आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालिकत आयआयटीच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेश, 24 मार्चपर्यंत अर्ज करू शकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालिकतच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी त्यासाठी 24 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेशासाठी कॅट किंवा सीमॅटचा व्हॅलिड स्कोअर आवश्यक आहे. या कोर्ससाठी 60 जागा असून यातून विद्यार्थी जनरल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स, ह्यूमन रिर्सोसेस, मार्केटिंग, फायनान्स आणि आयटी अ‍ॅँड सिस्टिम्स मॅनेजमेंटमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात.

पात्रता
60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. पदवी अभ्यासक्रमात गणित किंवा अर्थशास्त्र एक विषय असणे आवश्यक. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 55 टक्के गुण आवश्यक.

निवड प्रक्रिया
अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना कॅट किंवा सीमॅट स्कोअरच्या आधारावर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्या 21 ते 30 एप्रिलदरम्यान होतील. या तिन्हीतून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

शुल्क
कालिकत एनआयटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमबीए कोर्सचे प्रतिसेमिस्टर शुल्क 17 हजार 500 रुपये आहे. एनआयटी, वारंगलमध्ये एमबीए कोर्सचे शुल्क सुमारे 50 हजार रुपये आणि एनआयटी, अलहाबादमध्ये जवळपास 25 हजार रुपये प्रतिसेमिस्टर आहे.
निकाल : 2 मे, 2014

टेरी विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि पदविका पाठ्यक्रमामध्ये प्रवेश
नवी दिल्लीतील टेरी विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 25 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. बहुतांश कोर्सेसमध्ये प्रवेश प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये एमए, एमएस्सी, एमबीए, एमटेक आणि पीजी डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल.

पात्रता
एमएस्सी(इकॉनॉमिक्स) : 50 टक्के गुणांसह इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये बीए किंवा बीएस्सी किंवा 60 टक्के गुणांसह बीई, बीटेक, बीकॉम अथवा बीएस्सी केले असावे.
एमटेक(अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅँड मॅनेजमेंट) : 55 टक्के गुणांसह बीई, बीटेक, बीआर्क किंवा सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी.
एमबीए(बिझनेस सस्टेनेबिलिट) : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमध्ये पदवी.
एमए(पब्लिक पॉलिसी अ‍ॅँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट) : कोणत्याही शाखेच्या पदवीबरोबर पाच वर्षांचा कामाचा अनुभव.

निवडप्रक्रिया
प्रत्येक कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. एमएस्सी आणि एमटेक कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत होईल. एमटेकसाठी गेट किंवा नेट पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. एमबीए कोर्ससाठी विद्यार्थ्यांना कॅट, जीमॅट किंवा मॅट स्कोअरच्या आधारे ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीसाठी निवडले जाईल. गुणवत्ता यादी या तिन्हीला मिळून बनवली जाईल.

शुल्क
टेरी विद्यापीठाच्या एमबीए कोर्सची ट्यूशन फीस 1 लाख 75 हजार रुपये, एमएस्सी कोर्सची 52 हजार, एमटेक कोर्सची 55 हजार रुपये आणि एमए कोर्सची 40 हजार रुपये प्रतिसेमिस्टर आहे. वनस्थली विद्यापीठात एमए कोर्सचे वार्षिक शुल्क 40 हजार रुपये आणि एमएस्सीचे 59 हजार रुपये आहे. बनारस हिंदू विद्यापीठात एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 50 हजार रुपये आहे.

निकाल : 30 एप्रिल, 2014

ट्रॅफिक सिग्नलचा वापर
रेल्वेपासून सुरू झाला होता
वाहतूक सुरळीत होण्यासाठी रंगावर आधारीत सिग्नलची सुरुवात रेल्वेने केली होती. 1830 च्या दशकात रेल्वे नेटवर्कचा विस्तार होऊ लागल्यानंतर रेल्वे कंपन्यांच्या रुळाची सुरक्षा आवश्यक वाटली. त्यांनी त्यासाठी कलर बेस्ड सिग्नल्स सुरू केले. लाल रंगाचा वापर थांबण्यासाठी, हिरवा रंग सावधान होण्यासाठी आणि पांढरा रंग पुढे जाण्याच्या संकेतासाठी होता. मात्र, पांढर्‍या दिव्यामुळे समस्या निर्माण होऊ लागल्या, त्याऐवजी पिवळ्या रंगाचा वापर होऊ लागला. जवळपास तीन दशकानंतर या सिग्नल्सचा उपयोग केवळ रेल्वे वाहतुकीसाठी होत होता. सन 1865 मध्ये इंग्लंडच्या रस्त्यांवर घोडागाड्यांची संख्या वाढल्याने अपघात वाढले. ब्रिटिश रेल्वेसाठी सिग्नलिंग सिस्टिम डिझाइन करणारे इंजिनिअर जॉन पीक नाइट यांनी रस्त्यावरील वाहतुकीसाठीही अशा सिग्नल्सचा वापर करण्याचा सल्ला दिला. 9 डिसेंबर, 1868 रोजी याची सुरुवात झाली आणि लंडनच्या ग्रेट जॉर्ज अ‍ॅँड ब्रिज स्ट्रीटमध्ये पहिला रस्त्यावरील सिग्नल बसवण्यात आला. 1920 नंतर अमेरिकेत अनेक प्रकारचे स्वयंचलित ट्रॅफिक सिग्नल्स बसवण्यात आले. मात्र, यात वेगवेगळ्या रंगांचा वापर होत होता. 1935 मध्ये द मॅन्युअल ऑन युनिफॉर्म ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस बनवून एकसारख्या सिस्टिमचा उपयोग बंधनकारक करण्यात आला.