आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education:नवीन कोर्सेस - काळानुरूप स्पेशलाइज्ड कोर्सची सुरुवात झाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाउंटन्सी असो की मॅनेजमेंट किंवा फॅशन, प्रत्येक शाखेत स्पेशलाइज्ड कोर्सेस वाढत आहेत. काळानुरूप नव्या कोर्सेसची आखणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल त्याकडे वाढत आहे. आज अशाच काही कोर्सेसची माहिती जाणून घेऊया...
एनर्जी मॅनेजमेंट
युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज, डेहराडून
शुल्क
1लाख 98हजार रूपये
मुदत 2 वर्षे
वीज वापरामध्ये भारत जगात दुस-या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक चीनचा आहे. मात्र, जगात ऊर्जास्रोताच्या कमतरतेमुळे त्याच्या व्यवस्थापनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. एनर्जी मॅनेजमेंट कोर्समध्ये कमी खर्चात वीज उत्पादन आणि वापर नियंत्रित करण्याबाबत सांगितले आहे.
पात्रता : विज्ञान/ अभियांत्रिकीची पदवी.
मार्केट रिसर्च अँड डाटा अ‍ॅनालिसिस
मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, अहमदाबाद
शुल्क
97 हजार रूपये
मुदत
1 वर्षे
फ्रेशर्ससाठी सुरू करण्यात आलेला हा कोर्स मार्केट रिसर्चच्या नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देतो. याबरोबरच यामध्ये डाटा अ‍ॅनालिसिस पद्धतींचा योग्य वापर विद्यार्थ्यांना सांगितला जातो. कोर्समध्ये थेअरीसोबत केस स्टडीजलाही स्थान दिले आहे. कोर्स ई-लर्निंगद्वारेही उपलब्ध आहे.
पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी.
इमेज मॅनेजमेंट
इमेज कन्सल्टिंग बिझनेस इन्स्टिट्यूट (देशाच्या अनेक शहरांत कॅम्पस)
शुल्क
1.20 लाख रूपये
मुदत
6 वर्षे
कंझ्युमर-बेस्ड बिझनेस युनिट्ससारख्या रिटेल, पब्लिक रिलेशन्स, एअरलाइन्स, हॉस्पिटॅलिटीबरोबर इमेज कन्सल्टन्सी करिअरचा नवा पर्याय म्हणून समोर आला आहे. या अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्समध्ये लीडरशिप, ट्रेनिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आदी विषयांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
पात्रता :कोणत्याही शाखेत 10+2 उत्तीर्ण
फॅशन अँड मीडिया मेकअप
पर्ल अकॅडमी ऑफ फॅशन, नवी दिल्ली
शुल्क
1.80 लाख रूपये
मुदत
1 वर्षे
या कोर्समध्ये मेकअप, हेअर स्टायलिंग, हेअर डिझाइनव्यतिरिक्त विशेष समारंभासाठी स्पेशल इफेक्ट्स, मेकअपबाबत शिक्षण दिले जाते. थेअरीसोबत व्हिज्युअल स्टडीज आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगही दिले जाते. स्पेशलाइज्ड स्किल प्राप्त करून विद्यार्थी नोकरी करू शकतो किंवा उच्च शिक्षण घेऊ शकतो.
पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेत 10+2 उत्तीर्ण.
अकाउंटिंग टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स
इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकांटंट्स ऑफ इंडिया
शुल्क
10 हजार रू. साधारण
मुदत
2 वर्षे
या कोर्समधून बुक कीपिंग आणि अकाउंट्स रायटिंगमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्सना मदत करणा-या दुस-या स्तराचे अकाउंटंट्स तयार करतात. यामध्ये लॉ, बिझनेस कम्युनिकेशन, कॉस्ट अकाउंटिंग आदी विषय शिकवले जातात. प्रॅक्टिकल ट्रेनिंगबरोबर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीची माहिती दिली जाते.
पात्रता : कोणत्याही शाखेत 10+2 उत्तीर्ण.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com