आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Go To Abroad For Study,UK Government, University Scholarships

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशात शिक्षण - 8 (ऑस्ट्रेलियात शिष्यवृत्ती)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी मिळणा-या शिष्यवृत्तीची माहिती काल आपण घेतली. चांगली जीवनशैली व शिक्षणाची ओढ असणारे हजारो भारतीय विद्यार्थी दरवर्षी ऑस्ट्रेलियात जातात. आज ऑस्ट्रेलियातील काही सरकारी व विद्यापीठांतील शिष्यवृत्तीसंदर्भात माहिती वाचा.


ऑस्ट्रेलियात जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यावर, तरीदेखील 8 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात
परदेशात शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया भारतीय विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता देश आहे. 2008-09 मध्ये वंशद्वेषाच्या घटनांनंतर ऑस्ट्रेलियात जाणा-या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. 2011-12 मध्ये 9 हजार 750 भारतीय विद्यार्थ्यांनी स्टुडंट व्हिसासाठी अर्ज केला होता. येथील शैक्षणिक स्तर अपेक्षेपेक्षा चांगला आहे, मात्र शिक्षण तेवढेच खर्चिक आहे. अशा स्थितीत जवळपास 8 हजार विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहेत. यातील 40 टक्के विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो.

सरकारी शिष्यवृत्ती
ऑस्ट्रेलियन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप

ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी किंवा टेक्निकल कोर्स पूर्णवेळ करणा-या भारतासह विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
काय मिळेल : ट्यूशन फिस, एस्टॅब्लिशमेंट अलाउंस (5000 ऑ. डॉलर- सुमारे 3 लाख रुपये), राहण्याचा खर्च (30 हजार ऑ. डॉलर- सुमारे 17 लाख 50 हजार रुपये), औषधोपचार खर्च, भारतातून येण्या-जाण्याचा विमान प्रवास खर्च इत्यादी.
लाभ : अर्ज करणा-या 10 हजार विद्यार्थ्यांपैकी दरवर्षी 1000 जणांना फायदा.
पात्रता: संबंधित संस्थेत प्रवेशाच्या अटी पूर्ण करण्याबरोबर विद्यार्थ्याचे वय 18 असावे. अविवाहित असावा, लष्करात असू नये आणि ऑस्ट्रेलियात अन्य दुस-या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला नसावा.

लीडरशिप अवॉर्डस् स्कॉलरशिप
ऑस्ट्रेलियात पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पीएचडी कर णा-या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती. ऑस्ट्रेलियन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपपेक्षा वेगळी.
काय मिळेल: ऑस्ट्रेलियन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपमध्ये मिळणा-या फायद्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना लीडरशिप फॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. यातून त्यांना स्वदेशात जाऊन विकास व सुधारणा कार्यक्रमात सहभागी होता येते.


लाभ : 10 हजार अर्जदारांपैकी दरवर्षी 200 शिष्यवृत्ती मंजूर होतात. पात्रता: आयलेट्समध्ये 6.5 स्कोअर, टॉफेल संगणक आधारित चाचणीत 237 स्कोअर.


एंडेव्हर पोस्टग्रॅज्युएट स्कॉलरशिप अवॉर्ड्स
पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पीएचडी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आहे. दोन ते साडेतीन वर्षांपर्यंत ती मिळते. परदेशातील सर्व विद्यार्थी प्राप्त करू शकतात.
काय मिळेल : पीजी कोर्ससाठी जास्तीत जास्त 1,18,500 ऑस्ट्रेलियन डॉलर(सुमारे 70 लाख रु.) आणि पीएचडीसाठी 2,28,500 ऑस्ट्रेलियन डॉलर(जवळपास 1 कोटी 34 लाख रु.) यामध्ये ट्यूशन फिस, राहण्याचा, प्रवास खर्च आदी.
लाभ : जवळपास 5 हजार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीधारकांची संख्या ठरलेली नाही.
पात्रता : चांगल्या अकॅडमी रेकॉर्डसह पदवी परीक्षा उत्तीर्ण.

एडीबी-जपान शिष्यवृत्ती कार्यक्रम
अर्थशास्त्र, व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञानासारख्या विकसित विषयात पदव्युत्तर किंवा पीएच.डी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. भारतासह आशियाई विकास बँकेच्या सर्व विकसनशील सदस्य देशांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यासाठी जपान पैसा पुरवते.
काय मिळेल : अध्यापन शुल्क, राहण्याचा खर्च, वैद्यकीय विमा व वाहतूक खर्च
यशस्वी : 5000 विद्यार्थ्यांचे अर्ज. यातील 300 जणांना संधी.
पात्रता : चांगल्या शैक्षणिक पार्श्वभूमीसह पदवीधर, 2 वर्षांचा अनुभव, इंग्लिशचे ज्ञान.

विविध विद्यापीठांची शिष्यवृत्ती
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी

कोणत्याही विद्याशाखेतील पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी एक वर्षाची ऑनर्स शिष्यवृत्ती. दरवर्षी 15 विद्यार्थ्यांना लाभ.
काय मिळेल : 5000 डॉलरची रक्कम (सुमारे 3 लाख रुपये).

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी
अभियांत्रिकी, आयटीच्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय पदवीपूर्व शिष्यवृत्ती.
काय मिळेल : अध्यापन शुल्काचा 50 टक्के वाटा.