आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Examination Of Chartantant Accountant Common Proficincy Test 15 December

चार्टर्ड अकाउंटंट्स कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट 15 डिसेंबरला, सुमारे 2 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची (आयसीएआय) कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट 15 डिसेंबर रोजी होईल. गेल्या वर्षी जवळपास 2.6 लाख विद्यार्थ्यांनी सीएची प्रवेश परीक्षा दिली होती. यामध्ये 86 हजार 396 विद्यार्थी ही परीक्षा क्लिअर करू शकले. परीक्षा दरवर्षी जुलै आणि डिसेंबर महिन्यात होते.
जागा
या परीक्षेसाठी जागा ठरलेल्या नसतात. परीक्षा उत्तीर्ण होणा-या सर्व विद्यार्थ्यांना सीए कोर्समध्ये प्रवेश मिळू शकतो. मात्र, परीक्षा एवढी अवघड असते की 30-40 टक्के विद्यार्थीच त्यात यश मिळवतात.
पात्रता
12 वी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. याबरोबर ज्यांनी 1 ऑक्टोबर 2013 पूर्वी सीएसाठी नोंदणी केली आहे. असे असले तरी विद्यार्थी संपूर्ण वर्षासाठी नोंदणी करू शकतात आणि नोंदणीनंतर येणारी परीक्षा देऊ शकतात.
परीक्षा शुल्क: आर्टिकलशिपसाठी 12 हजार आणि विना आर्टिकलशिपसाठी 10 हजार रुपये फीस असते.
परीक्षा पद्धती
दोन भागात होणा-या या परीक्षेत फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, मर्कंटाइल लॉज, जनरल इकॉनॉमिक्स आणि क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडशी संबंधित प्रश्न विचारले जातील. टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण कापला जातो.
नवे काय : या वर्षी 30 टक्के पासिंग मार्क्सची अट आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक भागात कमीत कमी 30 टक्के आणि चार भागांत मिळून 50 टक्के गुण घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत सर्व भागांत एकत्रित 50 टक्के गुण घेणे आवश्यक होते.
निकाल : जानेवारी, 2014
सीए फॅक्ट्स
01लाख विद्यार्थी दरवर्षी देशभरात सीए कोर्समध्ये प्रवेश घेतात
40टक्के विद्यार्थिनींचा समावेश या कोर्समध्ये
2.10लाख एकूण सदस्य या वर्षी आहेत आयसीएआयचे
10 लाख विद्यार्थी देशातील विविध केंद्रांमध्ये शिकत आहेत.
सीए करिअर
26.64 लाख रु. वार्षिक पॅकेज होते इंटरनॅशनल पोस्टिंगसाठी. दिल्ली सेंटरच्या तीन विद्यार्थ्यांना कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी हे पॅकेज मिळाले होते.
20 लाख रुपये वार्षिक पॅकेज दिले मुंबईच्या हिंदुस्तान लिव्हरने.
04 लाख रु. होते किमान पॅकेज. सरासरी पॅकेज 7.36 लाख रुपये होते.
अमेरिकेला जाणा-या भारतीय
विद्यार्थ्यांची संख्या घटली, शिक्षणासाठी अमेरिका गाठणा-यांमध्ये आता चिनी प्रथम
अमेरिकेला शिक्षणासाठी जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या यावर्षीही घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 3.5 टक्के कमी विद्यार्थी अमेरिकेला गेले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) ने ही माहिती दिली आहे. 2012-13 मध्ये 96,754 भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत जाण्याचे प्रमाण कमी होत आहे. 2001-02 ते 2008-09 या शैक्षणिक सत्रामध्ये अमेरिकेत शिक्षण घेणा-या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, आता चिनी विद्यार्थ्यांनी ही जागा घेतली आहे. भारत अजूनही दुस-या स्थानावर असून दक्षिण कोरिया तिस-या स्थानावर आहे. ज्याने पदवीचे शिक्षण परदेशात घेतले आहे किंवा ज्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने परदेशात शिक्षण घेतले असेल असे विद्यार्थी अजूनही परदेशात शिक्षणासाठी जाणे पसंत करत असल्याचे, आयआयईच्या उपाध्यक्षा राजिका भंडारी यांनी सांगितले. भारतीय विद्यार्थ्यांची पसंती अजूनही अमेरिकेला असून त्यानंतर ते इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाला जाणे पसंत करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
आयआयएम-सी चा सर्वाधिक रिसर्च पेपर तयार करण्याचा विक्रम
दरवर्षी आयआयएमचे विद्यार्थी आणि फॅकल्टी रिसर्च पेपर तयार करतात. गेल्या वर्षी आयआयएम-कोलकाता ने एकूण 117 रिसर्च पेपर तयार केले होते. विशेष म्हणजे जेवढे रिसर्च पेपर एकट्या कोलकात्याच्या संस्थेने तयार केले आहेत तेवढे इतर सर्व आयआयएमला एकत्रितपणेही तयार करता आले नाहीत. त्यापैकी 66 आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. तर 68 पेपर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारतातर्फे सादर करण्यात आले. 14 पेपर राष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले, तर 29 वर्किंग पेपर होते. बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष अजित बालकृष्णन यांनी ही माहिती दिली. त्यापैकी 90 टक्के पेपर फॅकल्टीचे होते, असेही ते म्हणाले. फायनान्शियल टाइम्सने नुकत्याच केलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात आयआयएम-कोलकाताला 19 वी रँकिंग दिली होती.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com