आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षात ठेवा, हुशार असणं महत्त्वाचं नाही तर मेहनतीने मिळते यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुध्‍दीमत्ता हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे सर्वसाधारण मानले जाते. मात्र बुध्‍दीमत्ता वास्तवात यशाचे मापदंड नाही. कारण काही लोक एखादी गोष्‍ट शिकण्‍यास अगोदर खूप रस घेतात. परंतु ती पूर्ण शिकण्‍याऐवजी मधेच सोडून देतात. तर यशस्वी लोकांची सामान्यत: कोणते वैशिष्‍ट्ये असतात? या संदर्भात एक संशोधन झाले असून त्याच्या निष्‍कर्षानुसार, कामाशिवाय कोणीही अष्‍टपैलू होऊ शकत नाही. विना अनुभव किंवा अभ्‍यासाशिवाय उच्च कामगिरीचे कोणतेही पुरावे मिळत नाही.

बहुतेक व्यवसायांमध्‍ये संबंधित व्यक्तिला यश शिखरावर पोहोचावयाला 20 ते 30 वर्षे लागतात.चेस ग्रँडमास्टर बॉबी फीशर याने अवघ्‍या 16 व्या वर्षीच क्रीडा जगतात मोठे यश मिळवले. पण याबरोबरच त्याने 9 वर्षे केलेल्या कठोर मेहनतीलाही महत्त्व द्यायला हवे. तसेच टायगर वुड्स यांचा गोल्फ या खेळ प्रकारशी ओळख 18 महिन्यांचे असतानाच झाली. त्यावेळी ते कितीही छोटे असो. पण त्यांनी गोल्फची सुरुवात केली, तेव्हा 15 वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता.

यशासाठी मेहनत करणे आवश्‍यक आहे. याबाबत प्रसिध्‍द शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणतात, बुध्‍दीमत्ता 1 टक्के आणि 99 टक्के मेहनत. यामुळे तुम्हाला कळाले असेलच की मेहनतीला किती महत्त्व आहे. सर्वोच्च स्थानी पोहोचण्‍याचे पहिले पाऊल म्हणजे कठोर परिश्रम होय. कोणते तरी एकच काम करण्‍याऐवजी तुमच्या कामगिरीत सुधारणा कशी होईल याकडे लक्ष द्या.

पुढे वाचा.... ऑलिम्पिकच्या भाषेत बोलायचे