आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीआयटी, मेसराच्या एमबीए आणि एमसीए कोर्सेसमध्ये प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसराच्या मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीएसाठी 7 एप्रिलपर्यंत आणि एमसीएसाठी 25 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकता. एमबीए कोर्समध्ये कॅट स्कोअर तर एमसीए कोर्समध्ये ऑनलाइन चाचणीच्या आधारे प्रवेश मिळेल.

पात्रता
एमबीए : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. एससी/ एसटी विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत. याबरोबर कॅट, 2013 चा स्कोअर.
एमसीए : 60 टक्के गुणांसह बीसीए किंवा कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी अथवा पदवी अभ्यासक्रमात मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्स एक विषय असावा. याव्यतिरिक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये 60 टक्के गुण असावेत.

निवड प्रक्रिया
एमबीए : कॅट-2013 स्कोअरच्या आधारे विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत 28 एप्रिल ते 10 मे 2014 दरम्यान होईल. गुणवत्ता यादीत 80 टक्के महत्त्व कॅट स्कोअर आणि 20 टक्के महत्त्व गु्रप डिस्कशन आणि मुलाखतीसाठी दिले जाईल.

एमसीए : 31 मे आणि 1 जून रोजी ऑनलाइन प्रवेश चाचणी होईल. गुणवत्ता यादीत 70 टक्के महत्त्व प्रवेश परीक्षेतील गुण आणि 30 टक्के महत्त्व अकॅडमिक पार्श्वभूमीला दिले जाईल. दहावी, बारावी आणि पदवीच्या गुणांना 10-10 टक्के महत्त्व दिले जाईल.

शुल्क
बीआयटी, मेसरामध्ये एमसीए कोर्ससाठी विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी 1 लाख 46 हजार रुपये, दुसर्‍या वर्षी 1 लाख 57 हजार रुपये आणि तिसर्‍या वर्षी 1 लाख 68 हजार रुपये शुल्क आहे. दोन वर्षांच्या एमबीए कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 3 लाख 60 हजार रुपये आहे. बिट्स, पिलानीमध्ये एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 2 लाख 50 हजार रुपये आणि एनआयटी संस्थांमध्ये एमसीएचे वार्षिक शुल्क 80 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा education@dainikbhaskargroup.com