आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात ७०% व्यावसायिकांची कमतरता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुन्ह्याच्या तपासाशिवाय पॅथॉलॉजी, जिओलॉजी आणि अन्य क्षेत्रातही फॉरेन्सिक सायन्सचा उपयोग सातत्याने वाढत आहे. पण मोजक्याच संस्थांमध्ये या विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामुळे देशात फक्त गरजेच्या ३० टक्केच व्यावसायिकांची मागणी पूर्ण होऊ शकते.
फॉरेन्सिक सायन्स अलीकडच्या काळातील न्याय तपास प्रक्रियेतील एक आवश्यक भाग आहे. फॉरेन्सिक सायंटिस्ट क्रिमिनल केसमधील पुराव्यांचा वैज्ञानिक अभ्यास करतात. आणि गुन्ह्याच्या जागेची पाहणी करून पुराव्यांची चौकशी, तपासणी करतात. यासाठी फिजिकल सायन्ससारख्या केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीचा उपयोग करतात. फॉरेन्सिक सायंटिस्टद्वारा केला गेलेला अभ्यास गुन्ह्याच्या तपासात आणि त्यास सोडविण्यात एजन्सीजची मदत करतात. फॉरेन्सिक तज्ज्ञांची मागणी वाढल्याने विद्यार्थ्यांसाठी यात शक्यता वाढल्या आहेत. गुन्हे शोधाशिवाय दुसऱ्या क्षेत्रांमध्ये यांची मागणी वाढली आहे. देशाशिवाय विदेशातही यांच्यासाठी नाेकऱ्यांच्या संधी वाढताहेत.
देशात दरवर्षी तयार होतात केवळ ५०० व्यावसायिक : देशात फॉरेन्सिक सायन्स व्यावसायिकांची संख्या गरजेपेक्षा जवळपास ७० टक्केपर्यंत कमी आहे. या क्षेत्रात ट्रेंड व्यावसायिकांची मागणी विदेशात अधिक आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशात याची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. भारतात याचे शिक्षण देणाऱ्या संस्था कमीच आहेत. पण व्यावसायिकांची
मागणी वाढतेच आहे. इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अंॅड फॉरेन्सिक सायन्स, दिल्ली च्या अहवालानुसार देशात सध्या फॉरेन्सिक सायन्सचे के‌वळ ३ हजार व्यावसायिकच आहेत. जेव्हाकी आवश्यकता १० हजारांहून अधिक व्यावसायिकांची आहे. तेच सरकारी क्षेत्रात यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक असते. याशिवाय फॉरेन्सिक सायन्सचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजांमधील शिक्षकांची देखील ५० टक्के पदे
रिकामीच पडून आहेत.
तीन प्रवर्गात विभागले उद्योग : फॉरेन्सिक सायन्सला सामान्यत: तीन प्रवर्गात विभागले जाते. पहिला प्रकार फॉरेन्सिक मेडिसीन, दुसरा लॅबोरेटरी सायन्स ज्यात बॅलिस्टिक्स फिंगरप्रिंटस, डॉक्यूमेंटची तपास चौकशी समाविष्ट आहे. तिसऱ्या प्रकारात क्षेत्र विज्ञान-फिल्ड सायन्स, यात गुन्ह्याच्या जागेची तपासणी समाविष्ट आहे.
पदवीसह घेऊ शकता या क्षेत्रात प्रवेश : फॉरेन्सिक सायन्स चा कोर्स अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, रिसर्च, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र कोर्स असा सर्व पातळ्यावर उपलब्ध आहे. बायोलॉजी विषयासह सायन्स शाखेतून बारावी करणारे विद्यार्थी फॉरेन्सिक सायन्सचा बीएस्सीच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. अधिकतर संस्थांमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश परीक्षेद्वारे दिला जातो. फॉरेन्सिक सायन्सच्या एमएस्सी कोर्समध्ये प्रवेशासाठी संबंधित शाखेत बीएस्सी आवश्यक आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पीएचडीदेखील करू शकतो.
सरकारी संस्थामध्ये अधिक संधी : अंॅटी टेरेरिस्ट ऑपरेशन, मास डिझास्टर मॅनेजमेंट, क्राइम इन्व्हेस्टिगेशन आणि सायबर गुन्हे तपास यांसारख्या क्षेत्रात फॉरेन्सिक तज्ज्ञाची आवश्यकता असते. या क्षेत्रात खासगी आणि सरकारी संस्थामध्ये जॉब करू शकतात. पण सरकारी संस्थांमध्ये अधिक संधी आहेत. पोलिस, सिक्युरिटी एजन्सीज आणि विभिन्न फॉरेन्सिक लॅब आणि अन्य लॅबोरेटरीमध्ये देखील जॉब केला जाऊ शकतो. याशिवाय विद्यापीठे आणि महाविद्यालयातील शिक्षण कार्यात नाेकरीच्या चांगल्या शक्यता आहेत. या थेट पर्यायांशिवाय विद्यार्थी बायोटेक आणि फार्मा उद्योगातदेखील नाेकरी करू शकतो. सरकारी एजन्सीमध्ये सध्या नाेकरीसाठी प्रतिस्पर्ध्यात कठोर स्पर्धा वा परीक्षा असते.सरासरीपेक्षाही उत्तम उत्पन्न आहे या क्षेत्रात.
डिजिटल डेटा आणि जमिनीखालील शिक्षणातही उपयोग होतो फॉरेन्सिक सायन्सचा
 फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी : यात टॉक्सिकोलॉजीचा उपयोग करून मेडिकल वा लीगल इन्व्हेस्टिगेशनमध्येही याचा उपयोग केला जातो. यात गुन्ह्याची चौकशी तपासणीदरम्यान मिळालेल्या मेडिकल वा केमिकल संबंधित पुराव्यांची चौकशी समाविष्ट आहे.
फॉरेन्सिक पॅथाॅलॉजी:
यात पॅथॉलॉजीचा फोकस गुन्हे तपासाशी संबंधित असतो. जसेकी, पोस्टमॉर्टम करणे.
फॉरेन्सिक ऑप्टेमेट्री : यात ग्लासेसची तपासणी समाविष्ट आहे. ज्यात जसेकी चश्मे आदी.
डिजिटल फॉरेन्सिक : यात गुन्हे तपासाच्या दरम्यान डेटास डिजिटल उपकरणाने रिकव्हर करणे आणि त्याची चौकशी करणे संबंधी काम समाविष्ट आहे.
फॉरेन्सिक डीएनए अॅनालिसिस : यात ब्लड वा कोणत्याही अन्य माध्यमातून डीएनए चा शोध लावून यास पुराव्याच्या स्वरूपात तयार करण्याचे काम समाविष्ट असते.
फॉरेन्सिक जिऑलॉजी : यात तपासादरम्यान मिनरल, ऑइल, पेट्रोलियम, जमिनीशी संबंधित मटेरिअलची चौकशी समाविष्ट.
बातम्या आणखी आहेत...