आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एज्युकेशन: इन्स्पायर फॅकल्टी अवॉडर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च (इन्स्पायर) फॅकल्टी स्कीम अ‍ॅवाडर्ससाठी उमेदवार 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयामध्ये स्वतंत्ररीत्या संशोधन करू शकतील. या योजनेला अ‍ॅश्युर्ड अपॉर्च्युनिटी फॉर रिसर्च करिअर नावाने ओळखले जाते.


पात्रता
सायन्स, मॅथ्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिसीन किंवा कृषीसंबंधित विषयांमध्ये पीएचडी करत असावेत किंवा त्यांनी शोधनिबंध जमा केलेले मात्र पदवीची प्रतीक्षा करणारे सर्व उमेदवार. ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी स्थान मिळवले आहे किंवा बारावी परीक्षेत किंवा आयआयटी-जेईईमध्ये सर्वोत्कृष्ट 1 टक्का विद्यार्थ्यांमध्ये सहभाग असावा.


वयोमर्यादा : 27 ते 32 वयोगटातील विद्यार्थी. एससी-एसटीसाठी 35 वयोमर्यादा राहील.


अर्जाची प्रक्रिया
उमेदवार थेट अथवा इन्स्टिट्युशनमार्फत अर्ज करू शकतात. थेट अर्जात दिल्लीच्या इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीमधील तज्ज्ञ उमेदवारांची यादी तयार करतील. नामांकनाद्वारे अर्ज केलेल्या उमेदवारांना कुलगुरू, इन्स्टिट्युशनल प्रमुख आणि प्रख्यात शास्त्रज्ञ निवड करतील. अंतिम निवड इन्स्पायर फॅकल्टी योजनेच्या वरिष्ठ समितीकडून होईल.


रक्कम व मुदत
इन्स्पायर योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी 1000 फॅकल्टी अवॉडर्स दिले जातात. निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला आयआयटीच्या सहायक प्रोफेसरएवढी रक्कम फेलोशिपच्या रूपात दिली जाते. याबरोबर 7 लाख रुपये संशोधन अनुदान पाच वर्षांपर्यंत दिले जाते.


अन्य प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती
मुलांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती
स्कीम फॉर अर्ली अ‍ॅट्रॅक्शन ऑफ टॅलेंट्सअंतर्गत संशोधनात्मक प्रकल्प बनवण्यासाठी मुलांनाही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी जवळपास 2 लाख शाळकरी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. सहावी ते दहावी इयत्तेतील या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. याबरोबर 100 हून अधिक शहरांमध्ये सुमारे 50 हजार मुलांसाठी समर-विंटर शिबिर ठेवले जाते. हे सर्व विद्यार्थी दहावीतील टॉपर असतात.


उच्च् शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती
स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशनअंतर्गत तरुणांसाठीही योजना आहे. नॅचरल किंवा बेसिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेणा-या जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. या विद्यार्थ्यांचे वय 17 ते 22 दरम्यान असते. त्यासाठी विद्यार्थी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.


ज्ञान
एका चुकीमुळे पेनिसिलिनचा शोध
अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग जागरूक संशोधक मानले जातात. मात्र, एक लॅब टेक्निशियन म्हणून त्यांच्यात खूप निष्काळजीपणा होता. प्रयोगानंतर विविध सामग्रीचा त्यांना विसर पडत होता. एकदा दीर्घ सुटीनंतर परतल्यानंतर ज्या पदार्थावर ते संशोधन करत होते, त्यावर बुरशी चढलेली त्यांनी पाहिली. त्यांनी हा पदार्थ असलेली एक-एक प्लेट फेकण्यास सुरुवात केली. मात्र, एका प्लेटमध्ये बुरशी नसल्याचे त्यांनी पाहिले. त्या प्लेटमधील पदार्थाने अन्य जीवाणूची वाढ होऊ दिली नव्हती. त्या वेळी या पदार्थाचे नाव पेनिसिलिन पडले. फ्लेमिंग यांनी 1929 मध्ये प्रकाशित ब्रिटिश जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल पॅथॉलॉजीच्या मासिकात ही माहिती दिली आहे. पेनिसिलिनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करणे त्या वेळी शक्य नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर अर्न्स्ट चेन आणि हॉवर्ड फ्लोरे यांनी अमेरिकी सरकारच्या मदतीने पेनिसिलिनचे उत्पादन सुरू केले.


रंजक
श्वास रोखल्यानंतही 20 मिनिटे जिवंत राहू
बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलच्या संशोधकांनी तयार केलेल्या मायक्रोपार्टिकल्सचे शरीरात इंजेक्शन दिल्यास आपले रक्त आपोआप ऑक्सिजन घेते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्यांची श्वसन प्रक्रिया निकामी झाली आहे, अशा रुग्णांना जवळपास 20 ते 25 मिनिटांपर्यंत जिवंत ठेवू शकतो. या 20 मिनिटांमध्ये रुग्णांना श्वसन प्रणालीवर उपचार केला जातो. यानंतर रुग्ण सामान्य पद्धतीने श्वास घेऊ शकेल.


इंटरेस्टिंग कोट
“No amount of experimentation can ever prove me right; a single experiment can prove me wrong.” - Albert Einstein
मी कितीही प्रयोग केले तरी ते मला योग्य ठरवू शकत नाहीत. मात्र, एक प्रयोग मला चुकीचा ठरवू शकतो. - अल्बर्ट आइन्स्टाइन
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com