आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागास भाग, सरकारी शाळा पण मेहनतीने या दिग्गज भारतीयांनी घडवला इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी राष्‍ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी 27 जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. ते केरळच्या रामेश्‍वरसारख्‍या ग्रामीण भागात लहानाचे मोठे झाले आणि देशासाठी प्रेरणा देणारी व्यक्ती ठरले. त्यांच्या प्रमाणेच काही व्यक्तिमत्त्वांनी मागासलेल्या भागात जन्म आणि सरकारी शाळांमध्‍ये शिक्षण घेऊन आज भारतात तरुणाईला एक प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.
कधी काळी होता डाव्या विचारांचा प्रभाव
एन. नारायणमूर्ती, इन्फोसिसचे संस्थापक
जन्म: 20ऑगस्ट 1946

शिक्षण: युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूर आणि आयआयटी कानपूर
नारायणमूर्तींचा जन्म कर्नाटकातील चिकबल्लपूर जिल्ह्यात शिदलाघट्टा येथे झाला. आईचे माहेर याच तालुक्यातील नादकनयाकनहल्ली हे गाव त्यांचे आजोळ. मूर्ती यांचे मामेभाऊ एन. के. गुरुराज राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदलाघट्टा गावातच मूर्ती यांचे पहिलीपर्यंत शिक्षण झाले. नंतर चिंतामणी भागात शाळेत ते शिकले. वडील रामाराम येथेच एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. वडिलांची बदली श्रीनिवासपूर येथे झाल्यानंतर त्यांनी तेथील सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्या काळात या भागात एकही इंग्रजी शाळा नव्हती. तरुण वयात मूर्ती यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. १९७४ मध्ये ते बल्गेरियात गेले. रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांनी स्थानिक सरकारविरुद्ध भाष्य केले आणि त्यांना शिक्षा भोगावी लागली. तेव्हापासून त्यांची विचारसरणी बदलली.
पुढील स्लाइड्सव क्लिक करा आणि जाणून घ्‍या इतर दिग्गज भारतीयांविषयी