आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundred New Centres Will Open For Company Secretary Course

कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी देशात 100 स्टडी सेंटर्स होणार सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही संस्था कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी देशातील आघाडीच्या म‍हाविद्यालयांमध्‍ये स्टडी सेंटर सुरु करणार आहे. यासाठी 100 महाविद्यालयांची निवड करुन त्यांच्याशी करार केला जाईल. तसेच या महाविद्यालयांमध्‍ये सामान्य अभ्‍यासक्रमा व्यतिरिक्त सीएस कोर्सही चालू करण्‍यात येईल. स्टडी सेंटर या वर्षाच्या शेवटी सुरु होतील. आयसीएसआय या व्यतिरिक्त साफ्टवेअर कंपन्यांबरोबर ई-लर्निंग प्रोग्रॅम डिझाइन केले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 30 पेक्षा जास्त ऑनलाइन कोर्स सुरु केले जाईल.

बिझनेस प्रोसेसिंग क्षेत्रासाठी नॅसकॉमने सुरु केला कोर्स
बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात कुशल कर्मचा-यांची प्रचंड मागणी आहे. यामुळे नॅसकॉमने एक ऑनलाइन कोर्स सुरु केला आहे. ट्रान्झॅक्शनल फायनान्स अँड अकाउंटिंगचा हा कोर्स विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठीही आहे. देशाच्या बीपीएम क्षेत्रात वार्षिक निर्यांत 11-12 टक्क्यांनी वाढत आहे. याचा अंदाज घेता या क्षेत्रात ट्रेण्‍ड प्रोफेशनल्सची प्रचंड मागणी आहे. यामुळे नॅसकॉमने संबंधित कोर्सेस सुरु केले आहे.
प्रश्‍न आणि सूचनांसाठी 9200012345 या क्रमांकावर एसएमएस करा किंवा education@dbcorp.in यावर मेल करा.