आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: एलएलबी एन्ट्रस टेस्ट 2013

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ लॉसाठी आज प्रवेश परीक्षा
देशातील आघाडीच्या विधी संस्थांमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ लॉच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश चाचणी रविवार, 9 जून रोजी होणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी विद्यापीठाच्या तीन विधी केंद्रांमध्ये प्रवेश
मिळवू शकतात.

स्पर्धा:
2505 एकूण जागा
15 हजार अर्जदार
3 वर्षे कोर्स कालावधी

पात्रता:
किमान 50 टक्के गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी. ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के तर एससी / एसटी विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा नाही.

निकाल : 3 जून 2013 चा तिसरा आठवडा
शुल्क : डीयूमध्ये एलएलबीच्या अभ्यासक्रमाचे शुल्क वार्षिक 6000 रुपये आहे. देशातील सर्व राष्ट्रीय विधी विद्यापीठात वार्षिक 40 हजार रुपये. खासगी विधी संस्था सिम्बायोसिसमध्ये सुमारे 1 लाख रुपये.

परीक्षा पद्धती
दोन तासांच्या प्रवेश परीक्षेत 175 पर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यात इंग्लिश, कॉम्प्रीहेन्शन, विश्लेषणात्मक, कायदेशीर सल्ला, सामान्यज्ञानाचा समावेश असेल. प्रत्येक योग्य उत्तरासाठी चार गुण दिले जातील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाईल.

दिल्ली हायकोर्टातील 35 पैकी 31 न्यायमूर्ती डीयूचे
दिल्ली विद्यापीठातील विधी विभागाला अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचे श्रेय द्यावे लागते. 1966-67 मध्ये एलएलबी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांनी वाढवून तीन वर्षे करण्यात आला आहे. अध्यापनासाठी केस मेथडचा वापर करण्यात आला आहे. त्या काळात देशात या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच झाल्या होत्या. सुरुवातीपासूनच ही संस्था विधी क्षेत्रातील अव्वलस्थानी पोहोचली. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर आहेत. अनेक तर उच्च् न्यायालयात न्यायमूर्तीदेखील आहेत. दिल्ली उच्च् न्यायालयातील 35 पैकी 31 न्यायाधीश दिल्ली विद्यापीठातील लॉ पासआऊट्स आहेत. यातील जास्त कॅम्पस लॉ सेंटरचे विद्यार्थी होते.

सरन्यायाधीश आणि कॅबिनेट मंत्रीदेखील माजी विद्यार्थी
भारताचे निवृत्त सरन्यायाधीश वाय.के. सभरवाल (1 नोव्हेंबर 2005 ते 14 जानेवारी 2007) फॅकल्टी ऑफ लॉचे विद्यार्थी आहे. त्यांच्याशिवाय माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम, रोहिंटन नरिमन, लोकसभेच्या सभापती मीरा कुमार, केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे.

तीन लॉ सेंटर, वेगवेगळे टायमिंग
दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरची सुरुवात 1924 मध्ये ओल्ड व्हाइस लॉज ग्राउंड्समधील प्रिन्सेस पॅव्हेलियनमध्ये झाली होती. 1963 मध्ये हे केंद्र सध्याच्या पत्त्यावर दाखल झाले. 1942 मध्ये इव्हिनिंग क्लासेसची सुरुवात झाली. इव्हिनिंग क्लासेसची मागणी लक्षात घेऊन दोन नवीन सेंटर सुरू करण्यात आले. मंदिर मार्गावर लॉ सेंटर-1, 1970 मध्ये एआरएसडी कॉलेज, 1971 मध्ये धौलाकुआंमध्ये सेंटर-2 सुरू झाले. त्यानंतर लॉ सेंटर-1 छात्र मार्गावर स्थलांतरित झाले. कॅम्पस लॉ सेंटरमध्ये क्लासेस सकाळी साडेआठ वाजता सुरू होतात. लॉ सेंटर-1 मध्ये दोन सत्रात वर्ग चालवले जातात. दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते चालतात. सायंकाळी 5 ते रात्री सव्वानऊपर्यंत ते घेतले जातात. लॉ सेंटर-2 मध्ये क्लास सायंकाळी पावणेसात ते रात्री सव्वानऊ वाजेपर्यंत सुरू असतात.

रंजक:
@ डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेटचा संबंध रोमन कॅथॉलिक चर्चशी आहे. जेव्हा एखाद्याला काही उपाधी देण्यासाठी निर्णय देण्याची वेळ असते अशा वेळी त्याच्या बाजूने आणि विरोधात तर्क देण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती केली जाते. निर्णयाच्या विरुद्ध तर्क मांडणार्‍या व्यक्तीला डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट म्हटले जाते.
@ जुन्या जमान्यात जेव्हा लोक आपल्या जवळपास राहणार्‍या एखाद्या व्यक्तीला पसंत करत नसत आणि त्यांची त्याला मारायचीदेखील इच्छा नसे तेव्हा त्याचे घर जाळून टाकण्याची विचित्र परंपरा होती. त्या व्यक्तीने त्रस्त होऊन घर सोडून निघून जावे, असा त्यामागील उद्देश असे. तेव्हापासून फायरिंग द पर्सन या परंपरेची सुरुवात झाल्याचे मानले जाते.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
8082005060 यावर किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com