आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi : Journalism , Banking And Fashion Course Questions Answers

दिव्य एज्युकेशन : पत्रकारिता, बँकिंग आणि फॅशन अभ्यासक्रमाबाबतची प्रश्नोत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य एज्युकेशनला ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत.त्यापैकी निवडक प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत...

* मी जाहिरात व्यावसायिक आहे व टी.व्ही.वर वृत्तनिवेदकाचे काम करण्याची इच्छा आहे.त्यासाठी पत्रकारितेची पदवी अनिवार्य आहे का ?
उत्तर - टी.व्ही.वर वृत्तनिवेदनाचे काम करण्यासाठी पत्रकारितेच्या पदवी अनिवार्य नाही. त्यासाठी टेलिजेनिक फेस,उच्चर ज्ञान, भाषेवर प्रभुत्व आणि चालू घडामोडींची माहिती असणे अधिक आवश्यक आहे. अर्थात पदवी असल्यास करिअरसाठी उत्तम आहे. जाहिरात हा अनेक संस्थांमध्ये रेग्युलर मीडिया कोर्सचा एक भाग आहे.त्यामुळे तुम्हाला क्षेत्र बदलण्यात अडचण येणार नाही.
* फॅशन डिझायनिंग आणि फॅशन टेक्नॉलॉजीत काय फरक आहे?
उत्तर - फॅशन टेक्नॉलॉजीचा संबंध क्लॉथ मटेरियल उत्पादन, निर्मितीशी आहे.त्यामध्ये सामान्य लोकांच्या गरजेनुसार कपडे तयार केले जातात, तर फॅशन डिझायनिंगमध्ये प्रमुख भर हा कपड्यांचे सौंदर्य वाढवण्यावर होत असतो.यामध्ये अ‍ॅस्थेटिक्स आणि डिझाइनचा समावेश असतो.
* मी पदवीनंतर भाषांतराचा कोर्स केला आहे.बँकेत भाषा अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर - सरकारी बँकांमध्ये भाषा अधिकारी पदासाठी पदव्युत्तर पदवी (पीजी )सोबतच भाषांतरचा अनुभव गरजेचा आहे. भाषांतराचा कोर्स केलेले विद्यार्थी अनुभव नसला तरीही अर्ज करू शकतात. आपल्याला भाषा अधिकारी बनण्याची इच्छा असेल तर आधी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करा.
* मी 2012 मध्ये बी.टेक.ची पदवी घेतली आणि आता गुंतवणूक बँकरच्या रूपाने करिअर करू इच्छितो. त्यासाठी काय करावे ?
इन्व्हेस्टमेंट बँकर होण्यासाठी बिझनेस मॅनेजमेंटशी संबंधित विषयात पदवीची गरज असते. त्या शिवाय अनेक संस्थांमध्ये त्याचे यूजी / पीजी / पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा हा अभ्यासक्रम करणे केव्हाही चांगले व त्यानंतर इंटर्नशिप. हे खूपच स्पेशलाइज्ड क्षेत्र आहे. म्हणून संपूर्ण तयारीशिवाय करिअर करणे कधीही धोकादायक ठरू शकते.
* बी.कॉम केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये करिअरचा काय पर्याय असू शकतो? इंग्रजीत मी कच्चा आहे. या क्षेत्रात करिअरसाठी इंग्रजी गरजेची आहे ?
शेअर बाजाराचा विस्तार होत असतानाच यात करिअर करण्याची संधीही वाढू लागली आहे. तुम्ही स्टॉक ब्रोकर, फायनान्शियल प्लॅनर, पोर्टफोलियो मॅनेजर इत्यादी पदावर नोकरी मिळवता येऊ शकते. शेअर बाजाराचे काम बहुतांश संगणकावर आधारित आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रतेशिवाय संगणकाचे ज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे. इंग्लिश भाषा नोकरी मिळवण्यासाठी नियोजित अट नसली तरी शेअर बाजाराच्या कामकाजामध्ये इंग्लिशचा अधिक वापर केला जातो.


दिव्य एज्युकेशन तज्ज्ञ समिती
जुबिन मल्होत्रा
करिअर कौन्सिलर,
नवी दिल्ली


वर्तिका नंदा
प्रसार माध्यम तज्ज्ञ,
नवी दिल्ली


ज्ञान
1956 पासून फॅशन फोटोग्राफीची सुरुवात
तिसरा नेपोलियनच्या शासन काळात 1856 मध्ये फॅशन फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रेंच छायाचित्रकार अडॉल्फ ब्रॉन याने नेपोलियनला 288 पानांचे फोटोग्राफीवरील एक पुस्तक भेट दिले होते. नेपोलियनची प्रेयसी व्हर्जिनिया ओल्डोइनी हिचे त्यात छायाचित्र होते. फॅशन फोटोग्राफीच्या इतिहासात ती पहिली फॅशन मॉडेल मानली जाते. फ्रान्समधील मासिक ला मोड प्रॅक्टिकलमध्ये पहिल्यांदा फॅशन फोटोग्राफी प्रसिद्ध झाली. फॅशन फोटोग्राफी व फॅशन या विषयावर सध्या अनेक सर्वेक्षणे घेतली जातात. टेक्सॉस येथील प्रसारमाध्यमांचे विश्लेषण करणारी कंपनी ग्लोबल लॅँग्वेज मॉनिटरने 2012 मध्ये सर्वोत्कृष्ट फॅशन शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लंडनने प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यूयॉर्क, बार्सिलोना,पॅरिस, माद्रिद ही शहरेही त्यात आहेत.


रंजक
नामांकित व्यक्तींचे रंजक वास्तव
०सॅल्वोडोर डाली चित्रकार ज्याक्षणी झोपत त्या वेळी ते स्वत:ला जागे करून स्वप्नात पाहिलेले दृश्य चितारत असे.
०जगातील सर्वांत सुंदर महिला मानलेल्या हेडी लमारने टॉरपीडो नेव्हिगेशनचा शोध लावला.
०वॉल्ट डिस्नी उंदरांना खूप भीती होती. मात्र, बनवलेले मिकी माऊस कार्टून जगभरात प्रसिद्ध झाले.
०बेव रुथ आपल्या टोपीखाली कोबीचे पान ठेवत होते. यामुळे त्यांचे डोके थंड राहत होते व प्रत्येक दोन डावानंतर ही पाने बदलत होते.
०विन्स्टन चर्चिल यांचा जन्म एका नृत्यादरम्यान लेडीज रूममध्ये झाला.


इंटरेस्टिंग कोट
“By giving us the opinions of the uneducated, journalism keeps us in touch with the ignorance of the community.” - Oscar Wilde
अशिक्षित लोकांचे मत सर्वांसमोर आणून समाजाला अज्ञानाची जाणीव करून देण्याचे काम पत्रकारितेतून केले जाते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com