आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Is Going To Provide Online It Course With Scholarship

गुगल तरुणांना देणार ऑनलाइन आयटी कोर्सचे शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगलने सोमवारी(ता.21 ) भारतात ऑनलाइन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डिग्रीचा अभ्‍यासक्रम सुरु केला. कंपनीने आपल्या ऑपरेटिंग सिस्टिममध्‍ये अँड्रॉइड अॅप्लिकेशन बनवण्‍यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करणार आहे. या ऑनलाइन कोर्समध्‍ये शिकवतील अमेरिकन शिक्षक. या डिग्री कोर्ससाठी केवळ 9 हजार 800 रुपये प्रति महिना खर्च येईल. कोर्सचा कालावधी 6-9 महिने असेल. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्‍यांचे 50 टक्के शुल्क वापस केले जाईल.

गुगलने यासाठी ऑनलाइन कंपनी युडेसिटी आणि टाटाबरोबर करार केला आहे. या कोर्ससाठी कंपन्या 1 हजार रुपये शिष्‍यवृत्तीही देतील. नोकरीसाठी सर्व पदवीधरांना पुढील वर्षी भारतात होणा-या गुगल जॉब फेअरमध्‍ये बोलवले जाईल. याने भारतातील जवळजवळ 36 लाखांपेक्षा अधिक आयटी डेव्हलपर्संना फायदा मिळेल. या व्यतिरिक्त गुगलला हवेत असे डेव्‍हलपर्स जी अँड्रॉइड अॅप्लिकेशनसाठी प्रोग्रामिंगचे काम करतील. भारताजवळ लाखो सॉफ्टवेअर डेव्‍हलपर्स असूनही देश जागतिक दर्जाचे अॅप्लिकेशन बनवण्‍यात इतर देशांच्या मागे आहे, असे गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले.