याला दुसरे स्थान दिले आहे. बिझनेस टुडे व इंडिया टुडेने 2012 मध्ये चौथे व आऊटलूकने खासगी विद्यालयांच्या यादीत पहिले स्थान दिले. इंडियन मॅनेजमेंटच्या पाहणीत एक्सएलआरआयला सुपर लीग-1 ची श्रेणी देण्यात आली.
पहिल्या ग्लोबल ट्रेड इव्हेंटची सुरुवात
० एन्सेंबल : संस्थेने 2001 मध्ये एन्सेंबलची सुरुवात जगभरातील व्यवस्थापनशास्त्राच्या होतकरू विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने करण्यात आली. इंटरनॅशनल मार्केटिंग इव्हेंटची सुरुवात करणारे हे देशातील पहिलेच विद्यालय आहे. अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये ऑनलाइन व ऑन दी स्पॉट स्पर्धा घेतली जाते. त्यात विजयी होणा-या विद्यार्थ्यांना लौकिक मिळतो. दरवर्षी या स्पर्धेत 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या व सुमारे 10 हजार विद्यार्थी सहभागी होतात.
०मार्केटिंग रिसर्च फेअर : 1979 मध्ये एक्सएलआरआयने मार्केटिंग रिसर्च फेअरची सुरुवात झाली. त्याला मॅक्सी फेअर असे नाव देण्यात आले. देशात होणा-या मार्केट रिसर्चमध्ये हा सर्वात मोठा व पहिला कॉलेज मार्केटिंग इव्हेंट मानला जातो. हा उपक्रम विद्यार्थ्यांना सृजनात्मक विपणन संशोधनाची संधी प्रदान करतो. त्यात 5 हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिक तसेच एफएमसीजी सारख्या कंपन्या सहभागी होतात.
आघाडीच्या कंपन्यांत नोकरी
एक्सएलआरआयच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये सिटी बँक, फिलिप्स, एअरटेल सारख्या कंपन्या समाविष्ट आहेत. 36 टक्के विद्यार्थ्यांना मार्केटिंग, 30 टक्के वित्त, 17 टक्के समुपदेशन, 11 टक्के सामान्य प्रशासन, 4 टक्के ऑपरेशन्स, 2 टक्के इतर क्षेत्रात नोकरीची संधी मिळते.
नोटेबल अलुम्नाई
टाटा स्टीलचे उपाध्यक्ष बी. मुत्थुरामन, रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष बिजोऊ कुरियन, युनिलिव्हरचे ग्लोबल वरिष्ठ उपाध्यक्ष लीना नायर, एचसीएल टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष विनीत नायर यासारखे अनेक प्रसिद्ध उद्योजक याच संस्थेचे विद्यार्थी राहिले आहेत.
सोशल कॉज : चिल्ड्रन लायब्ररी
2009 मध्ये एक्सएलआरआयचे विद्यार्थ्यानी गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘चिल्ड्रन पब्लिक लायब्ररी’ची सुरुवात केली. एक्सएलआरआयच्या विद्यार्थी अशा मुलांसाठी कथा-कथनाचा उपक्रमही करतात. अशा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारीदेखील एक्सएलआरआयचे विद्यार्थी निभावू लागले आहेत. जॉय ऑफ गिव्हिंग वीकच्या काळात विद्यार्थ्यांनी रॉक बँड परफॉर्मन्सदेखील केला त्यातून चॅरिटीचे काम करण्यात आले होते.
हिंदी आणि इंग्रजी समानार्थी वाक्प्रचार
जिसकी लाठी, उसकी भैंस !
Might is right.
अर्थ : जो अधिक ताकदवान असतो, त्याचे ऐकावे लागते.
थोथा चना, बाजे घना।
Empty vessels make the most noise.
अर्थ : ज्याला कमी ज्ञान असते, तो दिखाऊपणा करण्यासाठी अनावश्यक अशी आरडाओरड करतो.
चोर-चोर मौसेरे भाई !
Birds of same feather flock together.
अर्थ : एकसारखे लोक सोबत राहणे पसंत करतात.
आप भले तो जग भला !
Good mind, good find.
अर्थ : जो स्वत: चांगला असतो, त्यासाठी सर्वकाही चांगलेच असते.
जो गरजते है, वह बरसते नहीं।
Barking dogs seldom bite.
अर्थ : जो जास्त बोलतो, तो वास्तविक काहीही करत नाही.
लालच बुरी बला है।
Avarice is the root of all evils.
अर्थ : लालचीपणा ही वाईट सवय आहे, त्यातून नुकसान होते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com