आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: संगीत नाटक अकादमीमध्ये प्रवेशासाठी परीक्षा 2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत नाटक अकादमीच्या दोन कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 10 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये कथ्थक नृत्यासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा ऑनर्स आणि 5 वर्षांचा फाउंडेशन कोर्स तसेच तबला-पखवाज वादनासाठी 5 वर्षांचा डिप्लोमा कोर्सचा समावेश आहे. तबला-पखवाजमध्ये एलिमेंटरी कोर्सही आहे. गेल्या वर्षी या कोर्सेससाठी जवळपास 700 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.
जागा
5 जागा (तबला-पखवाज)
20-20 जागा
(कथ्थक डिप्लोमा/ कथ्थक फाउंडेशन कोर्स)


पात्रता
कथ्थक
तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स : दहावी उत्तीर्ण. केंद्रातून डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 60 टक्के गुण आवश्यक.
वयोमर्यादा : 17 ते 22 वर्षे
पाच वर्षांचा फाउंडेशन कोर्स: इयत्ता तिसरी उत्तीर्ण होणे आवश्यक
वयोमर्यादा : 9 ते 14 वर्षे


तबला-पखवाज
पाच वर्षांचा डिप्लोमा : दहावी उत्तीर्ण. सूर व तालची जाण तसेच तबला, पखवाज वादनाचा किमान तीन वर्षे सराव केला असावा.


निवड प्रक्रिया
सर्व कोर्ससाठी प्रवेश परीक्षा किंवा गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल. कथ्थक कोर्ससाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सादरीकरण व मुलाखत द्यावी लागेल. तबला व पखवाजसाठी वादनाशिवाय तोंडी परीक्षेतून ताल व सूरांचे ज्ञान तपासले जाईल.


शुल्क
सर्व अभ्यासक्रमांसाठी 200 रुपये प्रवेश शुल्क आहे. याव्यतिरिक्त 300 रुपये अनामत रक्कम आणि 100 रुपये ग्रंथालय शुल्क आहे. फाउंडेशन कोर्ससाठी प्रति सेमिस्टर 2400 रुपये तर डिप्लोमासाठी 3600 रुपये वार्षिक शुल्क आहे. तबला-पखवाजच्या डिप्लोमा कोर्ससाठी वार्षिक 3600 रुपये शुल्क.


सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
कथ्थक अ‍ॅडव्हान्स कोर्समध्ये प्रवेश घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे शिष्यवृत्ती दिली जाईल. डिप्लोमाच्या(ऑनर्स) विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासाठी 3 हजार रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाते. वार्षिक परीक्षेत किमान 65 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी तबला आणि पखवाजमध्ये डिप्लोमा करत असेल, तर त्यास दरमहा हजार रुपये मिळतील. केंद्राकडून शिष्यवृत्ती मिळाल्यास अन्य संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. केंद्र किंवा अन्य संस्थेपैकी एकाची शिष्यवृत्ती घेता येईल.


विद्यार्थी नृत्याशी संबंधित ठिकाणांचा इतिहास जाणणार
अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण मिळेल. याशिवाय कथ्थकशी संबंधित ठिकाणांनाही ते भेट देतील. तेथे त्यांना कथ्थकच्या इतिहासाची ओळख करून दिली जाईल. विद्यार्थ्यांना सोलो व ग्रुप डान्स सादरीकरणामध्ये वेळोवेळी संधी दिली जाईल. कथ्थक तज्ज्ञ सेमिनार आणि वर्कशॉप्समध्येही येतील.


शू नृत्य जगातील सर्वात प्राचीन
ऑस्ट्रेलियन शूप्लॅटर अर्थात शू टॅपिंग हे जगातील सर्वात प्राचीन नृत्यापैकी आहे. पाच हजार वर्षांपूर्वी नियोलिथिक कालखंडात त्याची सुरुवात झाली होती. काही गुंफांमध्ये शू नृत्याच्या भित्तिचित्रांवरून त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे नृत्य आजही असंख्य लोक शिकतात. सन 1030 मध्ये एका जर्मन साधूने आपली कविता रूओड्लिबमध्ये या नृत्याचा उल्लेख केला होता. नृत्यातून महिलांचे मन रिझविण्याची त्या काळी पद्धत होती. परंतु काही देशांत बॅले नृत्य सर्वात प्राचीन मानले जाते. भारतात सर्वात प्राचीन नृत्य म्हणून ओडिशी नृत्य सांगितले जाते. खरेतर भरतनाट्यमलादेखील देशातील सर्वात प्राचीन नृत्य आविष्कारापैकी एक आहे. त्याला पाचवा वेद म्हटले जाते.
(स्त्रोत : एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका)


रोचक
बॅलेच्या रंजक फॅक्ट्स
> तीन तास बॅले करण्यासाठी लागणारी ऊर्जा 19 मैल चालण्याबरोबर आहे.
> बॅले नर्तक दर आठवड्याला दोन जोडे बदलतात.
> बॅले नर्तक समोर पाहतानादेखील आजूबाजूला अगदी व्यवस्थितपणे पाहू शकतो. नृत्य स्थितीमुळे त्यांचे पॅरिफेरल व्हीजन नॉन-डान्सर्सपेक्षा अधिक चांगले असते.


इंटरेस्टिंग कोट
"Dance isn't something that can be explained in words. It has to be danced."
Paige Arden Warren G. Bennis.
नृत्याला शब्दातून व्यक्त केले जाऊ शकत नाही. त्याला नृत्यातील पदन्यासातूनच मांडले जाऊ शकते.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com