आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Go Abroad For Study, Government Of Canada, University Scolrships

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशातील शिक्षण - 7 (कॅनडातील शिष्‍यवृत्ती)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत आपण अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील शिष्यवृत्ती व शिक्षणाबद्दल माहिती घेतली. या तीन देशांमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळणे बरेच कठीण असल्याने अनेक विद्यार्थी तुलनेने सोपे असलेल्या कॅनडाला जाणे श्रेयस्कर समजतात. कॅनडा हे सोपे ‘एज्युके शनल डेस्टिनेशन’ समजले जाते. त्यामुळे कॅनडा सरकार व विद्यापीठातील शिष्यवृत्तीसंदर्भात जाणून घेऊया.

कॅनडातील शिष्यवृत्ती, खर्च कमी, परंतु 25 टक्के भारतीयांनाच लाभ
कॅनडातील निवास खर्च इतर देशांप्रमाणेच महागडा आहे, परंतु येथील ट्यूशन फीस आणि विद्यार्थ्यांच्या निवास खर्च अमेरिका, ब्रिटनच्या तुलनेत थोडा कमी आहे. इतर देशांच्या तुलनेत येथील शिष्यवृत्तीही कमी आहे. या सर्व शिष्यवृत्ती परदेशी विद्यार्थ्यांसाठी आहेत. कॅनडात शिक्षण घेणारे सुमारे तीन हजार भारतीय विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात, परंतु 20 ते 25 टक्के मुलांनाच त्याचा फायदा मिळतो.

पोस्ट डॉक्टरोल बॅटिंग शिष्यवृत्ती
सर्वच पोस्ट डॉक्टरोल विद्यार्थ्यांसाठी. 2 वर्षांच्या कालावधीची शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत रिन्यू केली जात नाही. त्यासाठी विद्यार्थी 23 ऑक्टोबरपर्यंत अर्जही करू शकतात. ही शिष्यवृत्ती कॅनडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्च, नॅचरल सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च कौन्सिल तसेच सोशल सायन्स अँड ह्युमेनिटीज रिसर्च कौन्सिल यामध्ये विभागली जाते.

काय मिळेल : दरवर्षी 4 लाख रुपये
अचीव्हर्स : सुमारे 10 हजार विद्यार्थी अर्ज करतात, परंतु शिष्यवृत्ती केवळ 170 जणांनाच मिळते.
पात्रता : एक शिष्यवृत्ती संपल्यानंतरच बॅटिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. मध्येच काही कारणास्तव विद्यार्थ्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागल्यास शिष्यवृत्ती ब्रेकनंतर पुन्हा सुरू होऊ शकते.

इंटरनॅशनल डेव्हलपमेंट रिसर्च कॉर्पोरेशन (आयडीआरसी) शिष्यवृत्ती
मास्टर्स व डॉक्टरेट पदवीसाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्तीला आयडीआरसी निधी देत असल्यामुळे त्याची संमती असलेल्या क्षेत्रातील संशोधनासाठीच ही शिष्यवृत्ती मिळते.
काय मिळते : दरवर्षी सुमारे 1 लाख 22 हजार रुपये. मेंटेनन्स आणि प्रवास भत्ता.
अचीव्हर्स : प्रत्येक वर्षी सुमारे 4 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात, पण केवळ दोन ते तीन जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.
पात्रता : रिसर्च प्रपोझलला सुपरवायझरची मान्यता असणे आवश्यक. कॅनडा अथवा एखाद्या विकसनशील देशातच संशोधन केले जाऊ शकते. रिसर्चचे कोर्सवर्कही उत्तीर्ण झाले असले पाहिजे.

औद्योगिक पदव्युत्तर शिष्यवृत्ती कार्यक्रम
विज्ञान व अभियांत्रिकी पदवीधरांसाठी. त्याच्या मदतीने उद्योगात अनुभव घेण्याची संधी मिळते.
काय मिळेल : दरवर्षी सुमारे 9 लाख रुपये, तीन वर्षांपर्यंत. सोबतच ज्या संस्थेत शिक्षण घेत आहात तेथे सुमारे 3 लाख रुपये वार्षिक.
यशस्वी : सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज, परंतु शिष्यवृत्तीची संख्या अनिश्चित.
पात्रता : विज्ञान किंवा अभियांत्रिकीमधील एखादी पदवी किंवा अपेक्षित पदवी. मागील शैक्षणिक वर्षांत प्रथम श्रेणी.

व्हॅनियर कॅनडा पदवी शिष्यवृत्ती
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी. कॅनडामध्ये संशोधन क्षेत्रातील ग्लोबल हब तयार करण्यासाठी सुरुवात
काय मिळेल : 30 लाख रुपये दरवर्षी, तीन वर्षांसाठी.
यशस्वी : शिष्यवृत्तीसाठी 3 हजार अर्ज, परंतु शिष्यवृत्तीची संख्या अनिश्चित.
पात्रता : शैक्षणिक नैपुण्य, लीडरशिप इव्हेंट्स करणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य. विद्यापीठानंतर निवड समिती व पुन्हा व्हॅनियर निवड समितीकडूनच शॉर्टलिस्ट केली जाते.

कॅनडियन इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स रिसर्च ग्लोबल स्कॉलर्स
संशोधन क्षेत्रातील गुणवंतांसाठी ही शिष्यवृत्ती. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगातील प्रसिद्ध संशोधकासोबत काम करण्याची संधी मिळते.
काय मिळेल : दरवर्षी 70 हजार डॉलर अर्थात 44 लाख रुपये. सोबतच 5 हजार डॉलर अर्थात 3 लाख 15 हजार रुपये संशोधन अहवाल.
यशस्वी : ग्लोबल स्कॉलर कार्यक्रमात केवळ दोन विद्यार्थ्यांची निवड
पात्रता : तीन वर्षांची डॉक्टरेट पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी. पीएचडीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात.

त्रुदो फाउंडेशन
संशोधन क्षेत्रात काही वेगळी कामगिरी केलेली असावी, सृजनशीलता असावी. फाउंडेशनच्या चार थीम- ह्यूमन राइट्स अँड डिग्निटी, रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप, कॅनडा इन द वर्ल्ड, पीपल अँड देअर नॅचरल एन्व्हार्नमेंटपैकी कोणत्याही एका क्षेत्रात काम करण्याचा अनुभव.
काय मिळेल : प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 2 लाख 25 हजार डॉलर अर्थात 1.4 कोटी रुपये.
यशस्वी : दर वर्षी केवळ पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. सुमारे 1 हजार अर्ज, 100 जण शॉर्टलिस्ट.
पात्रता : पीएचडीधारक किंवा अ‍ॅपियर्ड