आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi Education: Various Scholarship In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एज्युकेशन : देशात शिक्षणासाठी मिळणारे शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत आपण परदेशी विद्यापीठे व संस्थांमधील शिक्षणासाठी आवश्यक परीक्षा आणि तेथे मिळणा-या शिष्यवृत्तीविषयी वाचले. भारतातही विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. अशा शिष्यवृत्तीविषयी जाणून घेऊया..


सरकारी शिष्यवृत्ती
प्रत्येक पावलावर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या वतीने अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. वार्षिक सुमारे 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. यातील काहीसाठी परीक्षा होते. काही गुणवत्तेवर आधारित दिल्या जातात. विद्यार्थी शिक्षण पूर्ण होईपर्यंतदेखील शिष्यवृत्ती मिळवू शकतात. अर्थात शाळेपासून पीएचडीपर्यंत, प्रत्येक पावलावर आर्थिक मदत मिळते.


आयसीएमआर पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो स्कीम
दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठी अशा प्रकारची मदत मिळते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) ही शिष्यवृत्ती आहे.
पात्रता : पीएचडी, एमडी किंवा एमएसची पदवी. वयोमर्यादा : 32 वर्षे खुल्या वर्गासाठी, एससी-एसटी आणि महिलांना 37 वर्षे. संशोधन प्रकाशित झालेले असावे किंवा त्यासाठी पुरस्कार मिळालेले असल्यास वयातून तीन वर्षांची सूट.
निवड : निवड मुलाखतीच्या माध्यमातून. ज्या विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकाशित झालेले आहे किंवा पुरस्कार मिळालेले असतील त्यांना प्राधान्य.
कालावधी व मूल्य : पोस्ट डॉक्टरल फेलोसाठी मासिक 35 हजार रुपये, राहण्याचा खर्च, इतर खर्चही मिळतो. 3 लाख रुपये वार्षिक अनुदान. त्यात 25 टक्के मदत वाहतूक खर्चासाठी.


न्यू सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप
महाविद्यालयीन किंवा विद्यापीठातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना एमएचआरडीची ही शिष्यवृत्ती. यातून पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च दिला जातो. दरवर्षी 41 हजार विद्यार्थी आणि 41 हजार विद्यार्थिनींना याचा लाभ मिळतो.
पात्रता : बारावीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण. कोणत्याही इतर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला नसावा. कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा वार्षिक 4.5 लाखांपेक्षा अधिक नसावी.
निवड : मंडळाच्या निकालानंतर अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी, परंतु गुण चांगले असावेत. असे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
कालावधी आणि मूल्य : शिक्षणाच्या काळात शिष्यवृत्ती दहा महिने मिळते. पदवीधर विद्यार्थ्यांना 1 हजार रुपये व पदव्युत्तर पदवी करणा-या विद्यार्थ्यांना महिन्याला 2 हजार रुपये. जे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. त्यांना अभ्यासक्रमाच्या चौथ्या व पाचव्या वर्षी महिन्याला 2 हजार रुपये मिळतात.


इन्स्पायर स्कॉलरशिप
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने इनोव्हेशन इन सायन्स पर्स्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही आहे स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन व अश्योर्ड अपॉर्च्युनिटी फॉर रिसर्च करिअर.
एसएचई
नैसर्गिक व मूलभूत विज्ञानातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन करणारे. 10 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी फायदा.
पात्रता : बारावीमध्ये टॉप 1 पर्सेंटाइलमध्ये किंवा जेईई, एनईईटीमध्ये अव्वल 10 हजारांच्या सूचीमध्ये समावेश. बालसंशोधक प्रोत्साहन योजना किंवा एनटीएसई किंवा जगदीश बोस नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम उत्तीर्ण असावे.
कालावधी, मूल्य : दरवर्षी 80 हजार रुपये. पदवी व पदव्युत्तर पदवीच्या काळात.


एओआरसी
तरुण संशोधकांना प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. दरवर्षी 1 हजार तरुणांना संधी मिळते.
पात्रता : संशोधन क्षेत्रातील गुणवंत किंवा जो आपल्या विद्यापीठात अव्वल.12 वीची परीक्षा किंवा आयआयटी-जेईईमध्ये अव्वल 1 टक्के विद्यार्थ्यांमध्ये समावेश असावा.
कालावधी, मूल्य : 7 लाखांचा संशोधन निधी पाच वर्षांपर्यंत.


नॅशनल रिसर्च फेलोशिप
डीएसटीने विज्ञानाधिष्ठित संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामानुजन फेलोशिप व जे.सी. बोस फेलोशिप सुरू केली. दोन्हीसाठी विज्ञान किंवा अभियांत्रिकीमध्ये पीएचडी, अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मेडिसीनमध्ये एम.डी., कामाचा अनुभव अनिवार्य.
रामानुजन फेलोशिप : जगभरातील कोणताही संशोधक व अभियंता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो.
कालावधी-मूल्य : दर महिन्याला 50 हजार रुपयांची फेलोशिप. 5 लाख रुपये दरवर्षी अनुदान तत्त्वावर. सुरुवातीच्या पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती वैध. तीन वर्षानंतर शिष्यवृत्तीची रक्कम 60 हजार रुपये प्रतिमहिना.
जे.सी. बोस फेलोशिप : केवळ देशातील अभियंते व संशोधकांना अर्ज करण्याची संधी. वय 60 वर्षांहून कमी असावे.
कालावधी, मूल्य : उत्पन्नाबरोबरच दर महिन्याला 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती. 5 लाख रुपयांचे अनुदान. पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती राहील.
फन विद नंबर्स
1&8=8
11&88=968
111&888=98568
1111&8888=9874568
11111&88888=987634568
111111&888888=98765234568
1111111&8888888=9876541234568
11111111&88888888=987654301234568
111111111&888888888=98765431901234568
1111111111&8888888888=987654321791234568
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com