आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Various Course Admission Notice In Hyderabad University

दिव्य एज्युकेशन: हैदराबाद विद्यापीठात विविध अभ्‍यासक्रमाच्या प्रवेशसासाठी सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
33 हून जास्त पीजी, ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि पीएचडी कोर्सेसमध्ये प्रवेश परीक्षेसाठी दोन महिने शिल्लक
हैदराबाद विद्यापीठाच्या 33 हून जास्त कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतील. या माध्यमातून ते 2014-15 च्या सत्रात प्रवेश घेऊ शकतील. यामध्ये पदव्युत्तर पदवी, पदवी, पीजी डिप्लोमा, एमटेक आणि एमफिल प्रोग्रॅम आदी कोर्सेस आहेत. या सर्व कोर्सेससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे. प्रवेश परीक्षा 1 ते 7 फेब्रुवारीस होईल.
प्रमुख पदवीसाठी पात्रता
पीजी कोर्सेस
संबंधित विषयात पदवी व कमीत कमी 60 टक्के गुण. सायन्स, ह्युमॅनिटीज, सोशल सायन्सेस, परफॉर्मिंग आणि फाइन आर्ट्स, हिस्ट्री, कम्युनिकेशन, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हेल्थ सायकॉलॉजी, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन आणि मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ कोर्सेसमध्ये प्रवेश
एमटेक प्रोग्रॅम
गेट स्कोअरमार्फत, हा 4 एप्रिलपर्यंत जमा करावा. याबरोबर संबंधित विषयात कमीत कमी 60 टक्के गुण. एमटेक बायोइन्फर्मेटिक्स आणि आयसी टेक्नॉलॉजीसाठी 55 टक्के गुण आवश्यक.
एमफिल कोर्स
विषयाशी संबंधित पदवीमध्ये किमान 55 टक्के गुण.
प्रत्येक विषयाच्या उपलब्ध जागांपेक्षा चारपट जास्त विद्यार्थी मुलाखत देतील
प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावरील गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. प्रवेश परीक्षेच्या गुणांना 75 टक्के आणि मुलाखतीसाठी 25 टक्के महत्त्व दिले जाईल. परीक्षेत कट ऑफ मार्क्स नाही, त्यामुळे मुलाखतीसाठी चारपट जास्त विद्यार्थ्यांना बोलवले जाईल. यानंतर गुणवत्ता यादी तयार होईल आणि विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
शुल्क
आयआयटी-मद्रासमध्ये एमटेक कोर्सचे प्रतिसेमिस्टर शुल्क साधारण 10 हजार रुपये आणि आयआयटी गुवाहाटीमध्ये एमएससीसाठी प्रतिसेमिस्टर शुल्क 6850 रुपये आहे. ही पण सरकारी संस्था आहे. खासगी इन्स्टिट्यूट्समध्ये दोन्ही कोर्सेसचे शुल्क 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
एमएससी कोर्सचे वार्षिक शुल्क 4935 रुपये आहे. एमटेक कोर्सेसचे वार्षिक शुल्क 23-30 हजार रुपये आहे. सरकारी विद्यापीठ असल्यामुळे येथे शुल्क कमी आहे.
चौथी सर्वोत्कृष्ट सेंट्रल युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंटचाही सर्वोत्कृष्ट संस्थेत समावेश
देशातील सर्व राज्यांत केंद्रीय विद्यापीठे आहेत. हैदराबाद विद्यापीठास केंद्रीय विद्यापीठाच्या यादीत चौथे स्थान आहे. त्या आधी जामिया मिलिया- दिल्ली, जेएनयू-दिल्ली आणि बनारस हिंदू विद्यापीठाचा क्रमांक लागतो. एवढेच नव्हे, 2012 मध्ये इंडिया टुडेने हैदराबाद विद्यापीठाला देशातील सातव्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा दर्जा दिला होता. याच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फर्मेटिक्स विभागाला देशातील बायोटेक कॉलेजांमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा education@dainikbhaskargroup.com