आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: निवडा करिअरच्या वेगळ्या वाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठरावीक पठडीशिवाय वेगळे काम करण्याची संधी, स्पर्धाही कमी
मेडिकल, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, सिव्हिल सर्व्हिसेस हे सर्व पारंपरिक पर्याय आहेत. याच्या संधीही भरपूर आहेत. मात्र, त्यात संधीही जास्त असते. यामध्ये ठरावीक गोष्टीशिवाय अन्य काही करण्याची संधी खूप कमी मिळत असल्यामुळे अनेक विद्यार्थी त्यास पसंती देत नाहीत. ई-ट्यूशन, टी-टेस्टिंग यांसारखे करिअरचे काही नवे पर्याय असून ते सर्वांपेक्षा भिन्न आहेत. सध्याच्या गरजांतून तयार झालेले हे नव्या जमान्यातील करिअरचे पर्याय आहेत. यामध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकºया आणि पुढे सरकण्याच्या खूप संधी असतात. यामध्ये स्पर्धा कमी असते आणि प्रवेशासाठी कुठल्या खर्चिक कोर्स किंवा प्रशिक्षणाची विशेष आवश्यकता नसते ही यातील मुख्य बाब आहे. अशाच काही करिअरची माहिती घेऊ...
इथिकल हॅकिंग
० शुल्क : रु. 50 हजार ० मुदत : एक वर्ष
डिजिटल कम्युनिकेशनच्या या जमान्यात सुरक्षेचे मापदंडही बदलले आहेत. सायबर जगतात माहितीची अवैध आदान-प्रदान, आयडेंटिटी थेफ्ट आणि सायबर टेररिझम यांसारख्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यात इथिकल हॅकर्सची भूमिका महत्त्वपूर्ण असते. इथिकल हॅकर इन्फर्मेशन सिस्टिम आणि विशेषकरून इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात माहिती सुरक्षेसाठी जवळपास दोन लाख ट्रेंड प्रोफेशनल्सची आवश्यकता आहे. विप्रो, इन्फोसिससारख्या मोठ्या खासगी कंपन्याच नव्हे, तर प्रत्येक देशाचे सरकारही इथिकल हॅकर्स नियुक्त करत आहे. भारतामध्ये आता हॅकिंगशी संबंधित कोर्स काही संस्थांमध्ये आहेत. यामध्ये प्रवेशासाठी पदवीची आवश्यकता असते.
इन्स्टिट्यूट : इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी- गाझियाबाद
सुरुवातीचे पॅकेज : रु. 4-5 लाख वार्षिक
ई-ट्यूशन
नियमित वर्गात शिकण्याबरोबर ट्यूशन हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत असल्यामुळे करिअरचे नवे पर्याय तयार होत आहेत. ई-ट्यूशन त्यापैकी एक आहे. परवडणाºया शुल्कामध्ये शिक्षक मिळत असल्यामुळे भारत ऑनलाइन ट्यूटरिंग हब होत आहे. केवळ अमेरिकेतच भारताच्या ट्युटोरियल कंपन्यांची वार्षिक कमाई 100 अब्ज रुपयांच्या घरात आहे. टीचर्स आणि क्लायंट्समध्ये केवळ विद्यार्थी नव्हे, तर व्यावसायिकही सहभागी आहेत. त्यासाठी कोणत्या विशेष कोर्सची आवश्यकता नसते, केवळ विषयाचे ज्ञान आणि थोडे तांत्रिक प्रशिक्षण पुरेसे असते. कामाच्या तासांमध्ये लवचिकता असणे हे याच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण आहे.
सुरुवातीचे पॅकेज : रु. 1.5-2 लाख वार्षिक
पेट ग्रुमिंग
ज्यांना प्राण्यांसोबत राहायला आवडते त्यांच्यासाठी हे करिअर चांगला पर्याय आहे. देशात केवळ नोंदणीकृत पाळीव कुत्र्यांची संख्या 25 लाखांहून जास्त आहे आणि त्यात वेगाने वाढ होत आहे. मात्र, देशात व्यावसायिक पेट ग्रुमर्सची संख्या खूप कमी आहे. विदेशी जातीच्या प्राण्यांना पाळण्याच्या प्रमाणामुळे ग्रुमिंग आवश्यक असते. ग्रुमिंगचा अर्थ प्राण्यांना प्राथमिक शिक्षण देण्याव्यतिरिक्त त्यांचा उपचार, स्टायलिंग आणि विशेष कार्यक्रमासाठी तयारी करण्याचा समावेश असतो. प्राण्यांच्या वागणुकीचा आधी अंदाज येत नसल्यामुळे हे काम खूप आव्हानात्मक असते. मात्र, त्यासाठी कोणत्या विशिष्ट प्रशिक्षणाची आवश्यकता नसते, असे असले तरी अ‍ॅनिमल बिहेव्हियर आणि सायकॉलॉजी माहीत असल्यास उपयोग होतो.
सुरुवातीचे पॅकेज : रु. 2-3 लाख वार्षिक
टी टेस्टिंग
शुल्क : रु. 65 हजार मुदत : 45 दिवस
2011 च्या असोचेम अहवालानुसार चहाच्या वापरात भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. उत्पादन आणि निर्यात प्रकरणात आपला देश दुसºया क्रमांकावर आहे. देशात चहाच्या वापराचा इतिहास खूप जुना आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये चहा उद्योगाच्या विस्तारातून नव्या संधी निर्माण केल्या आहेत. टी-टेस्टरचे काम केवळ चहाची चव घेण्यापुरते मर्यादित नाही. त्याऐवजी तो चहाची गुणवत्ता आणि पानाच्या आकाराचे आकलन करत असतो. यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार ब्लेंडिंग (वेगवेगळ्या पानांचे मिश्रण एकत्र करून विशिष्ट प्रॉडक्ट तयार करणे) करण्याचीही जबाबदारी त्याची असते. देशात अनेक ठिकाणी याबाबतचा कोर्स आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. असे असले तरी चहा कंपन्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे रोजगारांच्या संधी अपेक्षेपेक्षा कमी आहेत. मात्र, यात एकदा प्रवेश मिळाल्यानंतर पुढे सरकण्यास व चांगली कमाई करण्याची संधी प्राप्त होते.
इन्स्टिट्यूट : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट, बंगळुरू
सुरुवातीचे पॅकेज : रु. 2-3 लाख
ज्ञान
लेव्हिस यांना नोबेलसाठी 35 वेळेस नामांकन, मात्र पुरस्कार एकदाही नाही
अमेरिकेचे फिजिकल केमिस्ट गिलबर्ट न्यूटन लेव्हिस यांनी रसायनशास्त्रात अनेक संशोधने केले. कोव्हॅलेंट बाँडची ओळख करण्याबरोबर त्यांनी इलेक्ट्रॉन पेअर्सच्या कन्सेप्टचा शोध लावला. केमिकल बाँडिंगचा आधुनिक सिद्धांत ठरावीक मर्यादेपर्यंत लेव्हिसच्या डॉट स्ट्रक्चरवर आधारलेला आहे. त्यांनी थर्मोडायनामिक्स, फोटोकेमिस्ट्री आणि आयसोटोप सेपरेशन क्षेत्रांमध्ये खूप काम केले. लेव्हिस यांच्या योगदानाला मान्यता मिळाली आणि त्यांना 35 वेळेस रसायनशास्त्रासाठी नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले. मात्र, त्यांना हा पुरस्कार मिळू शकला नाही. 23 मार्च 1946 रोजी हायड्रोजन सायनाइडसोबत प्रयोग करताना त्यांचा प्रयोगशाळेतच मृत्यू झाला. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असे काही जणांचे म्हणणे होते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com