आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Divya Education: जनसंपर्क क्षेत्रात करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी, मात्र, केवळ 10 टक्के उमेदवारांना चांगली संधी
सुमारे 1000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या जनसंपर्क क्षेत्रात गेल्या एक ते दीड वर्षात मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, पुढील पाच वर्षात या क्षेत्रात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. जनसंपर्काचा अर्थ हा कोणतेही संघटन आणि संपर्कात येणार्‍या लोकांतील दुवा असा आहे. हे क्षेत्र मास कम्युनिकेशन आणि जाहिरात क्षेत्राशी देखील संबंधित आहे. कॉर्पोरेट आणि सरकारी संस्थांत या क्षेत्राची भूमिका निश्चित अशी आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठय़ा संधी आहेत. मात्र, या क्षेत्रात स्पर्धाही प्रचंड आहे. आंतरराष्ट्रीय जगतात सध्या पीआर एजन्सीला चांगले दिवस नाहीत. तसेच या क्षेत्रात अनेकांना नोकरी हवी आहे. त्यामुळे या जनसंपर्क क्षेत्राची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगल्या शिक्षणासोबतच कम्युनिकेशन स्किल दज्रेदार असणे आवश्यक आहे.

25 वर्षांपूर्वी सुरुवात, आता चीनसोबतच भारतात होतोय वेगाने विस्तार
जगातील बहुतांश देशात जनसंपर्क हे क्षेत्र सुमारे 100 वर्षांपूर्वीच सुरू झाले. मात्र, भारतात या उद्योगाची सुरुवात ही 1990 च्या दशकात झाली. त्याआधी काही कंपन्या जनसंपर्काचे काम करत होत्या. 2010-11 मध्ये या क्षेत्राची अंदाजे 30 टक्के वाढ होती. 2014 मध्ये यात 20 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. चीनसोबतच देशात हे क्षेत्र वेगाने वाढत आहे.
छोट्या शहरात वाढला पीआरचा ट्रेंड
2008-09 च्या मंदीच्या काळात देशात विभाग स्तरावर पीआर कंपन्यांची सुरुवात झाली. यात कंपन्या या आपला सर्व जोर हा छोट्या शहरांवर लावत होते. विभाग स्तरावर मंदीत पीआर इंड्रस्टीला उभारी मिळाली. त्यामुळेच आता विदेशी कंपन्या छोट्या शहरात येऊ पाहत आहेत.
प्रत्येक स्तरावर मिळेल संधी, खालील संस्थात एका जागेसाठी 100 अर्ज
जनसंपर्क क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी 10+2 किंवा पदवीनंतर प्रवेश मिळू शकतो. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हे प्रवेशासाठी पात्र ठरतील. यूजी किंवा पीजी स्तरावरील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षेनंतर प्रवेश मिळेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, जामिया मिलीया युनिव्हर्सिटीत एका जागेसाठी शंभर अर्ज येत आहेत.

सुमारे 3/4 तरुणांची ऑनलाइन क्रेझ पुढील काळात या क्षेत्रात वाढणार संधी
विभाग स्तरावर जनसंपर्कासोबत या क्षेत्रात डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे क्षेत्र वाढीस येण्याची शक्यता आहे. जून, 2014 च्या शेवटी देशात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या 24 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक होईल. देशात 75 टक्के ऑनलाइन खरेदी करणारे हे 35 पेक्षा कमी वर्षांचे आहेत. त्यामुळेही या क्षेत्रात करिअरच्या संधी वाढतील.
दोन- ते तीन लाख सुरुवातीचे पॅकेज, दहातून एकालाच चांगली नोकरी व जनसंपर्क क्षेत्रात सुरुवातीलाच दोन ते तीन लाखांचे पॅकेज मिळू शकते. चांगल्या संस्थेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना 5 ते 6 लाखांचे पॅकेज मिळू शकते. सरकारी किंवा खासगी संस्थांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, यासाठी स्पर्धा खूप आहे. तज्ज्ञानुसार दहातून केवळ एका उमेदवाराला त्याच्या मनाप्रमणे नोकरी मिळते.
बातमी
डीयू- यूजीसीच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या वादावर दिल्ली युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स कमिशनच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. डीयूच्या एका प्राध्यापकाने एफवाययूपीला बंद करण्यासाठी यूजीसीच्या आदेशाला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. याआधी यूजीसीने डीयूच्या सर्व कॉलेजांना एफवाययूपीला बंद करून तीन वर्षाच्या यूजी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते.

स्थानिकावर भर
नोकरीच्या संधी मिळतील
देशात पीआर इंड्रस्टीत बहुराष्ट्रीय कंपन्यांची भागीदारी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारांसाठी हे चांगले संकेत आहेत. व्यावसायिकांनाही स्थानिकांना संधी देणे हे क्रमप्राप्त असणार आहे.
डिजिटल कॉर्मस
सहा वर्षांत आठ पटीने वाढ
2007 मध्ये देशात डिजिटल कॉर्मस या क्षेत्राचा व्यवसाय हा सुमारे 8 हजार 146 कोटी रुपये एवढा होता. डिसेंबर 2013 मध्ये अंदाजे आठ पटीने वाढून हा व्यवसाय 62 हजार 997 कोटी झाला.
आर्थिक विकास
2015 पर्यंत परिस्थितीत बदल
वर्ल्ड बँकच्या एका अहवालानुसार 2015 पर्यंत देशात आर्थिक विकासाचा दर हा 6.5 टक्क्यापेक्षाही अधिक राहण्याची शक्यता आहे. व्यापार्‍यात वाढ झाली तर, जनसंपर्क क्षेत्रही मोठय़ा प्रमाणात वाढेल.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर