आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Question answer Regarding Science

Divya Education: विज्ञान शाखेतील शिक्षण, करिअरसंबंधी प्रश्नोत्तरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिअर संबंधी वाचकांचे सातत्याने ई-मेल आणि एसएमएस येत आहेत. यातील निवडक प्रश्नांची उत्तरे आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने देणार आहोत. आज जाणून घ्या. विज्ञान शाखेचे शिक्षण आणि यातील करिअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे...
@ मी बारावी वर्गाचा विद्यार्थी आहे. मी अंतराळवीर किंवा संशोधक बनू इच्छितो. त्यासाठी आतापासून कशा प्रकारे तयारी करायला हवी?
अंतराळवीराचे लक्ष्य अंतराळात काम करण्याचे असते; परंतु तेदेखील पहिल्यांदा एक संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ असतात. कोणत्याही अंतराळ कार्यक्रमात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. अंतराळ क्षेत्रात प्रवेशासाठी 10 +2 मध्ये भौतिक आणि गणिताचे शिक्षण गरजेचे आहे. त्यानंतर भौतिकशास्त्रात बीएसस्सी किंवा अभियांत्रिकी करून पदव्युत्तर आणि मग खगोलशास्त्र किंवा अंतराळ विज्ञानात पीएच.डी. करता येऊ शकते. त्याशिवाय काही संस्थांमध्ये बीएसएमएस इंटिग्रेटेड अभ्यासक्रमदेखील आहेत. तुम्ही अ‍ॅरॉनॉटिकल किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बीई/ बीटेक केल्यानंतर एमटेक आणि पीएचडीदेखील करता येईल.
@ मी विज्ञान शाखेतील अकरावीचा विद्यार्थी आहे. मला प्राणीशास्त्रात रस आहे. या विषयात उच्चशिक्षण घेण्यासाठी चांगली संस्था आणि नोकरीची संधी याबद्दल सांगा.
प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर जैवतंत्रज्ञान, मेडिसिन, फार्मसी, जैवरसायन, जैवमाहितीशास्त्र, जेनेटिक्स, पर्यावरणशास्त्र, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान, कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, इंडियन कौन्सिल फॉर फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट, मेडिकल रिसर्च संस्थांमध्ये झुऑलॉजीचे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात. मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर फार्मा क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करता येऊ शकतात. झुऑलॉजीमध्ये पदवी केल्यानंतर फॉरेन्सिक विज्ञान क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. गुन्हे तपास प्रक्रियेत फॉरेन्सिक विज्ञानाचे महत्त्व वाढू लागले आहे. या क्षेत्रात नोकरीच्या संधीदेखील वाढू लागल्या आहेत.
@ मी शा६ळेत शिकतो. भविष्यात कृषी किंवा मेडिसिनमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. कारण बायोलॉजीची मला आवड आहे; परंतु गणित कच्चे आहे. त्यासाठी मी काय केले पाहिजे.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बायोलॉजिकल क्षेत्रात अनेक अभ्यासक्रम आहेत. तुम्ही मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, फार्मसी, फूड प्रोसेसिंग, हॉर्टिकल्चर किंवा अ‍ॅग्रिकल्चरची पदवी किंवा पदविका करू शकता. फार्मसीची पदवी किंवा पदविका मिळवल्यानंतर कंपन्यांमध्ये केमिस्ट किंवा अ‍ॅनालिस्ट पदावर काम करू शकता. फूड टेक्नॉलॉजी किंवा होम सायन्सचा कोर्स केल्यानंतर प्रक्रिया उद्योग किंवा प्रयोगशाळेत काम करण्याचाही पर्याय असतो. अगदी त्याचप्रमाणे बीएसस्सी कृषीचा अभ्यासक्रम केल्यानंतर हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, कृषी उत्पादने आणि कृषी उद्योग क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी असतात; परंतु त्यासाठी विशेष अभ्यासक्रम करावे लागतात.
@ जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी अभ्यासक्रम आणि संस्थांविषयी सांगा.
फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसह 10+2 पूर्ण झाल्यानंतर लाइफ सायन्समध्ये बीएसस्सी करून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दरम्यान जेनेटिक्समध्ये स्पेशलायझेशन करता येऊ शकते. जेनेटिक इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी आणि लाइफ सायन्सेसमधील पदव्युत्तर पदवीमधील घटक आहे. दिल्ली विद्यापीठ, मदुराई कामराज विद्यापीठ यांसारख्या संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम आहे. आघाडीच्या संस्थांमध्ये एमटेक किंवा एमएस्सी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली. बायोटेक्नॉलॉजीच्या एमएस्सी कोर्समधील प्रवेशासाठी ऑल इंडिया एंट्रन्स परीक्षा घेतली जाते. बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिकल इंजिनिअरिंगचा वापर सातत्याने वाढतोय. त्याचा उपयोग जेनेटिक्सशिवाय मेडिसिन, कृषी, पर्यावरण आणि औद्योगिक क्षेत्रात होतो. त्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेक पर्याय आहेत.
दिव्य मराठी तज्ज्ञ
प्रो. एम.व्ही. राजन, विभागप्रमुख डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स. डी. यू. शर्मा, करिअर कौन्सिलर, कोटा.
सेवा क्षेत्रातील चार
कंपन्यांमध्ये पुढील चार वर्षांत
43 हजार नोक-या
सेवा क्षेत्रातील चार मोठ्या कंपन्या अर्न्स्ट अँड यंग, पीडब्ल्यूसी, केपीएमजी आणि डीलॉइटमध्ये 43 हजार नव्या नोक-या उपलब्ध होणार आहेत. त्यात 60-80 टक्के नोक-या फ्रेश ग्रॅज्युएट्स, इंजिनिअर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि एमबीएमधील विद्यार्थ्यांसाठी असतील. या कंपन्या टायर-2 आणि 3 शहरांत मोठ्या प्रमाणात आपला विस्तार करणार आहेत. केपीएमजी ही यातील सर्वात लहान कंपनी आहे; परंतु 2018 पर्यंत भारतात कर्मचा-यांची संख्या दुपटीने वाढवण्याचा विचार करत आहे.
सीबीएसई मंडळ आणि परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाइन मिळणार
दहावी आणि बारावी मंडळाच्या परीक्षांसाठी लागणारे प्रवेशपत्र आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन मिळणार आहे. आतापर्यंत सीबीएसई विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची हार्डकॉपी शाळांना पाठवत होते. आता शाळांमध्ये ते ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. यंदा 27 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. परीक्षेला पेपरलेस आणि त्रुटीरहित करण्यासाठी मंडळाने हे पाऊल उचलले आहे.
तुम्ही आपले प्रश्न आम्हाला पाठवू शकता. देशातील प्रमुख समुपदेशक आणि विषय तज्ज्ञांकडून त्याची उत्तरे दिली जातील. त्याचे प्रकाशन वेळोवेळी केले जाईल.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com