आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi Education: Scholarship In Nationa Education

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एज्युकेशन: देशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल आपण सरकारी शिष्यवृत्ती व फेलोशिपबाबत माहिती वाचली. देशात अल्पसंख्याक आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणा-या अनेक सरकारी व शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांच्या अशाच काही शिष्यवृत्ती व फेलोशिप योजनेची माहिती देत आहोत.


अल्पसंख्याक व विशेष शिष्यवृत्ती
सरकारी व शैक्षणिक संस्थांच्या काही शिष्यवृत्त्या गुणवत्तेच्या आधारावर, तर काही केवळ अल्पसंख्याक वर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्जानुसार दिल्या जातात. ‘स्पेशली एम्बल्ड’ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या उच्च् शिक्षणासाठीही काही शिष्यवृत्त्या आहेत.


सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड मेरिट स्कॉलरशिप
जे विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसाठी एकुलते एक आहेत आणि जे यावर्षी दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ही शिष्यवृत्ती देते.
पात्रता : आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य असावे. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण किंवा 6.2 ग्रेड पॉइंट सरासरी.


निवड : गुणवत्तेच्या आधारावर.
रक्कम व मुदत : 500 रु. प्रतिमाह दोन वर्षांसाठी. मात्र, दुस-या वर्षी शिष्यवृत्ती सुरू राहण्यासाठी कमीत कमी 50 टक्के गुण घेणे आवश्यक.


एनएचएफडीसी शिष्यवृत्ती
शारीरिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी सामान्य न्याय मंत्रालयाअंतर्गत ही शिष्यवृत्ती नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन देते. 500 विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती मिळते.


पात्रता : कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 1.8 लाख रुपयांहून जास्त असू नये. अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला नसावा.


निवड : ज्या संस्थेमध्ये अर्ज केला आहे तेथील प्राध्यापकाच्या लेखी परवानगीनंतर गुणवत्तेवर आधारित निवड.
रक्कम व मुदत : पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना 1 हजार रु. आणि इतरांना 700 रु. प्रतिमहिना. डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करणा-या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 700 रु. व इतरांना 400 रुपये महिना. 10 हजार रुपयांची कोर्स फीस मिळू शकेल.


अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती
अल्पसंख्याक मंत्रालयाने अल्पसंख्याक, मुस्लिम, शीख, बौद्ध आणि पारशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली. यासाठी निवड प्रक्रिया नसते, विद्यार्थ्यांना केवळ अर्ज करावा लागतो आणि गेल्या परीक्षेमध्ये 50 टक्के गुण घेणे आवश्यक असतात. प्रत्येक राज्यामध्ये शिष्यवृत्तीची संख्या वेगवेगळी आहे.


शालान्तपूर्व शिष्यवृत्ती
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.
पात्रता : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.
रक्कम व मुदत : पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 100 रुपये प्रतिमहिना. सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये. प्रवेश शुल्क, 350 रुपये ट्यूशन फीस. मेंटेनन्स अलाउन्सच्या रूपात होस्टेलच्या विद्यार्थ्याला 600 रुपये प्रतिमाह आणि इतरांना 100 रुपये प्रतिमहा.


दहावीनंतरची शिष्यवृत्ती
अकरावीपासून पीएचडीपर्यंत शिष्यवृत्ती. मात्र, एलएलबी, एमबीए, एमएस्सी, बीई आणि एमबीबीएससाठी नाही.
पात्रता : एकूण वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त नसावे.
रक्कम व मुदत : अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सात हजार रुपयांपर्यंत ट्यूशन फीस. होस्टेलमधील विद्यार्थ्यांना 235 रु. आणि इतरांसाठी 140 रु. प्रतिमहा. मेंटेनन्स. तांत्रिक व व्यावसायिक कोर्सेससाठी 10 हजार रुपये. एम.फिल आणि पीएचडीमध्ये 510 रु. प्रतिमहा मेंटेनन्स.


तांत्रिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
केवळ तांत्रिक व व्यावसायिक कोर्सेसमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी. दरवर्षी 20 हजार शिष्यवृत्त्या.
पात्रता : मागील परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण. अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला नसावा. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.


निवड : गुणवत्तेनुसार
रक्कम व मुदत : वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी 10 हजार रुपये आणि अन्य विद्यार्थ्यांना राहण्याच्या खर्चासाठी 5 हजार रुपये वार्षिक. पदव्युत्तर पदवी शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती सुरू राहील.


did you know?
Everyday Latin phrases
q i.e. »
This is an abbreviation for the Latin phrase id est meaning "that is," or "in other words." The term introduces an explanation of a previous paraphrase, as in: "Dr. Doolittle, reported that he had only 'a few' pets, i.e., he had more animals on his property than the London Zoo." I.e. is only capitalized at the beginning of a sentence. The periods and closing comma are used in American English, though they're unnecessary in English speaking-countries outside of North America, i.e., the UK, Australia, and Ireland.

q E.g. »
This is an acronym for the Latin phrase exempli gratia meaning “for example” or literally translated, “for the sake of example.” The phrase introduces an example of a reference made earlier in the sentence, as in: “She felt that large lizards were widely misunderstood (e.g. the delicate gila monster).” E.g. is only capitalized at the beginning of a sentence and can be flanked by commas or parenthesis. If you’re worried about confusing e.g. and i.e., remember: use e.g. to provide an example and i.e. to explain one.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com