आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Vanasthali University UG, PG, M.Phill Courses Admission

Divya Education: वनस्थली विद्यापीठाच्या यूजी, पीजी आणि एम.फिल. कोर्सेससाठी प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वनस्थली विद्यापीठाच्या बी.ए., बीएस्सी, एम.ए., एम.एस्सी., एमबीए, लॉ, बी.टेक. आणि एमटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजस्थानमध्ये जयपूरजवळ असलेली संस्था केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. यातील काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अ‍ॅप्टिट्यूड चाचणी परीक्षा घेण्यात येईल. काही अभ्यासक्रमांत पात्रता चाचणीच्या आधारे प्रवेश मिळेल.
पात्रता
* बीए (हिंदी, इंग्लिश, गणित, अर्थशास्त्र, लोकप्रशासन इत्यादी) : कोणत्याही शाखेमध्ये बारावी उत्तीर्ण.
* बीएस्सी (भौतिकशास्त्र, रसायन, जिओग्राफी, जिऑलॉजी) : विज्ञान शाखेत 55 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण.
* एम.ए. (हिंदी, इंग्लिश, इतिहास इत्यादी) : कोणत्याही शाखेत पदवी.
* एमएस्सी (रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी) : संबंधित विषयात 60 टक्के गुणांसह पदवीधर.
* बी.टेक. (संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, आयटी इत्यादी) : फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमध्ये 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण.
* एमबीए : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
निवड प्रक्रिया
इंग्रजीचा बीए आणि एमए अभ्यासक्रम, बीएड, बी फार्मसी, बीटेक, एमटेकच्या बहुतेक शाखा एमबीए, एमएस्सी-बायोटेक्नॉलॉजी, एम.फिल. इत्यादीमध्ये प्रवेश करण्यासाठी परीक्षा होईल. गुणवत्ता यादी पात्रता परीक्षा आणि चाचणी परीक्षेला मिळून तयार करण्यात येईल. इतर सर्व अभ्यासक्रमांत पात्रता परीक्षेच्या आधारे सरळ प्रवेश दिला जाईल.
शुल्क
* बीए, एमए, एमफिल, बीएस्सी, एमएस्सी (होम सायन्स)
: 40 हजार रुपये वार्षिक
* बीएस्सी, बी फार्मसी, बी.कॉम., बीएड, मास्टर ऑफ सोशल वर्क आणि एमएस्सी : 59 हजार रुपये वार्षिक. बनारस हिंदू विद्यापीठात बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 25 हजार रुपये शुल्क भरावे लागते.
* बीटेक, एमटेक, एमसीए, एमबीए : 78 हजार रुपये.
बनारस हिंदू विद्यापीठात बीटेक अभ्यासक्रमासाठी वार्षिक शुल्क सुमारे 30 हजार रुपये आणि एमबीएसाठी सुमारे 50 हजार रुपये आहे.
बिट्सच्या बॅचलर ऑफ फार्मसी कोर्समध्ये प्रवेश, अर्ज 15 फेब्रुवारीपर्यंत
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या पिलानी आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. बिट्सच्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट बिटसॅट-2014 च्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. केंद्रीय आणि राज्य मंडळाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणा-या विद्यार्थ्यांना बिटसॅट देण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश मिळेल.
पात्रता
75 टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजीसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावे. प्रत्येक विषयात किमान 60 टक्के गुण संपादन केलेले असावेत.
शुल्क
बिट्समध्ये बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रति सत्र शुल्क सुमारे 80 हजार रुपये आहे. प्रवेशाच्या वेळी सुमारे 20 हजार रुपये वेगळे द्यावे लागतील. जामिया हमदर्दमध्ये हेच शुल्क वार्षिक 55 हजार रुपये आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com