आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DU COA 2013 : Delhi University Art College Admission

डीयू-सीओए 2013: दिल्ली विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात एमएफए प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (एमएफए )च्या पाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेशिका पाठवू शकतात. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 5 जुलै आहे.


स्पर्धा
50 जागा/ 500 अर्जदार (अंदाजे)
कोर्सचा कालावधी 2 वर्षे


पात्रता
एमएफए च्या चार वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 50 टक्के गुणांसह बीएफएची पदवी आवश्यक आहे. एससी-एसटी,ओबीसींसाठी 45 टक्के गुणांची अट आहे.


निवड प्रक्रिया
एमएफएसाठी प्रवेश परिक्षा होणार नाही.प्रॅक्टिकल वर्कच्या पोर्टफोलियोच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर निवड व परिक्षण समिती विद्यार्थ्यांची व्हायवाही घेणार आहे. व्हायवामध्ये विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमातील प्रश्न विचारले जातील. व्हायवा आणि पोर्टफोलियोसाठी 60 टक्के वेटेज असेल.पात्रता परिक्षेसाठी 40 टक्के वेटेज असेल.


असेसमेंट पॅटर्न
पोर्टफोलियोमध्ये विद्यार्थ्याला आपले तीन सर्वोत्तम कलाकृती सादर कराव्या लागतील. त्याला 100 गुण असतील. व्हायवा 50 गुणांचा असेल.ज्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण मिळतील त्यांनाच प्रवेशसाठी पात्र समजले जाईल.अंतिम निवड यादी गुणवत्तेच्या आधारेच ठरणार आहे.


शुल्क
एमएफएचे वार्षिक शुल्क 6,200 रुपये आहे.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना 9 हजार 300 रुपये संस्थेची फीस व 5 हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. सरकारी संस्था असल्यामुळे येथील फीसही कमी आहे. इग्नूमध्ये एमएफएची फीस पाच हजार रुपये आहे. तर अ‍ॅमिटी विद्यापीठात एमएफएची फीस प्रति सेमिस्टर 33 हजार रुपये आहे.


प्रारंभापासूनच नामवंत शिक्षक
सन 1942 मध्ये कॉलेज ऑफ आर्टस्ची सुरुवात झाली. दिल्ली विद्यापीठांतर्गत फॅकल्टी ऑफ म्युझिक अँड आर्टस् म्हणून सुरु झालेल्या या महाविद्यालयात प्रारंभापासूनच नामवंत आणि प्रख्यात कलाकार विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.पद्मभूषण रामेंद्रनाथ चक्रवर्ती, कलासम्राट प्रो.बी.सी.सान्याल,प्रो.विश्वनाथ चॅटर्जी, पद्मविभूषण डॉ.सतीश गुजराल या सारख्या ख्यातनाम कलावंतांनी शिक्षकाची भूमिका बजावली आहे. डॉयलॉग सिरीज बनवणारे अनुपम सूद,कलाश्रीने सन्मानित डी.बी.सेठ,दिल्ली विमानतळ टर्मिनल-3 पेंट करणारे परेश मैती यांसारखे अनेक मान्यवर कलाकार या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.


पहिले रंगीत चक्र न्यूटनने तयार केले
वेगवेगळ्या रंगछटेची तुलना आणि प्रायमरी, सेकंडरी व कॉम्प्लमेंटरी रंगातील संबंध जाणून घेण्यासाठी कलर व्हीलची मदत घेतली जाते. आयझॅक न्यूटनने 1706 मध्ये पहिल्यांदा कलर व्हील तयार केले. त्यांनी लाल, पिवळा, नारंगी, हिरवा, निळा, इंडिगो आणि जांभळा रंग फिरत्या तबकडीवर लावला होता. तबकडी जस-जशी फिरवली जाईल, तसे सर्व रंग एकमेकांत मिसळले जातात. काही वेळानंतर सर्व रंगाचे एक मिश्रण होऊन पांढरा रंग तयार होईल. या शोधानंतर रंग चार्ट आणि टेबलमध्ये वापरले जाऊ लागले.


रंजक
पिवळा रंग पाहून भूक वाढते
० अनेक कलर थेरेपिस्ट स्वयंपाकघराच्या भिंतींना पिवळा देण्यास मनाई करतात. पिवळा व नारंगी रंग दिसल्यावर भूक वाढू लागते.
० एका अमेरिकी सर्वेक्षणानुसार, अनेकांना निळा रंग आवडतो. जांभळा सर्वांत आवडीचा दुसरा रंग आहे. जगातील 40 टक्के नागरिकांना निळा तर 14 टक्के नागरिकांना जांभळा रंग आवडतो.


इंटरेस्टिंग कोट
"A good painting to me has always been like a friend. It keeps me company, comforts and inspires."
-Hedy Lamarr
एक चांगले पेंटिंग माझ्यासाठी मित्रासमान आहे. चित्रकृती मला मदत करते, चांगली भावना निर्माण करते तसेच ती प्रेरणाही देते.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com